अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दोन दिवसापासून पाऊस पडत होता. या पावसा सोबतच दाट धुके देखील जास्त प्रमाणात आहे त्यामुळे त्याचा फटका हा रब्बीच्या पिकांसह फळबागांवरही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
लाल कांद्याचे पीक तर आडवे झाले आहे. ढगाळ हवामान आणि दाट धुके याचा परिणाम हा कांदा पिकावर होऊन कांदा पिकावर करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव तर होतोच परंतु बुरशी देखील वाढते. त्यामुळे कांद्याच्या पातीची जमिनीलगत झुकलेल्या पहावयास मिळतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
पाऊस उघडल्यानंतर कांदा पिकाचे व्यवस्थापन
- पाऊस उघडल्यानंतर लागलीस फवारणी न करता अगोदर पावसाचा अंदाज घेणे गरजेचे आहे.
- फवारणी नंतर पाऊस झाला तर शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाणार आहे. कारण आपल्याला माहिती आहेच की पाऊस आल्यानंतर फवारणी चा उपयोग होत नाही.
- शिवाय पाऊस व घडल्याच्या दिवशी फवारणी करणे तसे धोक्याचेच असते. कारण पावसामुळे जमिनीत पाणी जास्त असल्याने औषधांचा कांद्यावर अपेक्षित परिणाम होत नाही.
- त्यामुळे दोन दिवसानंतर फवारणी करणे उत्तम राहील.
असे करा कांदा पिकाचे व्यवस्थापन
लागवडीपासून ते काढणीपर्यंत कांदा पिकाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. कारण कांदा पिकाचा विचार केला तर हे पीक कमी कालावधीचा असून रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते. त्यामुळे बुरशीनाशकाचा वापर हे अनिवार्य राहणार आहे. पावसाच्या उघडीपी नंतर द्रव्य स्वरूपात मिळणारे बुरशीनाशक वापरणे फायद्याचे राहील. यामध्ये झोल ग्रुपचे बुरशीनाशक अधिक परिणामकारक ठरू शकते.
या औषधांची करू शकता फवारणी
- कांदा लागवड करून दोन महिन्याचा कालावधी झाला असेल तर ॲडक्सेरहे औषध बुरशीनाशक म्हणून वापरू शकता.
- पंधरा लिटरच्या स्प्रेपंप साठी 30 मिली औषध पाण्यात मिसळावे लागणार आहे.
- तसेच बीएसएफओपेरा हे बुरशीनाशक महत्त्वाचे ठरू शकते.
- याचे प्रमाण देखील 15 लीटर चे पंपासाठी 30 मिली असेच ठेवावे.
- परंतु कांद्यावर करपा आणि बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर कीडनाशके आणि बुरशीनाशक एकत्रित फवारणी गरजेचे असल्याचे कृषी तज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
टीप- फवारणी करण्या अगोदर कृषी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.
(संदर्भ- हॅलो कृषी)
Share your comments