आंबा हा फळांचा राजा आहे. गोड आणि आंबट चव असणारे हे फळ आवडत नाही असा एकही व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आंब्याच्या हापूस या प्रजातिला तर देश-विदेशातूनही प्रचंड मागणी असते. परंतु देशात एक अशीही आंब्याची प्रजाती आहे त्याची किलोची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.
मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे एका दाम्पत्याच्या बागेमध्ये हा आंबा पिकतो. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या आंब्याची किंमत 2.70 लाख रुपये एवढी आहे. हा आंबा विशेष करून जपानमध्ये पिकवला जातो, मात्र आता जबलपूरमधील दाम्पत्यानेही याची शेती सुरू केली आहे.
विशेष म्हणजे या आंब्याच्या झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सुरक्षा रक्षकही तैनात केला आहे.
आंब्याच्या सुरक्षेसाठी 3 सुरक्षारक्षक आणि 9 कुत्रे या दाम्पत्याने तैनात केले आहेत.
जपानमध्ये या आंब्याच्या प्रजातीला मियाजाकी या नावाने ओळखले जाते. हिंदुस्थानात आणि दक्षिण पूर्व आशियाताली काही भागातही ही प्रजाती आढळते. मध्य प्रदेशात एका दाम्पत्याने आंब्याची ही प्रजाती जतन करु ठेवली आहे. या दाम्पत्याला एकदा ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान एका व्यक्तीने या आंब्याचे वाण दिले होते. त्यानंतर त्यांनी त्याची चांगली जपणूक करुन मोठी आमराई फुलवली.
या आंब्याच्या प्रजातीचा रंग माणिकाप्रमाणे असून या आंब्याला जपानीत ताइयो-नो-तमागो (सूर्याचं अंड) असे म्हटले जाते, असे या दाम्पत्याने सांगितले.
आंब्याची ही प्रजाती
जपानमधील क्यूशू प्रांतातील मियाजाकी शहरात आढळून येते. या एका आंब्याचे वजन 350 ते 900 ग्रॅमपेक्षा अधिक असते. याचा रंग लाल-पिवळसर असतो. तसेच यामध्ये साखरेचे प्रमाण 15 टक्क्यांहून अधिक असते. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान या आंब्याचा मोसम असतो. हे मियाजाकी आंबे जगात सर्वाधिक महागडे आंबे आहेत. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात 2.70 लाख रुपये प्रतिकिलो प्रमाणे विकले गेले.
आंब्याच्या हापूस या प्रजातिला तर देश-विदेशातूनही प्रचंड मागणी असते. परंतु देशात एक अशीही आंब्याची प्रजाती आहे त्याची किलोची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.
मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे एका दाम्पत्याच्या बागेमध्ये हा आंबा पिकतो. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या आंब्याची किंमत 2.70 लाख रुपये एवढी आहे. हा आंबा विशेष करून जपानमध्ये पिकवला जातो, मात्र आता जबलपूरमधील दाम्पत्यानेही याची शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे या आंब्याच्या झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सुरक्षा रक्षकही तैनात केला आहे.
𝐄-शेतकरी अपडेट्स
Share your comments