1. कृषीपीडिया

सुधारित मूग जातींची निवड आणि त्यांचे व्यवस्थापन

KJ Maharashtra
KJ Maharashtra
moong

moong

 गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने खरी पा  सोबतच उन्हाळी मुगही फायद्याचा ठरू शकतो. पाण्याची आणि सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्यास रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग घेता येतो यासाठी उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत जातींची लागवड करावी. मूग पीक 60 ते 65 दिवसांत पक्व होतो. या काळात पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या देणे आवश्‍यक आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामानामुळे पीक चांगले पोसून चांगले उत्पादन मिळते.

 जमीन

 मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन यासाठी आवश्यक असते. क्षार गिफ्ट आणि पाणथळ तसेच उतारावरील हलक्‍या ते निकस जमिनीत मूग लागवड करू नये. अशा जमिनीत मुळावरील रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नाही. परिणामी रोपे पिवळी पडतात.

 योग्य वाणांची निवड

 उन्हाळी मुगाकरिता पुसा वैशाखी, वैभव या जातींची शिफारस आहे. प्रकाशाला असंवेदनशील जसे एकेएम 8802, पीकेव्ही ग्रीनगोल्ड या जातींची निवड उन्हाळी हंगामात लागवडीसाठी करता येईल.

 पूर्वमशागत

 मशागतीची फारशी आवश्यकता नसते. रब्बी हंगामातील पीक निघाल्यानंतर हलकी नांगरट करून वखराच्या उभ्या-आडव्या पाळ्या द्याव्यात व जमीन भुसभुशीत करावी.

 पेरणीची वेळ

 उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारी चा शेवटचा आठवडा ते मार्च चा पहिला पंधरवडा या काळात करावी. त्यापेक्षा लवकर पेरणी केल्यास थंडीचा पिकाच्या उगवणीवर परिणाम होतो. उशिरा पेरणी केल्यास पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते

पेरणीची पद्धत व अंतर

 उन्हाळी मुगाची पेरणी साधारणतः तिफणीने किंवा पाभरीने करावी. पेरताना दोन ओळीतील अंतर 30 सेंटिमीटर व दोन रूपातील दहा सेंटिमीटर ठेवावे.

 बियाण्याचे प्रमाण

 हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी शिफारशीप्रमाणे एकरी पाच ते सहा किलो बियाणे वापरावे. घरचे बियाणे असल्यास दर तीन वर्षांनी बदलावे. घरचे बियाणे वापरण्यापूर्वी उगवणशक्ती तपासून घ्यावी.

 बीजप्रक्रिया

  • पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्यरोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी
  • बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर तीन तासांनी मुगाच्या मुळावरील रायझोबियम च्या गाठींचे प्रमाण वाढण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक 250 ग्रॅम प्रत्येकी प्रति दहा किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.

 खत व्यवस्थापन

 लागवडीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत एकरी आठ ते 10 टन मिसळावे. पेरणी वेळी एकरी 50 किलो डीएपी द्यावे.

 पाणी नियोजन

  • मुगाची पेरणीपूर्वी एक पाणी द्यावे व नंतर पेरणी करावी.
  • पेरणीनंतर पहिल्यांदा तीन ते चार दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पहिल्या हलक्या पाणी नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे  व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. एकूण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पिकांच्या संपूर्ण कालावधीत द्यावे. विशेषता पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा तयार होताना या नाजूक अवस्थांमध्ये मुगास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

 आंतर मशागत

 पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी हलकीशी डवरणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास दहा ते बारा दिवसांनी परत एखादी निंदणी  करावी. शक्यतो पेरणीपासून 30 ते 35 दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.

 विद्राव्य खतांची फवारणी

  • फुलोरा अवस्थेत असताना दोन टक्के युरिया वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
  • मुगाच्या शेंगा भरत असतांना दोन टक्के डीएपी 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारावे. त्यासाठी एकरी शंभर लिटर पाणी फवारण्यासाठी दोन किलो डीपी दहा लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून, सकाळी ते द्रावण ढवळून घ्यावेव गाळून घ्यावे.हे द्रावण 90 लिटर पाण्यात मिसळल्यास दोन टक्क्यांची डीएपीची द्रावण तयार होते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters