आपल्याला माहीत असेल निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून ज्यांना निंबोळ्या म्हणतात, व त्या पासून काढलेला अर्क होय. आपनास माहीत असेल की कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'ॲझाडिराक्टीन' हे जैविक कीटकनाशकाचे काम करते. कडुलिंबाच्या झाडाला फेब्रुवारी ते मार्च महिन्यांत मोहोर येतो आणि मे महिन्याच्या शेवटी निंबोळ्या पक्व होऊन त्यांचा सडा झाडाखाली पडतो. या निंबोळ्या गोळा करून त्यातील दगड व कचरा आणि पाला पाचोळा वेगळे करून गोणी मधे वर्षभर साठविता येतात.आता तयार करण्यासाठी कोणकोणते साहित्य पाहीजे हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कडुनिंबाच्या निंबोण्या पूर्णता सुकलेल्या ५ किग्रॅ
पाणी – १०० लिटर
रिठा पावडर (२०० ग्रॅम)
गाळण्यासाठी लागणारा कापड
या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकावरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो. मावा, अमेरिकन बोंड आळी, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबी वरील अळ्या, फळ माशा, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.
किडीवर काय आणि कसा परिणाम होतो?
अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळाकडू वासामुळे पिकाच्या पानांवर फुलांवर कोवळ्या शेंड्यावर मादी कीटक अंडी घालत नाही त्यामुळे पुढील पिढी तयार होण्यास अडथळा निर्माण होतो.
प्रजोत्पादन प्रक्रियेत अडचण येण
निंबोळी अर्काचा फवारणी मुळे किडीमध्ये नपुसकता येते तर मादी मध्ये लिंग आकर्षण कमी मी होते परिणाम पुढील पिढी तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
पिकापासून परावृत्त करणे
निंबोळी अर्काचा कडू वासामुळे कीड जवळ येणे टाळते कात टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येणे किडीची नैसर्गिक वाढ होताना होळी अगर पिल्लू अवस्थेत शरीर वाढीसाठी नियमित कात टाकते आवश्यक असते निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे त्यात व्यत्यय येतो.
अविकसित प्रौढ तयार होणे
अशा अवस्थेतून निघालेल्या प्रौढ पिढीमध्ये विकृती अपंगत्व येणे अविकसित पंख तयार होणे इत्यादी प्रकार आढळतात त्यात बरोबर प्रजोत्पादन क्षमता मंदावते आणि पुढील संभाव्य नुकसान कमी होऊ शकते.
कालावधी कमी होणे
निंबोळी अर्काचा संपर्कात आलेल्या किडीच्या विविध अवस्थांवर घातक परिणाम होऊन त्याचा जीवन कालावधी कमी होतो.
कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती
कृषी विस्तार अधिकारी
श्री प्रमोद मेंढे सर
माहीती संकलण -मिलिंद जि गोदे
Share your comments