बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना मध्ये भिंतीवर कार्यालयाची वेळ व तालुका अधिकारी व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांचा मोबाईल नंबर लँडलाईन नंबर असावा , सतीश मवाळ यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशु वैद्यकीय डॉक्टरची सुविधा नसते तर कधी गुरांना बकऱ्यांना जनावरांना कुठल्याही प्रकारची औषधे नसते .शिवाय पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नाही .खाजगी डॉक्टर जनावरे तपासण्याचे काम करतात .
अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भिंतीवर कार्यालयाच्या कामकाजाची वेळ व तालुका वैद्यकीय अधिकारी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांचा मोबाईल नंबर लँडलाईन नंबर लावावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सतीश मावळ यांनी निवेदनाव्दारे केली आहे .
मेहकर तालुक्यातील साह्यक पशुधन अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याबाबत पशुधन विकास अधिकारी (विस्तार)ता मेहकर यांनी पत्राद्वारे वरिष्ठांकडे कळवले आहे.
बरेचसे कर्मचारी मुख्यालयी राहत नसून शंभर ते दीडशे प्रवास करावा लागत असल्यामुळे हे कर्मचारी वेळेत पोहोचत नाही .पंधरा दिवसातून एखाद्या वेळेला हे येत असतात .त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग मजूर पशुधन बिमार पडल्यास खाजगी डॉक्टरकडून उपचार करावा लागतो त्यामुळे खाजगी डॉक्टर असल्यामुळे साह्यक पशुधन व पशुधन पर्यवेक्षक अधिकारी हे कामचुकारपणा करतात .त्यामुळे अधिकार यांचा मोबाईल नंबर द्वारे संपर्क साधून कार्यालयीन माहिती मिळेल व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपले म्हणणे जाईल व होणारा त्रास वाचेल असे मागणी या वेळी मावळ् यांनी निवेदना व्दारे केली .
त्यांनी पुढे निवेदनात म्हटले आहे की .पशुवैद्यकीय दवाखाना त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तोंडखुरी पायखुरी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात लेखी कळवावे .तसेच ग्रामपंचायत कार्यालय मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी तालुका अधिकारी यांचा मोबाईल नंबर भिंतीवर लिहावा
दवाखान्यामध्ये तालुका पशुवैद्यकीय अधिकारी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांचा मोबाईल नंबर व लँड लाईन नंबर सुद्धा भिंतीवर लिहिण्यात यावा .ग्रामीण भागातील गाय म्हैस बैल शेळ्या मेंढ्या शासकीय योजना व जनावरांसाठी वैरण इत्यादी पशुसंवर्धन खात्यांतर्गत देणाऱ्या योजना गावातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ग्रामपंचायतला लेखी कळवावे .
वरील विषयानुसार पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये बरेच अधिकारी गावागावांमध्ये जनजागृती करत नसल्यामुळे दिवसेंदिवस अधिकार्याकडून घडताना दिसत आहे तरी सत्य परिस्थिती अवगत करण्यासाठी मागील तीन वर्ष
पशुवैद्यकीय दवाखाने अंतर्गत येणारया गावांमध्ये काय योजना राबविण्यात आले याची चौकशी कैल्यास सत्य परिस्थिती वरिष्ठांनी अवगत होईल .व सर्वसामान्य गरीब होतकरू पशुपालन व्यवसायिकांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून प्राथमिक उपचार व मार्गदर्शन मिळावे व कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सतीश मावळ् यांनी केली आहे .
Share your comments