1. कृषीपीडिया

Organic: कडुनिंबाचा अर्क म्हणजे किडींचा कर्दनकाळ, 'अशा' पद्धतीने होतो कडुनिंबाच्या अर्काचा उपयोग, वाचा डिटेल्स

सध्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. तसेच मानवी आरोग्यावर देखील होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून देखील विविध पावले उचलण्यात येत आहेत. जर सेंद्रिय शेतीमधील वापर करायचा साधनांचा विचार केला तर यामध्ये सेंद्रिय खते तसेच विविध प्रकारचे जैविक कीटकनाशके यांचा अंतर्भाव होतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
neem arc is so useful in insect management in crop

neem arc is so useful in insect management in crop

सध्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. तसेच मानवी आरोग्यावर देखील होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून देखील विविध पावले उचलण्यात येत आहेत. जर सेंद्रिय शेतीमधील वापर करायचा साधनांचा विचार केला तर यामध्ये सेंद्रिय खते तसेच विविध प्रकारचे जैविक कीटकनाशके यांचा अंतर्भाव होतो.

नक्की वाचा:क्लोरोपायरीफोस हे वापरतात तरी नेमकं कशासाठी? हे आधी जाणून घेऊ

या सगळ्या घटकमध्ये कडुलिंब एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. जर आपण पिकांवरील विविध किडींच्या नियंत्रणासाठी कडुलिंबाच्या अर्काचा उपयोग पाहिला तर शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरतो. या लेखात आपण कडूनिंबाच्या अर्कापासून किडींचे नियंत्रण कोणत्या मार्गाने करता येते त्याबद्दल माहिती घेऊ.

 कडुनिंबाचा अर्क म्हणजे किडींचे नियंत्रणात हमखास उपाय

 कडुनिंबाचा अर्क वापरल्यामुळे पिकांवरील ज्या काही किडींच्या मादी असतात त्यांना अंडी घालण्यापासून परावृत्त करता येते.

कडुलिंबाच्या अर्कामुळे किडींची अंडी उबवण्याची जी काही क्षमता असते त्यामध्ये अडचणी निर्माण होतात. या प्रक्रियेमध्ये अंड्याच्या आतील भागामध्ये ढवळाढवळ झाल्यामुळे प्रभावी नियंत्रण मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे  कडुनिंबाच्या तीव्र वासामुळे देखील विविध किडींना पिकांपासून दूर ठेवता येणे शक्य आहे.

नक्की वाचा:विविध मागण्या घेऊन दिवाळीच्या दिवशीच स्वाभिमानी च्या प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आंदोलन

कडुनिंबाच्या बियांपासून तसेच तेलापासून तयार केलेला अर्क पिकांवर फवारणी साठी वापरला तर किडींना खाद्य प्रतिबंध होतो. जर आपण कडुलिंबातील अझाडिरेक्टिन या घटकांचा विचार केला तर हा घटक किडींचे वाढ थांबवण्यासाठी मदत करतो तसेच किडींना कात टाकण्यास देखील प्रतिबंध करतो. त्यामुळे किडींचा गुदमरून मृत्यू होतो. कडूलिंबापासून बनवण्यात आलेला अर्क व कीडनाशके ही कीटकांवर आंतरप्रवाही कीटकनाशकां प्रमाणे कार्य करतात.

कडुनिंबाच्या पाने तसेच फळे व झाडाच्या सालीपासून किडनाशक तयार करता येते. मावा, तुडतुडे,, ठिपक्याची बोंड आळी, गुलाबी बोंड आळी, हिरवी बोंड आळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी आळी, फळमाशी तसेच ज्वारी व मक्यावरील खोडकिडा, टोमॅटो या पिकावरील सूत्र कृमी, लाल कोळी, शेंडा व पाने पोखरणारी अळी व लष्करी आळी इत्यादीं कीटकांच्या नियंत्रणासाठी हा अर्क महत्वपूर्ण ठरतो.

नक्की वाचा:Wheat Crop: पाणी कमी उत्पादन जास्त! गव्हाच्या या जबरदस्त वाणाला 35 दिवस सिंचनाची गरज नाही; शोषून घेते 268 पट जास्त पाणी

English Summary: neem arc is so perfect for integreted management of various insect on crop Published on: 27 October 2022, 04:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters