धान पिकातील खोडकिडा व गादमाशी या किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी कार्बोफ्युरॉन ३ % दानेदार किंवा फिप्रोनिल ०.३ टक्के दानेदार @ २५ किलोग्रॅम प्रती हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० सेमी. पाणी, असतांना वापरावे. बांधीमधील पाणी ४ ते ५ दिवस बांधीबाहेर काढू नये. आवश्यकतेनुसार ही किटकनाशके ३० दिवसांनी परत वापरावीत.
धान पाने गुंडाळणारी अळी व्यवस्थापन:पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी नंत्र खतांचा संतुलित वापर करावा.A balanced application of fertilizers should then be used to manage leaf-rolling worms.
हे ही वाचा - रब्बी मध्ये ज्वारीची पेरणी करताय? आधी वाचा हा महत्वाचा सल्ला
अळीने गुंडाळलेली नुकसानकारक पाने अळीसह गोळा करून नष्ट करावी. अझाडिरेक्टीन ०.१५ % १५०० पी. पी. एम @ ३० मि.ली. किंवाव लॅमडा सायहेलोथ्रीन ५ ई.सी. @ ६ मि.ली. किंवा क्लोरांट्रानिलिप्रोल १८.५ % एस.सी. @३ मिली किंवा थायमेथोक्झाम २५ डब्लू. जी. @२ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
धान अन्नद्रव्य व्यवस्थापन -१०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि नत्राची अर्धी मात्रा चिखलावर तर उरलेली नत्राची अर्धी मात्रा दोन समान हप्त्यात (फुटवे फुटण्याच्या वेळी साधारणपणे ३० दिवसांनी आणि लोंबी येण्याच्या सुरुवातीस साधारणपणे ६० दिवसांनी) विभागून द्यावी.
धान करपा रोग व्यवस्थापन: करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी हेक्झाकोनॅझोल ५ % ई.सी. @ २० मि.ली. किंवा आयसोप्रोथिलेन ४० % ई.सी. @ १५ मि.ली. किंवा टेबूकोनॅझोल २५.९ ई.सी. @ १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी.धान कडा करपा रोग व्यवस्थापन: कडाकरपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन १ ते १.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
धान पर्णकोष करपा रोग व्यवस्थापन: पर्णकोष करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेबूकोनॅझोल २५.९ ई. सी. १५ मि. ली. किंवा प्रोपिकोनॅझोल २५ ई. सी. १० मि.ली. किंवा हेक्झाकोनॅझोल ५ ई.सी. २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.धान पर्णकोष कुजव्या रोग व्यवस्थापन: पर्णकोष कुजव्या रोग व्यवस्थापनासाठी, हेक्झाकोनॅझोल ७५ डब्लु.जी.@१.३३ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
धान दाणे रंगहीनता व्यवस्थापन: दाणे रंगहीनता व्यवस्थापनासाठी, धान पिक फुलोरा अवस्थेत असतांना दुपारच्या वेळी खालील प्रमाणे कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. हेक्झाकोनॅझोल ४ % + झायनेब ६८% डब्लू.पी. @ २० ते २५ ग्रॅम किंवा टेबूकोनॅझोल ५०% + ट्रायफ्लोक्झीक्ट्राबिन २५% डब्लू.जी. @ ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दुपारनंतर फवारणी करावी. सर्व फवारणीची कामे सध्याच्या पावसाच्या उघाडी नंतर करावी.
Share your comments