प्लास्टिक टनेल हे एक प्रकारचे हरितगृहच आहे. याकरिता पारदर्शक प्लास्टिक फिल्मचा वापर करण्यात येतो. याच्या अर्धगोलाकार आकारामुळे जास्तीतजास्त सूर्यप्रकाशाचा उपयोग करून घेता येतो. त्याचप्रमाणे पाणी व तापमानाचा होणारा ऱ्हास कमी करता येतो. या प्रकारच्या टनेलची उभारणी कमी खर्चात करता येते. सदरची टनेल्स प्रामुख्याने फळपिके, पुष्पोत्पादन या पिकांच्या कलमा /रोपांचे आणि उती संवर्धनातील रोपांच्या बळकटीकरणासाठी तसेच भाजीपाला उत्पादनासाठी उपयुक्त आहे.
प्लास्टिक टनेलसाठी पी व्ही सी आणि एल डी पी ई प्लास्टिक वापरण्यात येते. सर्वसाधारणपणे २० मेश किंवा त्यापेक्षा कमी आकाराची प्लास्टिक जाळी वापरण्यात येते.
तथापि पी व्ही सी फिल्मची जाडी ५० ते १२० मायक्रॉन इतकी आवश्यक आहे. प्लास्टिक टनेलची लांबी ३० मीटर पर्यंत ठेवल्यास व्यवस्थापनास सोयीचे होते. रुंदी वाफ्याच्या रुंदीप्रमाणे व सापळ्याप्रमाणें बदलता येऊ शकते.
१. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
२. लाभार्थी पात्रता -
अ. योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांसाठी आहे.
ब. यापूर्वी लाभ दिलेल्या लाभार्थ्यास अनुदान देय नाही.
क. अनु.जाती/ अनु जमाती/महिला शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य.
३. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
. ७/१२
.- ८ अ
आधार कार्डाची छायांकित प्रत
. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
. पासपोर्ट फोटो
४ . शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा
५ . अर्थसहाय्य
एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त १००० चौ मीटरचे टनेल उभारणीसाठी अनुदान देण्यात येते. सर्वसाधारण क्षेत्रासाठी रुपये ६०/- प्रति चौ मीटर व डोंगराळ क्षेत्रासाठी रुपये ७५/- प्रति चौ मीटर
असा खर्चाचा मापदंड आहे. सर्वसाधारण क्षेत्रासाठी ५० टक्के जास्तीत जास्त रुपये ३००००/- व डोंगराळ क्षेत्रासाठी ५० टक्के जास्तीत जास्त रुपये ३७५००/- इतके अनुदान देय आहे. अनुदानाचे वितरण PFMS प्रणालीद्वारे लाभार्थीचे आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
मार्गदर्शक सूचना
https://drive.google.com/open?id=1FJrn0KiilRkrnXRGIQpwIt7TBogLzWNb
अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
Share your comments