1. कृषीपीडिया

पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोग प्रतिबंध उपाय

भाजीपाला पिके तसेच इतर नगदी पिकावर कोणता ना कोणतातरी विषाणूजन्य रोग येत असतो.जसे मिरची वर येणारा चुराडा-मुरडा/बोकड्या,कलिंगड व वेलवर्गीय फळभाज्यांवर येणारा कुकरबीट मोझ्याक व्हायरस,भेंडी वर येणारा येल्लो व्हेन मोझ्याक व्हायरस,तसेच पपई सारख्या फळ पीकावर तर तीन प्रकारचे विषाणू येतात.अशाच प्रकारचे अनेक विषाणूजन्य रोग व त्यांचे सर्व साधारण व्यवस्थापन पाहुयात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोग प्रतिबंध उपाय

पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोग प्रतिबंध उपाय

कोणताही विषाणू सजीव वस्तू च्या संपर्कात येताच सक्रिय होतो.इतर वेळी ते निर्जीव अवस्थेत किंवा सुप्तावस्थेत असतात.

 त्यांचा वनस्पतीमध्ये शिरकाव कसा होतो?

   वनस्पतीला शेती अवजारांद्वारे झालेल्या इजामधून किंवा रसशोषक किडीच्याद्वारे केल्या गेलेल्या पंक्चर मधून, इतर कोणत्याही कारणामुळे वनस्पतीवरील आघातामुळे विषाणूंचा वनस्पतीच्या शरीरात शिरकाव होतो. व ते सक्रिय होऊन वनस्पतींमधील  अन्न घेऊन त्यांची संख्या स्वतःहून वाढवण्यास सुरु करतात.

   

प्रसरण:-

   एकदा शिरकावं झाल्यानंतर त्यांचं प्रसरण ते स्वतःहून करत नाहीत,तर ते अनेक रसशोषक किडींच्या माध्यमातुन होते.उदा.पांढरी माशी,फुलकिडे,मावा,तुडतुडे.

   जर एक झाड कोणत्याही विषाणूजन्य रोगास बळी पडले,आणि त्याच बरोबर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव असेल तर रोग पूर्ण शेतात खूप वेगाने पसरतो. कारण एकदा विषाणूग्रस्त झाडातील रस किडींनी शोषला तर विषाणूचे अंश त्यामध्ये येतात.आणि जेव्हा तो कीटक निरोगी झाडातील रस शोषतो त्याच वेळी विषाणू चा शिरकावं त्या झाडांमध्ये होतो.हे सर्व काही 60 ते 70 सेकंदात घडते.असे हजारो कीटक शेतामध्ये असतात.त्यामळे यांचं प्रसारण भरपूर वेगाने होते.

रसशोषक किडी

(मावा,तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशी इ. ) या विषाणूजन्य रोगांचे वाहक(vector) म्हणून काम करतात.

  

 सर्वसाधारण लक्षणे:-

   कोणत्याही विषाणूजन्य रोगाची लक्षणे ही झाडाच्या वरील भागात मुख्यतः पानांवर दिसतात.

   पानांच्या कडा आखडायला सुरवात होते,शेंडा व कोवळी पाने सुरकुतून जातात.

   भेंडीवर येणारा येल्लो व्हेन मोझ्याक पहिला तर त्यामध्ये पानांच्या शिरा पूर्ण पिवळ्या होतात.झाडाची उंची खुंटते.फळे लागत नाहीत किंवा लागली तर आकाराने खूप लहान असतात.

   वेलवर्गीय फळभाज्यावर येणारा घातक रोग म्हणजे कुकरबीट मोझ्याक व्हायरस(CMV).याचा प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण वेलच आकखडायला सुरू होतो.

सर्वात मुख्य आणि लवकर दिसणारे लक्षण म्हणजे पाने आखडून जाणे.

 

प्रतिबंधात्मक उपाय:-

कोणत्याही पीकाची लागवड करण्याआधी त्यामध्ये येणाऱ्या विषाणूजन्य रोगांचा थोडा अभ्यास करावा.सदर पिकाचे त्या विषाणूसाठी रोगप्रतिकारक वाण उपलब्ध असेल तर त्याचीच लागवडीसाठी निवड करावी.

लागवड केल्यानंतर पहिल्या आठवड्यातच एकरी 30 ते40 पिवळे व निळे चिकट सापळे लावून घ्यावेत.3 पिवळ्या सापळ्यामध्ये एक निळा या प्रमाणात लावून घ्यावेत.यामुळे रसशोषक किडीची संख्या कमी होईल व रोग प्रसारणास आळा बसेल.

पिवळ्या चिकट सापळ्यास आकर्षित होणारे कीटक:-

मावा,पांढरी माशी,तुडतुडे इतर रसशोषक किडी.

निळ्या चिकट सापळ्यास आकर्षित होणारे कीटक:-

फुलकिडे(थ्रीप्स),नागअळीचे पतंग

पहिली फवारणीचा ही नेहमी निम तेलाची असावी पिकानुसार निम तेलाची तीव्रता बदलते.त्यानुसार निम तेल निवडावे.पानावरील कडवट थरामुळे रसशोषक किडींवर मोठ्या प्रमानात  पिकापासून परावर्तित होतात.

 

पिकास योग्य खते योग्य वेळी द्यावीत.नत्रयुक्त खताचा अतिवापर कटाक्षाने टाळावा. कारण त्यांच्या अतिवापरामुळे झाड कोवळे होते. हाच कोवळापणा किडींना आवडतो व त्या मोठ्या प्रमाणात शेतावर येतात.म्हणूनच नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित ठेवावा.

 

यातूनही एखाद्या झाडावर विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसू लागताच ते झाड शेताबाहेर नष्ट करावे.

 

शेत नेहमी तण विरहित ठेवावे,जेणेकरून रसशोषक किडी  ना इतरत्र लपण्यास जागा मिळणार नाही.

 

संकलन - IPM SCHOOL

 

English Summary: Measures to prevent viral diseases on crops Published on: 11 October 2021, 06:35 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters