शेतकरी, शेतमजूरा़ंच्या प्रश्नावर शेगाव येथे स्वाभिमानीची बैठक संपन्न.शेगाव / सुस्त प्रशासन, बेशिस्त राज्यकर्त्ये, व निगरगठ्ठ सरकारला वठणीवर आणण्यासाठी ४ ऑक्टोबरला शेगाव तहसिलवर शेतकरी शेतमजुरांचा आसुड मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी २५ संप्टेबर रोजी शेगाव येथील कुणबी समाज भवन येथे शेतकरी शेतमजुरांच्या पार पडलेल्या बैठकीत
बोलतांना केली. सतत अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेली नुकसानीची सरसकट मदत,Immediate relief for crop damage due to continuous heavy rains, विना अट पिक विमा, लम्पी रोगांवर तत्काळ उपचार,
वाचा वाल पिकाची लागवड तंत्रज्ञान व माहिती
जणावरे दगावलेल्या पालकांना मदत, राज्यात स्वतंत्र शेतमजुर कल्याण महामंडळ स्थापन व शेतमजुरांना सर्व सुविधा लागु, पि एम किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर शेतमजुरांना दरमहा चार हजार रुपये मानधन लागू
करा, या सर्व मागण्या संदर्भात ४ ऑक्टोबर रोजी शेगाव तहसिलवर आसुड मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात आपल्या न्याय हक्कासाठी जात पात पक्ष बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर या नात्याने एकत्र येऊ हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेऊन रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज व्हा असा सल्लाही डिक्कर यांनी बोलतांना दिला. या शेगाव तहसिलवर
निघत असलेल्या ४ ऑक्टोबर च्या आसुड मोर्चात सर्व शेतकरी शेतमजूरांनी आणि बहुसंख्य तरुणांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बैठकीत बोलतांना केले. बैठकीला शेगाव शहरातील व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी शेतमजूर उपस्थित होते. बैठकीचे नियोजन स्वाभिमानीचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केले होते.
Share your comments