1. कृषीपीडिया

एका शेतकऱ्याचे महत्त्वाचे संशोधन. शेतकऱ्याला उघडावी लागली फॅक्टरी!

एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात केले शेकडो प्रयोग! 13 वर्षांची अविश्रांत धडपड, 370 शेतकऱ्यांची साथ व एक अदभूत शोध!

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
एका शेतकऱ्याचे महत्त्वाचे संशोधन. शेतकऱ्याला उघडावी लागली फॅक्टरी!

एका शेतकऱ्याचे महत्त्वाचे संशोधन. शेतकऱ्याला उघडावी लागली फॅक्टरी!

एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात केले शेकडो प्रयोग! 13 वर्षांची अविश्रांत धडपड, 370 शेतकऱ्यांची साथ व एक अदभूत शोध! जो करेल बळीराजाला चिंतामुक्त व समृद्ध !

महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी श्री चौरसिया यांनी शेतीतील अनेकविध समस्यांच्या मुळाशी जाण्याचे ठरविले आणि स्वतःच्या शेतात प्रयोग सुरु केले. अनेक तज्ञांशी चर्चा, शिबिरे, पुस्तके व स्वतःच्या विचारांतून शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग ! तात्पुरत्या मलमपट्टी ऐवजी चिरंतन उपायाचा शोध सुरु केला. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांनी हा संकल्प आणखी दृढ़ केला व सुरु झाली प्रयोगांची एक मालिका! सतत अभ्यास, प्रयोग व चिन्तन यातून संशोधनाची दिशा स्पष्ट झाली.

”जंगलामध्ये कोणीही खते टाकायला किंवा औषध फवारायला जात नाही पण तिथे हजारो प्रकारची झाडे व्यवस्थित येत आहेत. निसर्ग तिथे लाखो वर्षांपासून 100% नीट काम करतो आहे. तोच निसर्ग आपल्या शेतात 10% पण काम करू शकत नाही कारण आपण त्याच्या कामात नाक खुपसून त्याचे काम बिघडवले.”

चौरसिया सांगतात-“आम्हीच आमच्या शेतात गेल्या 50 वर्षात नकळत काही चुका करून शेतातील एकोसिस्टीम, जैविक प्रणाली संपवत आणली आहे. ती पुन:प्रस्थापित करणे गरजेचे आहे. असे केल्याने आज त्रास देणाऱ्या अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत.”

“मानवनिर्मित हे अडथळे दूर केल्यावर, निसर्गाची जैविक यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करू लागेल तर उत्पादन तीन पट होईल. कदाचित हे पटणार नाही पण आम्ही 13 वर्षात अनेक प्रयोगांती हे अनुभवले आहे” ते सांगतात तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो कारण हे होण्यासाठी त्यांनी शेकडो प्रयोगातून जी गोष्ट तयार केली आहे, त्या मल्टिप्लायरची लोकप्रियता एवढी वाढत गेली आहे की आता 22 राज्यांतून त्याची मागणी सुरु आहे. शेजारच्या शेतकऱ्यांना देता देता मागणी वाढल्याने त्यांना याची फॅक्टरीच उभी करावी लागली.

या यशाचे रहस्य विचारता चौरासियाजी मल्टिप्लायरच्या रिझल्टकडे बोट दाखवतात. माणसाने कितीही बिघडवून ठेवले तरी ते दुरुस्त करण्याचे रहस्य निसर्गात असतेच. ते गुपित दिल्याबद्दल निसर्गाचे ते आभार मानतात. त्यांच्यामते ‘एका दगडात दहा बारा निशाणे’ साधण्याची किमया या संशोधनामुळे म्हणजेच एका मल्टिप्लायरमुळे घडते.

जमिनीतून पलायन केलेले गांडूळ परतून शेत हजारों गांडूळांनी भरून जाते. दरवर्षी2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळ खत शेतकऱ्याला फ्री मध्ये मिळू लागते. प्रति ग्रॅम 1 करोड पेक्षा कमी झालेला बॅक्टेरिया काऊंट 10 करोड पेक्षा अधिक होतो. जमिनीतील ऑक्सिजन वाढून पिकाचे शत्रू विषाणू नष्ट व्हायला लागतात. पिकास नैसर्गिकरित्या एवढे अन्न उपलब्ध व्हायला लागते की पिके धष्ट पुष्ट होऊन कीड-रोग शेतातून हद्दपार होते. रासायनिक खते व विषारी किटनाशकांचा खर्च शून्यावर येऊन उत्पादन पहिल्या वर्षी 50 टक्यांनी वाढते. 5 ते 7 वर्षात उत्पादन तिप्पट होते. जमिनीचा पीएच बॅलन्स होतो, त्यातील सेंद्रिय कर्ब वाढतो. जमीनीचा कडकपणा पूर्ण जाऊन ती मऊ, भुसभुशीत व सुपीक होते.

उत्पादन तिप्पट झाल्यावर, निसर्गाची सिस्टीम पूर्ण सेट झाल्यावर, मल्टिप्लायर वापरण्याची गरज नाही हे चौरासियाजी आवर्जून सांगतात. एक सच्चा शेतकरीच असे सांगू शकतो. तिथून पुढे देशी गायीचे शेण हे वाढलेले तिप्पट उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.

“निसर्ग आता तुमच्या शेतात 100% ताकदीने काम करायला लागल्यावर परत आंधळेपणाने रासायनिक खते-औषधांच्या मागे धावू नका” असा प्रेमळ सल्ला द्यायला ते विसरत नाहीत. आजही वयाच्या साठीमध्ये सुद्धा हजार-पंधराशे किलोमीटर स्वतः ड्रायव्हिंग करत ते जेव्हा शेतकऱ्यांना भेटायला पोहचतात, तेंव्हा त्यांच्या “सेंद्रिय भारत” मिशनची तळमळ आपल्याला प्रेरणा देते.शेतकरी व शेतीला जीवनदान देणाऱ्या मल्टिप्लायरचे रहस्य उलगडल्या बद्दल निसर्गाचे परत परत आभार मानताना.

शेतीतील बिघाड मुळापासून दूर केल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. त्यांच्या जिद्दीला मनातल्या मनात सलाम करत आपण फॅक्टरीतून बाहेर पडतो.

(हे क्रांतिकारी संशोधन आपल्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी व खरेदी करण्यासाठी अग्रोभेट यांच्याशी संपर्क साधता येईल )

संपर्क: 8275921244 ,9767981244 , 8468920311

 

- krushi kranti

English Summary: One farmer important reasearch this farmer open to factory Published on: 30 April 2022, 11:14 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters