शेतकऱ्याचे नवीन जैविक मित्र आधुनिक शेतीला ठरतील फायदेशीर

04 June 2020 06:18 PM By: Pradip Balaso Bhapkar


आधुनिक शेतीमध्ये नवीन प्रयोग नेहमी केले जातात कारण त्यामधून पिकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, मातीचे व पर्यावरणाचे आरोग्य सुधारले जावे. सध्या रासायनिक खतांचा होणारा बेफाम वापरामुळे मातीचे आरोग्य खराब होत आहे, तसेच पिकांमध्ये अवशेष राहिल्या कारणाने मानव जातीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आहे. त्यासाठी त्याला पर्याय म्हणून ह्युमिक अॅसिड, फुल्विक अॅसिड, सिलिकॉन आणि सीवीड हे नवीन शेतकऱ्यांचे मित्र होऊन रासायनिक खातांना व औषधांना उत्तम पर्याय होऊ शकतात.  काही दिवसांपुर्वीच सरकारने काही रासायनिक औषधांवर बंदी घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे आता पर्यायी कीटकनाशके आणि औषधे, खतांचा पर्याय असणे आवश्यक झाले आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही आज आपल्याला जैविक खतांची माहिती देत आहोत.

सिलिकॉन: आजच्या मितीला एकाच जमिनीमधून एकामागून एक पिकांचे उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे जमिनीमध्ये पिकांच्या वाढीसाठी उपयुक्‍त मुलद्रव्यांची कमतरता भासू लागली आहे. ही मूलद्रव्ये काही वर्षापूर्वी पिकांना जमीन, पाणी व हवेच्या माध्यमातून मिळत.  पण सध्या यांची कमतरता भासत असून त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर आणि आरोग्यावर होताना दिसतो आहे. वनस्पतींना आवश्‍यक १६ मूलद्रव्यांसोबतच सिलिकॉन, सोडियम व कोबाल्ट ही उपयुक्‍त अन्नद्रव्येही वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्‍यक आहेत. त्यामध्ये सिलिकॉन या मूलद्रव्याचे अलीकडच्या काळामध्ये शेतीमधील महत्व वाढले आहे.


जमिनीमधील सिलिकॉन हे वाळूच्या स्वरूपात असल्याने उपलब्धता कमी असते. झाडे सिलिकॉनचा वापर फक्‍त सिलिसिक आम्ल (Silicic acid) रूपातच चांगल्याप्रकारे करतात. जमिनीमध्ये सिलिसिक ऍसिड प्रमाणे ०१ ते १०० मिलिग्रॅम प्रति घन डेसीमीटर एवढे असते, त्यामुळे पिकांना विद्राव्य रूपातील सिलिकॉनयुक्‍त खताचा पुरवठा करणे गरजेचे आहे. सिलिकॉन मूलद्रव्याचे पिकांच्या विविध घटकांवरील होणारे परिणाम खालील प्रमाणे,

 • सिलिकॉनयुक्‍त खतांचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर जलधारण शक्ती वाढते, जिवाणूंचे कार्य सुधारते, अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन सुलभरीत्या होण्यास मदत करते. जमिनीचा सामू सुस्थितीमध्ये राहतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते व जमिनीमधून पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.
 • सिलिकॉन मुलद्रव्याच्या वापरामुळे पिकांच्या पानांचा आकार वाढला जातो. ज्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चांगल्या प्रमाणात होते; ज्यामधून अन्न निर्मितीची क्रियेमध्ये वाढ होते, त्यामुळे उत्पन्न वाढीस मदत होते.
 • सिलिकॉनमुळे वनस्पतींच्या पेशी पृष्ठभागावर पातळ व टणक थर तयार होतो. त्यामुळे किडींना आणि रोगांच्या विषाणुंना पानावर रुजण्यास अडचण तयार होते. त्यामुळे रोग व किडींच्या विरोधी प्रतिकार क्षमता वाढण्यास सिलिकॉनचा वापर गरजेचा आहे.
 • सिलिकॉनच्या वापरामुळे रासायनिक खतामधील नत्र, स्पुरद व पालाश अन्नद्रव्यांचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो. रासायनिक खतांचा जरी जमिनीमध्ये वापर केला तरी पिकला त्याची उपलब्धता होईलच असे नाही कारण बऱ्याचदा या खतांचा ऱ्हास वेगवेगळ्या मार्गाने होत असतो. सिलिकॉनमुळे या अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगल्या प्रमाणात होते ज्यामुळे उत्पन्नवाढ होते.
 • सिलिकॉनच्या वापरामुळे पिकांमध्ये काटक्ता वाढते, त्यामुळे पीक लोळण्याचे प्रमाण खूप कमी होते.
 • सिलिकॉनच्या वापरामुळे ऊसातील साखरेचे प्रमाण सुधारले जाते. फळांमध्ये चकाकी येते, धान्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
 • सिलिकॉनचे विविध रासायनिक स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यातील काही खालील प्रमाणे

१. सिलिसिक ऍसिड:- २९ %      २. कॅल्शिअम सिलिकेट स्लॅग:- १८-२१ %

३.कॅल्शिअम सिलिकेट:- २४ %     ४. पोटॅशिअम सिलिकेट:- १८ %

५.पोटॅशिअम सिलिकेट:- १८ %

ह्युमिक अॅसिड: सेंद्रिय घटकाच्या (जनावरांची विष्ठा व मूत्र, पालापाचोळा आणि शेतातला इतर काडी कचरा कुजून त्याचे विघटन होऊन तयार झालेला पदार्थ म्हणजे ह्युमस. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये ह्युमिक अॅसिड मिळून जात जे पोटेशियम ह्युमेट रुपात असते.  ज्यामध्ये ह्युमिक अॅसिडवरती कॉस्टिक पोटॉशची प्रक्रिया करून तयार होते. तर अशा शेतीसाठी महत्वाच्या घटकाचे फायदे जाणून घेऊयात,

 • ह्युमिक अॅसिड वालुकामय मातीमधील पाण्याचा व अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी करते; त्याचबरोबर ह्युमिक अॅसिड वालुकामय मातीला कुजवून उपजावू जमिनिमध्ये रुपांतरीत करते. ज्यामध्ये जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
 • पांढऱ्या मुळ्यांची वाढ जलदगतीने करण्यासाठी ह्युमिक अॅसिडचा वापर फायद्याचा ठरतो.
 • मातीला तडा जाणे, पृष्ठभागावरून पाण्याचा बहाव कमी करते आणि मातीची धूप थांबवण्यात ह्युमिक अॅसिड महत्वाची भूमिका निभावते.
 • ह्युमिक अॅसिडमुळे मातीची पाणी साठवण्याची क्षमता वाढवते आणि त्यामुळे दुष्काळाचा प्रतिकार करण्यास मदत होते.
 • ह्युमिक अॅसिडमुळे मातीचा रंग गडद होतो त्यामुळे सूर्याची उर्जा शोषण्यास मदत होते.
 • आम्लयुक्त व क्षारयुक्त मातीच्या सामूमध्ये तटस्थता आण्याचे काम ह्युमिक अॅसिड करते.
 • अन्न्द्रावे व पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढली जाते.
 • ह्युमिक अॅसिड अनेक जैविक प्रक्रियांमध्ये सेंद्रिय उत्प्रेरक म्हणून काम करते.
 • पिकांची नैसर्गिक रोग व किडींच्या विरोधात लढण्यासाठीची प्रतिकार क्षमता वाढवते.
 • मुळांची श्वसन प्रक्रिया सुधारते, मुळांच्या वाढीस उत्तेजन देते व मुळांची निर्मिती वाढवते.
 • हरितद्रव्यांची, साखरेची व अमिनो आम्लाचा विकास चांगल्या पद्धतीने होतो.
 • वनस्पतींमधील जीवनसत्व आणि खनिज पदार्थ प्रमाण वाढवते.
 • बियाण्याची उगवण क्षमता आणि व्यवहार्यता वाढवते.
 • पेशींची विभागणी वाढवून पीक वाढीस उत्तेजन देते (जास्त बायोमास उत्पादन),
 • उत्पन्न वाढण्यास मदत होऊन; भौतिक आणि पौष्टिक मूल्य सुधारण्यास मदत करते.

फुल्विक अॅसिड: हा पदार्थ सुद्धा सेंद्रिय घटकाच्या विघटनानंतर तयार होतो. याची आम्लता ह्युमिक अॅसिड पेक्षा जास्त असते.

 • बियाण्याची उगवण क्षमता व रोपाची वाढ सुधारली जाते.
 • मुळांची व अंकुराची वाढ विकसित करण्यास मदत होते.
 • बुरशीजन्य रोगांच्या विरोधात लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते.
 • पिकांमधील रसायनांचा समतोल राखला जातो व श्वसनाची क्रिया सुधारली जाते.
 • सुपीक माती तयार करण्यास मदत करते. त्याचबरोबर नत्र स्थिरीकरण करण्यास मदत करते.
 • पिकाच्या उत्पन्नामध्ये व गुणवत्तेमध्ये वाढ करते.
 • हरितद्रव्यांचे संश्लेषण वाढवते, अजैविक पदार्थांचा व जड धातूंचा नाश करते.
 • अन्न्द्रावे व पाणी शोषून घेण्याची क्षमता वाढली जाते.

सीवीड अर्क- समुद्री शैवाल हे सुक्ष्मदर्शक सागरी शैवाल आहे. यांचा वापर मानवी अन्न म्हणून, जनावरांसाठी चारा, रासायनिक खताचा पर्याय आणि विविध सूक्ष्म रसायनांचा स्त्रोत म्हणून वापरतात. सध्याच्या शेतीमध्ये रासायनिक खातांना योग्य पर्याय म्हणून सागरी शैवालांपासून तयार केलेल्या अर्काचा वापर चांगला होतो आहे. त्याचे उपयोग खालील प्रमाणे,

 • सीवीडमध्ये ६० ट्रेस खनिजे आणि वापरण्यास तयार असलेले पोषक घटक आहेत. ज्यात नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फेट आणि मॅग्नेशियम असतात. यात वनस्पतींच्या वाढीस प्रोत्साहित करण्यासाठी संप्रेरक देखील आहेत.
 • सीवीड मातीचे कंडिशनर म्हणून काम करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
 • सीवीड १.२ % नायट्रोजनपासून बनवलेले असते, ज्याचा वापर केला तर पानांची वाढ होण्यास मदत होते त्याचबरोबर सीवीडमध्ये पोटॅशियम देखील असते, ज्यामुळे झाडे अधिक जोमाने वाढण्यास मदत होते.
 • सीवीडमध्ये फॉस्फरस असते, जे झाडांना निरोगी आणि मजबूत मुळांची प्रणाली विकसित करण्यास मदत करते.
 • सीवीडच्या वापरामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते, तसेच पाणी मुरण्याची प्रक्रिया सुधारली जाते.
 • झाडांच्या नवीन फुटव्यांची वाढ प्रोत्साहित करण्यास सीवीड चांगली भूमिका पार पाडते.
 • कापणीच्या १० दिवस आधी वापरल्यास ते फळ आणि भाज्यांची टिकण्याची क्षमता वाढली जाते.
 • सीवीडचा वापर नवीन मुळांची वाढीसाठी करू शकतो, फाटे कलमांमध्ये खालच्या बाजूची तिरपा काप घेतलेली फांदी सीवीडच्या द्रावणामध्ये बुडवावी; जेणेकरून मुळांची फुट लवकर होण्यास मदत होईल.
 • सीवीडच्या वापरामुळे अन्न्द्रावे शोषून घेण्याची क्षमता वाढली जाते, प्रथिन्यांचे प्रमाण वाढते व पिकांची गुणवत्ता सुधारली जाते.
 • पिकांची रोग प्रतिकार वाढवण्यास मदत करते, मातीपासून अजैविक घटकांचे सेवन वाढवते आणि दुष्काळ सदृश्य परस्थितीमध्ये पिकांमध्ये ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
 • सूक्ष्म अन्न द्रव्यांची उपलब्धता सीवीडच्या वापरामुळे सुधारली जाते.

organic fertilizers modern agriculture seaweed fulvik acid humic acid increase yield जैविक खाते आधुनिक शेती सीवीड अर्क शैवाल अर्क ह्युमिक अॅसिड
English Summary: New organic fertilizers beneficial in Modern agriculture

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.