खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परीक्षण अहवालानुसार नत्र, स्फुरद, पालाशची मात्रा द्यावी. नत्र खत देण्याची योग्य वेळ आणि एकूण मात्रेची विभागणी अधिक महत्त्वाची आहे. द्विदल धान्य, कडधान्यासाठी नत्र कार्यक्षमता महत्त्वाची आहे. सेंद्रिय खतांचा पूरक वापर हा नत्र, स्फुरद, पालाश आणि जस्ताची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
जेव्हा खत वापरले जाते तेव्हा त्यातील सर्व पोषक तत्त्वे पिकाद्वारे शोषली जात नाहीत. पिकाद्वारे पोषक तत्त्वांचा फक्त एक अंश वापरला जातो. माती परीक्षण मूल्यांनुसार निर्धारित केलेल्या मातीच्या पोषक पुरवठा शक्तीच्या आधारावर, खतांच्या शिफारसी केल्या जातात. सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा. विविध जिवाणू खतांचा (रायझोबियम, पी.एस.बी. ॲझोटोबॅक्टर २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे) वापर करावा.
सर्व प्रकारच्या जमिनीत नत्राची कमतरता कमी अधिक प्रमाणात दिसून येते. त्यामुळे पिकांना लागणारी मात्रादेखील जास्त असते. जमिनीमध्ये दिलेले नत्र वेगवेगळ्या मार्गाने वाया जाते. एकूण दिलेल्या नत्रापैकी ३५-५५ टक्के नत्र पिकांना लागू होते. पाण्यात विरघळणे आणि वायुरूपात जाणारा अमोनिअम कमी करून नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यात येते.
या चॉकलेटने जनावरांना दूध देण्याची क्षमता वाढते, जाणून घ्या काय आहे खासियत
अधिक पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आणि दीर्घकालीन पिकांसाठी नत्राची एकूण मात्रा २ ते ३ हप्त्यात विभागून द्यावी. भात पिकामध्ये युरिया सुपर ग्रॅन्युल्सचा वापर करावा. नॉयट्रेटयुक्त खते वाहून जाऊन येत म्हणून नियंत्रित आणि हलकी पाण्याची पाळी द्यावी. युरियामधील नत्र हळुवार उपलब्ध होण्यासाठी युरियासोबत २० टक्के निंबोळी पेंडीचा वापर करावा.
आता राधाकृष्ण विखेंच्या कार्यालयावर धडकणार 'लाल वादळ', शेतकरी प्रश्नांसाठी किसान सभा पुन्हा मैदानात
चुनखडीयुक्त किंवा चोपण, चिकणमातीयुक्त जमिनी, आम्लधर्मीय जमिनीमध्ये दिलेल्या स्फुरदयुक्त खतापैकी सुमारे ८० टक्के जमिनीत स्थिर होऊन उभ्या पिकांना लागू होत नाही, म्हणून स्थिर होणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण कमी करून कार्यक्षमता वाढविता येते. स्फुरदयुक्त खते क्रियाशील मुळांच्या परिसरात योग्य खोलीवर पेरून द्यावीत.
रॉक फॉस्फेटसारखी खते मातीबरोबर मिसळून दिली तर कार्यक्षमता वाढते. मात्र रॉक फॉस्फेटच्या कणांचा आकार अति लहान असावा. ही खते ३ ते ४ आठवडे पेरणीपूर्वी द्यावी लागतात. दाणेदार स्फुरद खते अधिक परिणामकारक ठरतात. स्फुरदयुक्त खते शेणखत किंवा कंपोस्टबरोबर १:२ गुणोत्तराच्या प्रमाणात वापरल्यास कार्यक्षम ठरतात.
आता कृषी अधिकाऱ्यांनी गरज नाही, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ड्रोनमधून होणार ई- पंचनामे...
कपिल जाचक यांना केळीरत्न पुरस्कार, अधिक उत्पादन घेतल्याने परिषदेकडून सन्मान..
केळीला 18 रुपये 90 प्रतिकिलो पैशांचा हमीभाव द्या, ठराव मंजूर
Share your comments