ताग, धैचा, मूग, गवार, चवळी, उडीद, बरशीम या पिकांची निवड केली जाते.ही पिके जमिनीत मुख्यपिक किंवा आंतरपिक म्हणून लावतात. आणि पीक फुलावर येण्याअगोदर जमिनीमध्ये गाडतात. हिरवळीच्या पिकासाठी व्दिदल पिकांची निवड करावी. कारण त्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीतील जीवाणू हवेतील नत्र स्थिर करून ठेवतात. ही पिके कमी पाण्यावर येणारी असावीत आणि त्याची मुळे खोल जाणारी असावीत. हिरवळीच्या खताच्या पिकापासून जास्तितजास्त हिरवी पाने मिळतील आणि त्या पिकाचे अवशेष जमिनीमध्ये लवकरात लवकर कुजणारे असावेत.
त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.
ताग : तागाचे बियाणे हेक्टरी ४0 ते ५0 किलो लागते. हे शेतात पावसाळी हंगामाअगोदर पेरावे. साधारणपणे ४0 ते ५५ दिवसात (पेिक फुलोन्यात असतांना) १00 ते १२0 सें. मी. पिकांची वाइ झाल्यावर जमिनीत गाडतात. त्यामुळे जमिनीत ४० ते ८० किलो नत्र वाढते. या खताचा भात पिकासाठी वापर केल्यास लुंपादनात ६0 ते ८0 टक्के वाढ होतें.
धैचा : हे एक हिरवळीचे उत्तम पीक आहे.
हे पीक क्षारपड जमिनीमध्ये आणि भात पैिकामध्ये घेता येते. त्यामध्ये नत्राचे प्रमाण 0.४२ टक्के आहे. हे पीक जर्मनीत गाड़ल्यानंतर पिंकास हेक्टरी ६0 ते (90 केिली नत्र मिळतो. त्यासाठी २o ते ४o केिलो बियाणे प्रतेि हेक्टरी पेरून पेिकाची वाढ ३ ते ४ फुट उंची झाल्यावर ४0 ते ५५ दिवसात जर्मनीमध्ये गाडावे. धैचाचे हिरवळीचे खत वापरल्यामुळे भात उत्पादनात २० टक्के वाढ दिसून आली आहे.
हिरवळीची पिके जमिनीत गाडतांना घ्यावयाची काळजी
हिरवळीच्या पिकांना स्फुरदयुक्त खते द्यावीत.
त्यामुळे हिरवळीच्या पेिकांचे उत्पादन वठ्ठते.पीक फुलो-यात असताना त्याची कापणी करून टूक्टरच्या साहाय्याने मशागत करून जमिनीत गाड़ावेंत.या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे व पावसाचे प्रमाण जास्त अशा ठिकाणी हिरवळीच्या पिकांचा वापर करावा. त्यामुळे लवकरात लवकर कुजण्यास मदत होईल.ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून ताग किंवा धैचा यांचा वापर केल्यास ऊस उत्पादन वाढविण्यास मदत होते.
Share your comments