दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आबा मोहोराचे पर्यायाने फळांचे मोठे नुकसान होताना दिसून येते. हे नुकसान टाळल्यास आंबा देखील पडत राहिला आणि थंडीला उशीर झाला तर उशिरा मोहोर येतो. जुलै किंवा ऑगष्ट महिन्यात पावसाचा खंड पडला तर अशा वेळी बागेमध्ये आंब्याला मोहोर यायला सुरुवात होते.
कीड व्यवस्थापन
आंब्याची लागवड शिफारस केलेल्या अंतरावरच करावी. जास्त दाटी झालेल्या बागेत कमी सुर्यप्रकाश तसेच कोंदटपण जास्त
बाग स्वच्छ तणविरहित ठेवावी. झाडाच्या आतल्या भागातील फांद्याची छाटणी करून विरळ कराव्यात जेणेकरून सुर्यप्रकाश संपूर्ण झाडत पोहोचेल.
जैविक नियंत्रणांतर्गत निंबोळी अर्क ५ टक्के किंवा निमयुक्त किटकनाशकांचा फवारणी करिता अधून - मधून वापर करावा. तुडतुडे वर्षभर झाडावर असल्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहोर येण्यापूर्वी व्हर्टिसिलियम लेकॅनी या मित्र बुरशीवर आधारित कीटकनाशकाची २o५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी e) इमीडाक्लोप्रीड ३ मिली किंवा क्लोथीयानिडीन (दाणेदार) १.२ ग्रॅम किंवा थायामेथोक्झाम १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
शेंडा पोखरणारी अळीजेव्हा झाडाला किंवा कलामांना कोवळी फुट निघते. त्यावेळेस या किडीचा प्रादुर्भाव होतो. तसेच मोहोर येण्याच्या वेळीही या अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचा पतंग काळसर बदामी रंगाचा असून त्याची लांबी १५ ते २० मि.मि. असते. या किडीची मादी (पतंग) कोवळ्या पानांच्या देठावर तसेच मोहोराच्या देठावर / दांड्यावर अंडी घालते. अळीची वाढ होत असताना तिचा रंग गुलाबी होत जातो व त्यावर पांढरे ठिपके असतात. पानाच्या देठातून शेंड्यात/फांदीत शिरताना ती जे छिद्रे पाडते. त्या छिद्रातून विष्ठा बाहेर येताना दिसते.
नियंत्रणा
नवीन लागवड केलेल्या बागेत या किडीचा उपद्रव जास्त असतो. कारण नवीन बाग वाढीच्या अवस्थेत असताना वारंवार नवीन कोवळी फुट येत असल्याने या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी वेळीच संरक्षण झाले नाही, तर झाडाच्या वाढीवर परिणाम होतो. म्हणून प्राथमिक अवस्थेतच किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच केिडग्रस्त शेंडे किडीच्या अवस्थेसह काढून जाळून नष्ट करावेत.
कोवळी फुट निघल्यानंतर कार्बारिल ५० टक्के प्रवाही ०.२ टक्के किंवा क्रिनॉलफॉस २५ टक्के प्रवाही o.o५ टक्के किंवा निंबोळी अर्क ५ टक्के किटकनाशकांची फवारणी करावी.
खोडकिडाकीटकाच्या मादीने झाडाच्या सालीवर घातलेल्या अंड्यातून निघालेल्या पिवळसर रंगाच्या अळ्या सालीखालचे खोडही पोखरतात. खोडावर लहान छिद्र व त्यातून गोंद आणि भुसा आलेला मरते.
नियंत्रण
खोडकिडीमुळे जे छिद्र पडते छिद्रामधून टोकेरी तार घालून आतील अळी बाहेर काढावी. या छिद्रामध्ये क्लोरप्पायरीफॉसच्या द्रावणात भिजवलेले कापसाचे बोळे तारेच्या सहाय्याने घुसवावेत. तोंड चिखलमातीने बंद करून घ्यावे. किडीच्या विविध अवस्था आतमध्ये मरुन जातील.
याचप्रमाणे, साधे पेट्रोल किंवा दोन भाग कार्बन डायसल्फाइड, एक भाग क्लोरोफॉर्म व क्रिओसोटाचे मिश्रण अळीने पाडलेल्या भोकात पिचकारीने मारून भोक चिखलाने बंद करतात, विषारी वाफेने अळ्या मरून जाऊन झाड वाचते.
एखाद्या फांदीला जास्त प्रादुर्भाव आढळल्यास अशी फांदी काढून जाळून टाकावी.
मीजमाशीची अळी जमिनीत कोषावस्थेत जाता असल्याने बागेतील करावी. जेणेकरून सुमावस्थेतील किडीचे कोष उन्हाने तापून मरून जातील किंवा पक्षी वेचून खातील.
झाडाखालील जमीन चाळल्यानंतर जमिनीमध्ये मिथील पॅराथिऑन या कीटकनाशकाची २ टक्के भुकटी मातीत मिसळावी. म्हणजे झाडाखालील जमिनीतील अळ्या आणि कोशांचे नियंत्रण होईल.
आंब्याचा मोहोर फुटू लागताच फेनीट्रोथिऑन १ मिली किंवा डायमेथोएट १.२५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारणी कारवी.
रोग व्यवस्थापन
भुरी : आंबा फळपिकावरील फारच नुकसानकारक असा हा रोग आहे. या रोगामुळे मोहरावर व दांड्यावर कवकाची पांढुरकी वाढ होते. रोगाचा प्रसार वा-यामुळे होतो.
या बुरशीची बीजे कोवळ्या मोहोरावर किंवा पालवीवर उगवतात. त्यांची मुळे मोहोराच्या पेशींमध्ये शिरून अन्नरस शोषतात. सुरुवातीला रोगाची लागण मोहोराच्या शेंड्याच्या भागात होऊन नंतर इतरत्र पसरते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणत झाल्यास आंब्याच्या मोहोराचे जवळपास ७o ते ८० टक्के नुकसान होऊ शकते.
नियंत्रण : प्रादुर्भावग्रस्त झाडावर हेक्झाकोनॅझोल ५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करपा: रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानांपेक्षा नवीन पानांवर जास्त होतो. पानांची रोगग्रस्त देठे काळी पडतात, पाने खाली वाकतात, लक्षण दिसून येते. काही वेळा डागांमुळे संपूर्ण फळ पडते. डागांवर खोल चिरा निर्माण होतात. बुरशी फळात खोल शिरते व फळे नासतात.
नियंत्रण: या रोगाच्या नियंत्रणासाठी काबॅन्डेझीम एक ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बांडगुळे: जुन्या झाडांवर बांडगुळे मोठ्या प्रमाणावर वाढतात. फांद्यांना अत्रपुरवठा न झाल्याने फांद्या सुकतात. उपाय म्हणून संबंधित फांद्या छाटून टाकाव्यात.
मोहोर संरक्षण आबा मोहोरख्या संरक्षणासाठी क्रायसोपली कार्निया या परोपजीवी किडीच्या १o ते १५ हजार अळ्या प्रति हेक्टर झाडावर सोडाव्यात अथवा व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशीवर आधारित कीटकनाशक चार ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे किंवा कार्बारिल (५० टक्के) २0 ग्रॅम अधिक पाण्यात मिसळणारे ८0 टक्के गंधक हे २0 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
Share your comments