मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीचा फटका हा सगळ्यात पिकांना बसला. हाताची आलेली पिके पाण्यात नेस्तनाबूद झाले. परंतु या सगळ्या संकटांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तूर पीक जोमात आले आहे.परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत आहे
जसे की कधी पाऊस, कधी दाट धुके तर कधी उन्हामुळे तुरीच्या पीकावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. या सगळ्या वातावरणामुळे तूर पिकावर मारूका किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या तुरीचे पिके शेंगा पोसण्याच्या अवस्थेत आहे. ही कीड फुल असलेल्या तुरीची नासाडी करीत आहे. मारूका किड थेट शेंगा खात असल्याने उत्पादनात मोठी घट येण्याचा धोका आहे. या वातावरणातील बदल झाल्याने कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
अशापद्धतीने ओळखा मारूका किडीचा प्रादुर्भाव
- ही कीड कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी कीड आहे.
- या किडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखांवर पांढरे पट्टे असतात.
- मादी पतंग कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालतात.
- हेचि अंडे पांढऱ्या रंगाची व अर्धपारदर्शक असतात.
- तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठीपक्यांच्या जोड्या असतात.
- अंड्या मधून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगा यांना एकत्रित करून जाळ्याने चिटकून झुपके तयार करते किंवा आत मध्येच राहून कळ्या व फुले खाते.
- तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खातात.
- अळी शेंगांच्या झुपक्यात किंवा मातीमध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम 18 ते 35 दिवसात पूर्ण होतो.
या किडीचे व्यवस्थापन
या अळीच्या व्यवस्थापनासाठी ज्या ठिकाणी तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रति मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे.
फ्लूबेंडामाईड 20 डब्ल्यूजी सहा ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यूपी 20 ग्रॅम किंवा नोवलूरान5.25 इंडॉक्स्झाकार्ब4.50 एससीसोळा मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाचे प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पावर स्प्रे ने करावी. दुसऱ्या फवारणी च्या वेळेस कीटकनाशकांची मात्रा हीतिप्पट करावी. गरज भासल्यास पुन्हा पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणी च्या वेळेस किटकनाशकांची आदलाबदल करावी. वर उल्लेख केलेल्या कीटकनाशकांचा सोबत इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्य इत्यादी मिसळू नये.
( संदर्भ- हॅलो कृषी )
Share your comments