खतांची बोगसगीरी म्हणजेच निकृष्ठ दर्जाचे खतं ही मिक्स फर्टिलायझर्स मध्ये जास्तीत जास्त होते. आणि विशेष म्हणजे या खतांचा बनविण्याचा फार्म्युला अत्यंत कालबाह्य पडल्यामुळे ही खते शेतीस वापरासाठी अत्यंत अनावश्यक आहेत. त्या खतांची शेतीला अजिबातच गरज नाही.मी फोटो मध्ये उदाहरणा दाखल एक फोटो घेतलाय. महाराष्ट्रात शेकडो कंपन्या मिश्र खतांची वेगवेगळी खते
विकतात. आपण जसा चिवडा बनवतो तशी मिश्र खते बनत असतात.As we make chivda, mixed fertilizers are made.म्हणजे गरम तेलात पोहे शेंगदाणे मिरची पावडर मीठ असे पदार्थ टाकायचे व त्याला मिक्स करायचं.हीच पद्धत मिश्र खते बनवताना वापरतात.चिवड्यात कुठं शेंगदाणा असतो तर कुठं डाळ.सगळीकडे सारखे प्रमाण नसते. हे चिवड्यात दिसतं तसं मिश्र खत बनवल्यावर कचा माल म्हणून वापरलेल्या राखेमुळे ओळखू येत
नाही हा फरक. कोणता पदार्थ किती टाकलाय हे मिश्र खतांच्या बाबतीत डोळ्याला दिसत नाही. युरिया फॉस्फेट पालाश एकत्र करून हा खत मोठमोठ्या मशिनमधून मिक्स केला जातो .पण प्रमाना पेक्षा खूप कमी खत वापरून हा खत तयार केला जातो.उदाहरणादाखल बघुयात, 18:18:10 या मिश्र खता मध्ये पर 100 किलोला 18 किलो नत्र म्हणजे युरिया , 18 किलो स्फुरद म्हणजे फॉस्फेट व 10 किलो पालाश
म्हणजे पोट्याश असायला हवा. पण मी माझ्या आजपर्यंतच्या अनुभवावरूनअसं खात्रीपूर्वक सांगतो की एखादी अपवादात्मक कंपनी सोडली तर आपल्या राज्यात सर्व कंपन्या सर्रासपणे निकृष्ठ खतं शेतकऱ्यांच्या माथी मारतात. म्हणजे प्रत्यक्ष त्या कंपन्यांच्या खतांचे नमुने प्रामाणिकपणे तपासले तर (तशी सोय आजपर्यंतच्या सर्व शेतकरी विरोधी सरकारांनी या देशात होऊ दिली नाही) 18:18:10
ऐवजी 08;08:05 ही निघत नाही. किंवा याच प्रमाणात कमी जास्त अहवाल येतो. या मध्ये प्रामुख्याने प महाराष्ट्रात संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निकृष्ट असा बोगस खत खूप मोठ्या प्रमाणात विकला जातो. तिकडचे संघ हे शक्यतो मोठया नेत्यांचे असतात. नाव खूप मोठं असतं त्यांचं. त्यामुळे शेतकरी डोळे झाकून खते विकत घेतो त्यामुळे त्यांची फसवणूक होते. प. महाराष्ट्रनंतर
तिकडे नाशिक द्राक्ष पट्टा व त्यानंतर मराठवाड्यातील संभाजीनगर व नांदेड मध्ये असा खत खूप मोठया प्रमाणावर बनवल्या जातो व मराठवाड्यासह बाजूच्या बिदर्भात ही मोठ्या प्रमाणावर विकल्या जातो.बरं हे एव्हढं बोगस काम राजकीय पक्षाचे नेते, राज्य सरकारचा कृषी विभाग, पोलीस, सरकार, नेते, शेतकरी संघटना , सामाजीक संघटना यांना माहीत नसेल काय..? तर ते सर्वांना माहीत असतेच. यातले पोलीस तेव्हढे स्वतः होऊन ईकडे छापा टाकून
कायदेशीर कार्यवाही करू शकत नाहीत. कारण याबाबतीतले कायदेच तसे आहेत. बाकीच्या सर्वांची पैसे देऊन तोंडे बंद करून ही बोगसगिरी चालू असते.मग आता ही मिश्र खतांची बोगस गिरी कशी थांबवायची?यावर एकच उपाय शेतकऱ्यांनी हे कालबाह्य झालेले सर्व मिश्र खते विकत घेणे बंद करावे. केवळ दर्जेदार कंपण्यांचे संयुक्त खते विकत घेऊन आपल्या पिकांना वापरायचे हा एकमेव उपाय मला सद्यातरी दिसतोय.
ही पोस्ट शेअर कॉपीपेस्ट होऊद्यात माझ्या शेतकरी भावंडा साठी
संतोष गव्हाणे पाटील
9763390876
प्रदेशाध्यक्ष
संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी
Share your comments