पेन्शन प्लॅन’ हा एक अत्यंत लोकप्रिय गुंतवणूक प्रकार. उतार वयात किंवा निवृत्तीनंतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, दर महिन्याच्या खर्चासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज करण्यासाठी अनेक जण आता ‘पेन्शन प्लॅन’मध्ये (Pension Plan) गुंतवणूक करीत असतात.. त्यासाठी बाजारात अनेक पर्यायही उपलब्ध आहेत.
केंद्र सरकारनंही 1 जून 2015 रोजी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं एक खास योजना सुरु केली होती. अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) असं या योजनेचं नाव. सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य आनंदात जावे, यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरु केली.या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
अटल पेन्शन योजनेबाबत.
मोदी सरकारच्या या लोकप्रिय योजनेत तुम्हाला दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळते. सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील कोणताही नागरिक घेऊ शकतो. केंद्र सरकारची ही अशी योजना आहे, ज्यात तुम्हाला मासिक 5000 रुपये मिळतात.
विशेष म्हणजे, तुम्ही विवाहित असाल, तर तुम्हाला दुप्पट म्हणजेच 10,000 रुपये मिळतात. पती-पत्नी अशा दोघांनीही या योजनेसाठी अर्ज केल्यास, त्यांना 10,000 रुपयांचा लाभ मिळतो. ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी’ने याबाबतची माहिती दिली.
किती पैसे भरावे लागतील?
अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना दरमहा प्रीमियमची ठराविक रक्कम भरावी लागते. अर्जदार 18 वर्षांचा असल्यास दरमहा 210 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तीन महिन्यांनी 626 रुपये, तर 6 महिन्यांनी 1239 रुपये भरावे लागतील. दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी वयाच्या 18 व्या वर्षी फक्त 42 रुपये भरावे लागतील.
मासिक, त्रैमासिक व सहामाही पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्ही वयाच्या 42 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक 1.04 लाख रुपये होते. त्यानंतर 60 वर्षांनंतर तुम्हाला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळू लागते. शिवाय आयकर कलम 80CCD अंतर्गत या योजनेत कर सवलतीचाही लाभ मिळतो.
60 वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्यास.
दरम्यान, तुम्ही सदस्याच्या नावाने फक्त 1 खाते उघडू शकता. या योजनेत तुम्ही बँकेतून खाते उघडू शकता. योगदानाची रक्कम पहिल्या 5 वर्षांसाठी सरकार देईल. या योजनेचा लाभ 60 वर्षांनंतर मिळण्यास सुरुवात होते. मात्र, समजा वयाच्या 60 वर्षांपूर्वीच एखाद्याचा मृत्यू झाला, तर या योजनेचे पैसे मृताच्या पत्नीला दिले जातात. पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाल्यास, पेन्शनचे पैसे नामनिर्देशित व्यक्तीला मिळतात
Share your comments