सध्या शेतकरी पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड (Modern agriculture) देत चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. याचे उदाहरण म्हणजे खामकरवाडी येथील शेतकरी. येथील शेतकरी शाश्वत आणि जास्त उत्पादन देणाऱ्या तुतीची शेती करत आहेत.
खामकरवाडी (Khamkarwadi) येथील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून (Silk Farming) आधुनिक क्रांती घडवत आपल्या गावाचा आर्थिक गाडा रूळावर आणला आहे. रेशीम रेतीच्या माध्यमातून येथील शेतकरी लोखोंचे उत्पादन मिळवत आहेत.
पारंपारिक शेती (Traditional farming) करत असताना खूप कष्ट करावे लागते आणि हवा तसा मोबदला देखील मिळत नसल्याने शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत नाही. ही बाब ओळखून येथील शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करीत शेतात तुतीची लागवड केली आहे. शेती करत असताना जोड व्यवसाय करत आहेत.
हे ही वाचा
Onion Rate: कांद्याच्या दरात चढ की उतार? जाणून घ्या आजचा कांदा बाजारभाव...
आज शेती व्यतिरिक्त पशुसंवर्धन, कुकुट पालन, शेळीपालन असे जोडधंदे घेतले जातात. नवीन युगाचे नवीन व्यवसाय म्हणजेच रेशीम शेती (Silk farming). हा व्यवसाय अगदी कमी खर्चात करता येतो. आज रेशीम शेतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळेत सर्वात जास्त उत्पन्न घेता येते.
पारंपारिक शेती फायद्याची ठरत नव्हती
खामकरवाडी हे रेशम उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. रेशमचे गाव अशी या गावाची नवी ओळख बनत आहे. खामकरवाडी या गावतील अनेक नागरिकांचा व्यवसाय हा शेतीचं. गावाची लोकसंख्या देखील जवळपास जेमतेम दीड हजार.
हे ही वाचा
Horoscope: ऑगस्टमध्ये 'या' चार राशींचे भाग्य उजळणार; वाचा सविस्तर
जवळपास सर्वच शेतकरी हे अल्पभूधारक असल्याने पारंपारिक पद्धतीने शेती (Traditional Farming) करणे शेतकर्यांना फायद्याचे ठरत नव्हते. जमिनीची आद्रताही कमकुवत असल्याने नगदी पिकांना म्हणावा तेवढा उतार पडत नसायचा. त्यामुळे गावातीलच काही शेतकर्यांनी शेतात नवनवीन प्रयोग करायला सुरूवात केली.
सोयाबीन, हरभरा, गहू आणि ज्वारी यांसारख्या पिकांसाठी कष्ट खूप आणि हवा तेवढा मोबदला ही मिळत नसे. म्हणून खामकरवाडी या गावातील शेतकर्यांनी पारंपारिक शेती न करता विकसित शेती (farming) करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते रेशीम शेतीतून चांगले उत्पादन घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
Cultivation Of Vegetables: कमी मेहनत जास्त उत्पन्न; 'या' भाजेपाल्याची कधीही करा लागवड
Cultivation Of Agriculture: शेतकरी मित्रांनो 'या' शेतीची करा लागवड; वर्षाला ८ ते १० लाखांचा होतोय नफा
Gas Cylinder Subsidy: तुम्हाला गॅस सिलिंडरवर सबसिडी किती मिळते? जाणून घ्या घरबसल्या..
Share your comments