निवडणूक म्हटलं की जनतेचे प्रतिनिधी, मते आणि आश्वासन आलेच ! पण हे सर्व आटोपल्यावर जो जनतेची सेवा करतो तोच खरा जनतेचा प्रतिनिधी असतो. हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दाखवून दिले आहे. आमदार रोहित पवार युवा कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे आमदार आहेत. ते त्यांच्या मतदारसंघात लोकांना नेहमीच मदत देण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांना मदत करत असतात. याशिवाय, रोहित पवार (Rohit Pawar) राज्यातील जनतेशी कनेक्ट राहण्यासाठी, अनेक गोष्टींबद्दलची माहिती देण्यासाठी, काही महत्वाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर कायम सक्रीय राहतात.
आता त्यांची एक पोस्ट शोधलं मीडियावर अशीच चर्चेत आली आहे ज्या मुळे रोहित पवार याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राज्यात अनेक भागांत ऊसतोड चालू असताना अनेक मजूर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असतात. शेतात ते ऊसतोड करून शेतातच त्याच ठिकाणी राहत असतात. हलाखीची परिस्थिती असताना गावोगावी पोटापाण्याकरता ते फिरत असतात. असंच आता रोहित पवारांच्या मतदारसंघातील सांगलीमध्ये ऊसतोडीला एक कुटुंब गेले असता त्यांचा दुचाकी अपघात झाला होता.
झालं असं की, रोहित पवारांच्या मतदारसंघातील एका कटुंबामधील प्रविण फुंदे या चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं. या अपघातात प्रवीणच्या मेंदूलाही जबर मार लागला होता. या वेळी त्या मुलाच्या उपचारासाठी रोहित पवारांनी धाव घेऊन मदत केली. वेळेला केलेली मदत त्या कुटुंबासाठी उपकारापेक्षा कमी नव्हती. त्या मुलाचे वडील हरिदास फुंदे यांनी आग्रह करून आमदार पवारांना घरी बोलावून त्यांचे अनोख्या अंदाजात आभार मानले.
आमदार रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट लिहीत झालेल्या घटनेबाबत बरीच माहिती दिली. ते म्हणाले, “सांगलीमध्ये ऊसतोडीला गेले असताना दुचाकी अपघातात माझ्या मतदारसंघातील प्रविण फुंदे या चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर व मेंदूला जबर मार लागला होता.
काही शासकीय योजनांमार्फत त्याच्यावर उपचार करण्यासाठी वेळोवेळी गरज पडेल तेव्हा लक्ष घातल्याने त्याचे वडील हरिदास फुंदे यांनी आग्रह करून मला घरी बोलावलं. घरी गेल्यावर माझ्यावर त्यांनी फुलांचा वर्षाव केला”, असं ते म्हणले.
पुढे ते म्हणाले, “वैद्यकीय उपचारांसाठी गरजूंना नेहमीच मदत करत असतो पण काल अचानक झालेल्या या अनोख्या स्वागताने भारावून गेलो व लोकांसाठी अधिक जोमाने काम करण्यास बळ मिळालं. विशेष म्हणजे प्रविण आता बरा झाला असून त्याला भेटून खूप आनंद वाटला”, असं पोस्ट मध्ये रोहित पवारांनी लिहिलं आहे. यांनतर बऱ्याच यूजर्सने कमेंट बॉक्समध्ये रोहित पवारांच्या कामाचं कौतुक करत कमेंट्स केल्या आहेत.
Share your comments