1. कृषीपीडिया

साठवलेल्या धान्यांना अजिबात कीड लागणार नाही फक्त हे करून बघा

बऱ्याच घरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असल्यामुळे, त्यांना धान्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करावी लागते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
साठवलेल्या धान्यांना अजिबात कीड लागणार नाही फक्त हे करून बघा

साठवलेल्या धान्यांना अजिबात कीड लागणार नाही फक्त हे करून बघा

बऱ्याच घरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असल्यामुळे, त्यांना धान्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करावी लागते. ही साठवणूक केल्यानंतर किडे किंवा अड्या धान्यांमध्ये होत असतात. त्याला जाळी लागू नये, म्हणून त्यामध्ये औषध किंवा गोळ्यांचा वापर बहुतेक जण वापर करत असतात.

शेतकऱ्यांनी शेतातील उत्पादन काढल्यानंतर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मक्का, हरभरे हे काढल्यानंतर शेतकरी धन्याला जोपर्यंत चांगला भाव मिळत नाही. तोपर्यंत आपल्याकडे साठवून ठेवत असतो. कारण की त्याला व्यवस्थित भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी धन्य विक्रीला काढत नाहीत आणि ही साठवणूक करत असताना शेतकऱ्यांच्या मनात एक भीती दडलेली असते.

हे धान्य साठवल्यानंतर त्याला वेगवेगळे किडे लागतात. त्यामुळे धान्याची नासाडी व्हायला लागते किंवा साठवलेल्या धान्यामध्ये सुंडे होतात. कडधान्याचा आपण विचार केला तर हरभरे किंवा तूर असेल तर ते किडे आत मध्ये जाऊन बसतात. कितीही प्रयत्न केले तरी ते बाहेर निघत नाही आणि सर्व कडधान्य पोकळ करून टाकतात.

 

तसेच या धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला वेगळ्या प्रकारचे केमिकल किंवा रसायन, गोळ्या सुद्धा मिळतात परंतु या रसायनांचा वापर धान्यावर तर होईल परंतु ते धान्य मानव खात असल्यामुळे त्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

तर हे सगळं असताना आपण घरच्या घरी देखील या साठवणुकीतील धान्याला कीड लागू नये, म्हणून काय उपाय योजना करायला पाहिजेत. हे धान्य साठवून ठेवताना जर आपण एक छोटासा प्रयोग केला तर जो काही कीड आहे, तो कीड सुद्धा लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे की तुमच्याकडे पेपर असेल.

न्यूज पेपरचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करायचे आहेत आणि ज्या वेळेस धान्य आपण पोतडी मध्ये किंवा कशामध्ये साठवण करतो, त्यावेळेस त्या पेपरचे तुकडे त्यामध्ये टाकायचे आहेत. तर यामध्ये काय होतं की पेपरला जी शाई असते, 

त्या शाईच्या वासाने सर्व किडे बाहेर निघून येतात. त्यामुळे आपले धान्य सुरक्षित तर राहतेच आणि खाण्यामध्ये त्यात विषबाधा देखील होत नाही.

हा एक घरगुती सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारा उपाय आहे. दुसरा उपाय देखील आहे, साठवणुकीच्या अगोदर कडुलिंबाचा पाला वाळून तो धान्यांमध्ये टाकायचा आहे. त्यामुळेदेखील त्या धान्याला कीड लागत नाही व कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू शकत नाही. खाण्यासाठी विषबाधा देखील होत नाही. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

 

संदर्भ:शेतकरी. इन

English Summary: Not will be attack off store grain only do this procedure Published on: 17 February 2022, 07:50 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters