रब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून, त्यात मोहरी, जवस अशा पिकांचे प्रमाण तुलनेने कमी होत आहे. या पिकांच्या लागवड व्यवस्थापनाची माहिती घेऊ.जवस जमीन : या पिकासाठी मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी व चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.सुधारित वाण : एन एल -९७ व पी. के. व्ही. एन. एल. -२६०बियाणे : ८ ते १० किलो प्रतिहेक्टरी
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास कार्बेन्डाझीम Carbendazim per kg of seed before sowing किंवा थायरम किंवा कॅप्टन २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.पेरणी अंतर व पद्धत : ४५ x १० सेमी. किंवा ३० x ३५ सेमी.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कसे राहतील समोरचे दिवस वाचा
खतमात्रा प्रतिहेक्टरी : कोरडवाहूसाठी - ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद बागायतीसाठी -६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद.अांतर पिके : जवस + हरभरा (४:२),जवस + करडई (४:२),जवस + मोहरी (५:१)उत्पादन : ५ ते ७ क्विंटल प्रतिहेक्टरी
मोहरी जमीन : या पिकासाठी मध्यम ते भारी व चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.सुधारित वाण : पुसा जयकिसान, पुसा बोल्ड, शताब्दी आणि जी एम-३बियाणे : ५ किलो प्रतिहेक्टरीबीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे. पेरणीच्या आधी बियाणे ओलसर पोत्यात ठेवले असता उगवण चांगली होते.परणी अंतर व पद्धत : ४५ x १५ सेमी. किंवा ३० x ३५ सेमी.
खतमात्रा प्रतिहेक्टरी : कोरडवाहूसाठी - ४०किलो नत्र, २० किलो स्फुरद -संपूर्ण पेरणीच्या वेळीबागायतीसाठी - ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी आणि उरलेले नत्र ३० ते ३५ दिवसांनी)अांतरपिके : गहू + मोहरी (४:२ किंवा ६:२)पाणी व्यवस्थापन : ओलिताची सोय असल्यास,पहिले पाणी शेंगा लागताना (५०ते ५५ दिवसांनी),दुसरे पाणी दाणे भरताना (७०ते ७५ दिवसांनी)उत्पादन :बागायती- १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्टरी,कोरडवाहू- ८ ते १० क्विंटल प्रतिहेक्टरी.
Share your comments