1. कृषीपीडिया

जिवाणू मुळेच आपल्याला उत्पन्न मिळते

शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यायचे असेल तर जमिनी जिवंत असल्या पाहिजे, म्हणजे जमिनीत जास्त प्रमाणात जिवाणू असले पाहिजे

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
जिवाणू मुळेच आपल्याला उत्पन्न मिळते

जिवाणू मुळेच आपल्याला उत्पन्न मिळते

शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यायचे असेल तर जमिनी जिवंत असल्या पाहिजे, म्हणजे जमिनीत जास्त प्रमाणात जिवाणू असले पाहिजे.

मूठ भर मातीत करोडो जिवाणू असतात, आणि या जिवाणू मुळेच आपल्याला उत्पन्न मिळते, पण गेल्या 50 वर्षांपासून रासायनिक खतांचा आपण इतका वापर केला की ह्या जिवाणूंची संख्या आपण 10 टक्क्यांवर आणून ठेवली आहे,जमीनीत जिवानु जीवंत आहेत की नाही यातही शंकाच आहे.असाच रासायनिक खतांचा सातत्याने वापर केला तर शेत जमिनी बंजर

,क्षारपड, खारट, नापीक,होतील.पुढे काही दिवसांनी अशा जमिनीत तणही उगवणार नाही.आपण कितीही रासायनिक खतांचा वापर केला तर ती खते जशीच्या तशी पिके ग्रहण करीत नाहीत तर त्या खतांवर प्रक्रिया करून पिकाना उपलब्ध करून देण्यासाठी जमिनीत मोठ्या प्रमाणावर जिवाणू असले पाहिजे,तरच जमिनीची उत्पादकता वाढेल. 

रासायनिक खते हे जिवाणूंचे खाद्य नाही,जिवाणूंचे खाद्य आहे जमिनीतील सेंद्रिय कर्ब.जमिनीत असलेल्या सर्व प्रकारच्या कास्ट पदार्थांपासून हुमस तयार होतो, हुमस पासून सेंद्रिय कर्ब तयार होतो व हा सेंद्रिय कर्ब म्हणजे जिवाणूंचे खाद्य असतो, आपण जमिनीत टाकलेल्या खतांवर हे जिवाणू जैविक ,भौतिक रासायनिक क्रिया घडवून आणतात व ते पिकाला ग्रहण करण्या योग्य करण्याचे काम करतात, आपल्या जमिनीत असे काम हे जिवाणू अहोरात्र करीत असतात ज्या जमिनीत सजीवसृष्टी जास्त असते अशा जमिनीचा सेंद्रिय कर्ब ही जास्त असतो, रासायनिक खतांचा भडिमार करून आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब खूप कमी करून टाकलेला आहे.आणि म्हणून उत्तरोत्तर आपले उत्पन्न कमी कमी होत आहे.

म्हणून आपण जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे ,जमिनीचे आरोग्य सुधारल्या शिवाय, जमीन आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊ शकणार नाही.

जमिनीची उत्पादकता वाढविण्या साठी रासायनिक खतांचा वापर थांबवने आवश्यक आहे. गाईच्या शेन व गोमुत्रापासुन शेतातच तयार केलेल्या सेंद्रिय, व जैविक खतांचा वापर वाढवला पाहिजे.त्यासाठी शेणखत,कंपोस्ट खत,पाझर तलावांचा गाळ, हीरवळीची खते, प्राण्यांचे मलमूत्र इत्यादी चा वापर केला पाहिजे .

      थोडक्यात म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा, जिवाणूंची संख्या वाढवा उत्पन्नात आपोआप वाढ होईल.पीक हे सजीव आहे त्यालाही सर्व प्रकारच्या अन्न घटकांची आवश्यकता असते.

याबरोबरच मुख्य अन्न द्रव्य दुययम व सूक्ष्म अन्न द्रव्ये आपण या माध्यमातुन मीश्रपीकातुन जमिनीला पुरवली पाहिजे ,योग्य वेळी योग्य त्या त्या निवीष्ठांचा वापर करून पिकाची प्रतिकार क्षमता वाढवली पाहिजे, पिकाची प्रतिकार क्षमता वाढली तर त्यावर रोगही कमी पडतात कीड नाशकेही कमी लागतात व उत्पन्नातही वाढ होते.

          सर्वच माझे मताशी सहमत असतील असे नाही,पन जेवढे सुचले तेवढे आपल्यासमोर या माध्यमातुन मांडन्याचा प्रयत्न केला.          

    गजानन खडके,

नैसर्गिक विषमुक्तशेती,महाराष्ट्र.

 942265757

English Summary: Microbs through take we production Published on: 23 January 2022, 01:41 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters