सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्तानिकरीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.
१. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
२. अर्थसहाय्यचे स्वरूप -
५, १०, १५, २० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये ३५००/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील.
एका लाभार्थ्याला २५ मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील.
३. लाभार्थी निवडीचे निकष -
अ . शेतकऱ्याने योजने अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
ब . शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
क . सादर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.
४. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
अ . ७/१२
ब. ८ अ
क. आधार कार्डाची छायांकित प्रत
ड. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
इ. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
ई. यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र
५ . शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करावे. पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक आहे .
मार्गदर्शक सूचना
https://drive.google.com/open?id=1ia6f_vIbIZXDeS5jbbkaywtbjGdx0wLY
अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
Share your comments