राज्यात विजपुरवठा (power supply) वेळेवर होत नसल्याने अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सातत्याने विजपुरवठा सुरू राहावा यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
त्यामुळे विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी 'महावितरण'च्या वीज वितरण प्रणालीचे आणखी सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण गरजेचे असून त्यासाठी १४ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे सांगितले आहे. या बातमीने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील वीज वितरण यंत्रणा (Power distribution system) स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेपैकी १४ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च हा केवळ वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणावर होणार आहे.
Cultivation Of Plants: होय खरंय! फळापासून पानापर्यंत मिळणार भरघोस कमाई; करा 'या' वनस्पतीची लागवड
वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेमध्ये यामुळे सुधारणा होणार असून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे दावा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केला आहे. माहितीनुसार १४ हजार कोटींच्या निधीतून राज्यात विविध ठिकाणी ३७७ नवीन उपकेंद्रे उभारली जाणार आहेत.
Insecticide: शेतकरी मित्रांनो घरीच बनवा नैसर्गिक किटकनाशक; पैशांची होईल मोठी बचत
तसेच २९९ उपकेंद्रांत अतिरिक्त रोहित्र बसविले जाणार आहेत. २९२ उपकेंद्रांची क्षमतावाढ करून सुमारे २९ हजार ८९३ नवीन वितरण रोहित्रे बसविली जातील. याशिवाय उच्चदाब भूमिगत वाहिनी टाकण्यात येणार असून यामुळे ग्राहकांना २४ तास अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा (Power supply) करणे सोयीचे होईल, असेही विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.
राज्यातील वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता वाढवून आर्थिक स्थिरता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक साहाय्याने सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे महावितरणच्या वीज वितरण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडून येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
PM Suraksha Bima Yojana: महिन्याला फक्त 1 रुपया जमा करा; सरकार देतंय 2 लाखांचा लाभ
Agricultural Business: शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात शेतीच्या बांधावर लावा 'ही' झाडे; मिळेल भरघोस उत्पन्न
Insurance Policy: फक्त 20 रुपयांमध्ये मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत विमा; जाणून घ्या प्रोसेस
Share your comments