पिकांवर जेव्हा विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो तेव्हा त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधू विविध कीटकनाशकांचा वापर करतात.या रासायनिक किटकनाशकांचा वापरामुळे उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढतो. याला एक चांगला पर्याय म्हणून आपण निंबोळी अर्काचा वापर करू शकतो.कारण निंबोळी अर्क बनवणे सोपे असून खर्चदेखील कमी आहे. या लेखात आपण निंबोळी अर्काचे फायदे जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा:आज आपण सगळेच जण परेशान आहे एका किडीने जाणून घ्या सविस्तर
निंबोळी अर्क म्हणजे काय?
आपल्याला माहित आहे कि निंबोळी अर्क म्हणजे कडूलिंब हे जे काही झाड असते लिंबोड्यापासून काढलेला अर्क होय. जर आपण कडुलिंबाच्या झाडाचा विचार केला तर साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान या झाडाला मोहोर येतो आणि मे महिन्याच्या अखेरीस लिंबोळ्या परिपक्व होतात.
आपण पाहतो की,लिंबोळ्या पक्व झाल्यानंतर झाडाखाली अक्षरश: निंबोळीचा खच पडलेला असतो. या सगळ्या निंबोळ्या वेचून ते आपल्याला एखाद्या पोत्यांमध्ये किंवा व्यवस्थित पद्धतीने संपूर्ण वर्षभर त्याचा साठा करता येतो. या निंबोणीच्या आपल्याला वर्षभर अर्क आणि पेंड तयार करण्यासाठी वापर करता येतो.
कडू निंबाच्या झाडाचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यामध्ये अझाडीरेक्टिन कीटकनाशकाचे काम उत्तम पद्धतीने करते याचे प्रमाण निंबोळ्यामध्ये जास्त असते. हा घटक सूत्रकृमी विषाणू आणि बुरशी यांचे नियंत्रण करण्यासाठी खूप उपयोगी ठरतो त्यासोबतच रसशोषक किडीवर देखील चांगला परिणामकारक आहे.
नक्की वाचा:पपई ,केळी,टोमॅटो आणि भाजीपाला पिकावरील व्हायरस आणि त्यांचे व्यवस्थापन
निंबोळी अर्कचे फायदे
निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. जर तुम्ही सर्व प्रकारच्या पिकांवर 15 दिवसांच्या अंतराने नियमित फवारणी घेतली तर रसशोषक किडीच्या जीवनचक्रात अडथळा निर्माण होऊन त्यांचे नियंत्रण होते.
एवढेच नाही तर काही पतंगवर्गीय किडींना देखील अंडी घालण्यापासून परावृत्त केले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निंबोळी अर्क हा एक नैसर्गिक घटक असल्याकारणाने त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रासायनिक अंश नसतो. सेंद्रिय शेतीमध्ये याचा आपल्याला वापर करता येतो.
विशेषता भाजीपाला पिकांसाठी निंबोळी अर्काची फवारणी खूप महत्त्वाचे ठरते. निंबोळी अर्काचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रासायनिक कीटकनाशकासोबत देखील वापरता येते त्यामुळे किडींचे एकात्मिक नियंत्रण पद्धती मध्ये याचा वापर करता येतो.
पांढरी माशी, फुलकिडे तसेच मावा सारख्या किडींच्या नियंत्रणासाठी खूप लाभदायी सिद्ध होते. निंबोळी अर्क हे कीटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही कीटकनाशक प्रमाणे काम करते.
Share your comments