1. कृषीपीडिया

तंत्रज्ञान एक, फायदे अनेक या पिकांसाठी उपयोग करा आणि अधिक उत्पादन मिळवा

ह्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने पाण्याची सर्व स्रोत धरणे, विहीरी, बोरवेल, शेततळे मध्ये पाणी भरपूर उपलब्ध आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तंत्रज्ञान एक, फायदे अनेक या पिकांसाठी  उपयोग करा आणि अधिक उत्पादन मिळवा

तंत्रज्ञान एक, फायदे अनेक या पिकांसाठी उपयोग करा आणि अधिक उत्पादन मिळवा

ह्या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने पाण्याची सर्व स्रोत धरणे, विहीरी, बोरवेल, शेततळे मध्ये पाणी भरपूर उपलब्ध आहे. पारंपारीक पाटपाणी सिंचन पद्धतीमध्ये पाणी पिकांना न देता जमिनीला दिली जाते, शिवाय दिलेली रासायनिक खतेही जमिनीतून झिरपून जातात. शेतकऱ्यांच्या मनात मोठा गैरसमज आहे की, खूप जास्त पाणी दिले की पिकांचे उत्पादन वाढते, मात्र तसे कधीच होत नाही. पिकांच्या मुळांजवळ जमिनीत कायम वाफसा पाहिजे असतो. पाटपाणी पद्धतीमध्ये कायम वाफसा राहत नसल्याने कधी पिकांच्या मुळाजवळ खूप पाणी असते त्यामुळे पिकांची पांढरी मुळे पाणी आणि खतांचे हवेचे संतुलन नसल्याने शोषण करू शकत नाही. काही वेळा

मुळांजवळ ओलावा / पाणी नसल्यानेही मुळे अन्नद्रव्यांचे शोषण करू शकत नाहीत. म्हणजेच पिकांना मुळाजवळ जादा पाणी झाल्याने आणि पाणी नसल्याने ताण पडतो

नि त्यामुळे पिकांची उत्पादन देण्याची क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकर्यानी अधिक उत्पादन मिळविण्यासाठी तसेच पाण्याचा कार्यक्षम वापरा साठी गहू, हरभरा, कांदा, बटाटा पिकांसाठी रेनपोर्ट स्प्रिंकलर्सचा उपयोग करावा ते अधिक फायदेशीर ठरेल. मका पिकासाठी ठिबक सिंचनाचा उपयोग करावा.

 रेनपोर्ट स्प्रिंकलर्सचे फायदे :

१. हरभरा,गहू, कांदा, लसुण, बटाटा ह्यांचे अधिक उत्पादन मिळते.

२. हरभरा, गहू, कांदा, लसुण,बटाटा ह्यांची गुणवत्ता चांगली मिळते.

३. पाणी वापरामध्ये ४० - ४५ % बचत होते.

४. रेनपोर्ट स्प्रिंकलर्सची पाणी वापर कार्यक्षमता ८० - ८५% आहे.

५.रेनपोर्ट स्प्रिंकलर्सचा पाण्याचा थेंब लहान असल्याने पिकावर,आदळत नाही, अलगद पडत असल्याने पिकाचे नुकसान होत नाही.

६. थेंब जमीनीवर आदळत नाही, जमीन दबत नाही, कडक होत नाही.

७. पाण्याच्या प्रत्येक थेंबावर नियंत्रण असते.

८. पिकास एकसमान पाणी देता येते, पाटपाणी प्रमाणे कमी अधिक होत नाही.

९. जमीन नेहमी वाफसा अवस्थेत ठेवता येते.

१०. रेनपोर्ट स्प्रिंकलर्स च्या वापरा मुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.

११. पिकांच्या अवस्थेनुसार पिकास सिंचन करता येते.

१२. जमिनीत कायम वाफसा राहील्याने वापर केलेल्या वाणाची उत्पादन क्षमता वाढवीता येते.

१३. रेनपोर्ट मुळे रस शोषण करणार्या किडींचा त्रास कमी होतो.

१४. रेनपोर्ट मुळे कमी पाण्यात, कमी वेळेत, कमी विजेत अधिक क्षेत्रास सिंचन करता येते.

१५. रेनपोर्ट मुळे पिकांचे धूके, थंडी पासून संरक्षण करता येते.

१६. रेनपोर्ट ची उभारणी सहज, सुलभ, सोपी आहे. सहज करता येते.

१७. रेनपोर्ट संच पिक निघाल्यावर गुंडाळून घरी नेता येतो.

१८. रेनपोर्ट स्प्रिंकलर्सची उभारणी १० x १० मिटर अंतरावर करावी.

१९. रेनपोर्ट स्प्रिंकलर्सची फारशी निगा देखभालीची गरज पडत नाही.

२०. रेनपोर्ट स्प्रिंकलर्स नेहमीच्या पितळी स्प्रिंकलर्स पेक्षा कमी दाबावर म्हणजे ठिबक च्याच दाबावर १.५ किचौमी वर उत्तम चालतात.

२१. रेनपोर्ट सिस्टीमला कमी देखभाल करावी लागत असल्याने दीर्घकाळ उत्तम चालतात.

२२. रेनपोर्ट स्प्रिंकलर्स मुळे पिकांचे कमी व अधिक तापमानापासून संरक्षण करता येते.

२३. पिक निहाय रेनपोर्ट स्प्रिंकलर्स ची उंची वाढविता येते.

२४. रेनपोर्ट स्प्रिंकलंर्सचा वापर सपाट जमिनीवर, सरी वरंबा आणि गादी वाफ्या वर लागवड केलेल्या पिकांसाठी करता येतो.

२५. रेनपोर्ट स्प्रिंकलर्सचा वापर गहू, हरभरा, कांदा, बटाटा, हळद, आले, लसुण पिकांसाठी अधिक उपयुक्त नि फायदेशीर आहे.

आले, हळद, सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, लसुण, बटाटा लागवडीचे प्रगत तंत्रज्ञान जैन इरिगेशनकडे उपलब्ध आहे.

 

डॉ. बी. डी. जडे

वरीष्ठ कृषि विद्या शास्त्रज्ञ,

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव

मो. 9422774981

English Summary: One technology and more benefits for crops use their take more production Published on: 21 April 2022, 01:42 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters