मका,,हरबरा,कांदा , गहू रब्बीची मुख्य पिके आहेत,त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे उपाययोजना केल्यास निश्चित उत्पन्न वाढीसाठी मदत होईल.
मका,
मका या पिकाला झिंक लव्हिंग प्लांट म्हणतात , साधारणतः 30/35 दिवसाचे पीक झाल्यावर चिलेटेड झिंक 20 ग्रॅम फवारणी करावी, खताच्या दुसऱ्या हप्त्यात 40 दिवसांनी 10 किलो झिंक सल्फेट द्यावे ,वापसा स्थितीतच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात , मका निसवल्या नंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत 2 पाणी अत्यंत आवश्यक असतात. मक्याचे पीक निसवल्या नंतर एकरी 200 ते 300 ग्रॅम चिलेटेड झिंक आणि 4 किलो पोट्टयाशियम शोनाइट दिल्याने उत्पन्नात वाढ होते.
गहु
या वर्षी वाईट हवामानामुळे मावा, अळी, करपा, तांबेरा या रोगांना गव्हाचे पीक बळी पडले आहे, त्यासाठी मावा आणि अळी नाशकासोबत एम 45 आणि बविस्टीन या बुरशी नाशकांचा वापर करावा.
गव्हू निसवल्या नंतर परुंतु ओंबी पकव होण्यापूर्वी , लिहोसिन 30/35 मिली +5 मिली स्प्रेडर (15 लिटर पंपाला) फवारणी करावी ,तसेच याच अवस्थेत 80 ग्रॅम पोट्टयाशियम शोनाइट +5 मिली स्प्रेडरची फवारणी करावी , किंवा प्रोजीब 15 लिटर च्या पंपाला अर्धा ग्रॅम+स्प्रेडर 5 मिली अशी फवारणी केल्यास ,गव्हाच्या उत्पन्नात चांगली वाढ होते.
हरबरा
अत्यन्त कमी पाण्यात येणारे पीक आहे, उगवणीच्या वेळी एक ,दुसरे 35 दिवसांनी आणि 3 रे 70/75 व्या दिवशी अशा तीनच पाण्यात हे पीक घ्यावे ,कोरड मध्ये जमिनीतील वापशावर उगवण झाली असल्यास पेरणीनंतर 35 आणि 70 व्या दिवशी असे दोनच पाण्यात हे पीक चांगले येते. हरबऱ्याला जास्त पाणी दिल्यास मर किंवा उभळ खूप होते, यासाठी हलके पाणी देणे उपयुक्त ठरते ,पाट पाण्यापेक्षा तुषार सिंचनाने किंवा ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते.
हरबरा
अत्यन्त कमी पाण्यात येणारे पीक आहे, उगवणीच्या वेळी एक ,दुसरे 35 दिवसांनी आणि 3 रे 70/75 व्या दिवशी अशा तीनच पाण्यात हे पीक घ्यावे ,कोरड मध्ये जमिनीतील वापशावर उगवण झाली असल्यास पेरणीनंतर 35 आणि 70 व्या दिवशी असे दोनच पाण्यात हे पीक चांगले येते. हरबऱ्याला जास्त पाणी दिल्यास मर किंवा उभळ खूप होते, यासाठी हलके पाणी देणे उपयुक्त ठरते ,पाट पाण्यापेक्षा तुषार सिंचनाने किंवा ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते.
पीक एक दीड महिन्याचे झाल्यावर 19/19/19 100 ग्रॅम आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएन्ट 20 ग्रॅम +स्प्रेडर 5 मिली अशी फवारणी घेतल्यास उत्पन्नात वाढ होते.हरबरा या पिकाला पूर्ण फुल लागल्यावर घाटे सेट झाल्यावरच दुसरे पाणी द्यावे, फुलावर असताना पाणी दिल्यास मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊन उत्पन्नात घट येते, या पिकाला साधारणतः 55 ते 60 व्या दिवशी फुलोरा अवस्थेत आणि 70 ते 75 व्या दिवशी घाटे सेट झाल्यावर,15 लिटर पंपाला लिहोसिन 30 ते 35 मिली+स्प्रेडर 5 मिली अशी फवारणी करावी, त्यामुळे उत्पन्नात चांगली वाढ होते .
कांदा
मित्रानो कांद्यावर या वर्षी थ्रीप्स आणि करप्याचा अटॅक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे, त्यासाठी शेतकरी आलटून पालटून थ्रीप्स साठी कीटकनाशकांची आणि करप्यासाठी बुरशी नाशकांची फवारणी करत आहेत,कांदा हे पीक 55/60 दिवसाचे झाल्यावर निंदणी करूच नये, कांद्यावर 25 मिली सिलिसिक असिडच्या 10/12 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घेतल्यास थ्रीप्स चा अटॅक निश्चित कमी होतो,कांदा काढायच्या अगोदर किंवा लागवडी पासून 90/95 व्या दिवशी शेवटचे पाणी द्यावे,कांदा उत्पन्न वाढी साठी कांदा उपटायच्या 15 दिवस अगोदर पोत्याशियम शोनाइत ची पंपाला 80 ग्रॅम+स्प्रेडर 5 मिली अशी फवारणी करावि, त्यानंतर 2/3 दिवसांनी पंपाला 5 मिली स्प्रेडर + 30 मिली लिहोसिनची फवारणी करावि ,कांदा उत्पन्न वाढीत निश्चितच फरक पडेल. ज्याच्या कडे ड्रीप आहे त्यांनी पोत्याशियम शोनाइत एकरी 4 किलो सोडावे आणि वरील फवारणीही करावी उन्हाळ कांद्याला कमीत कमी 10 किलो जास्तीत जास्त 20 किलो सल्फर (विरघळणारे) वापरल्यामुळे उत्पन्नतवाढ होऊन, कांद्याची टिकवणं क्षमता चांगली वाढते.
Share your comments