प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पीक पात्या लागण्याच्या अवस्थेत असताना निंबोळी अर्क ५० मि.लि.अधिक नीम तेल ५ मि.लि.अधिक डिटर्जंट पावडर १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.पतंगांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन पेक्टीनोल्युर अथवा गॉसिपल्युर सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत. दर आठवड्याला
सापळ्यात अडकलेल्या पतंगांची निरीक्षणे नोंदवावीत.Observations of trapped moths should be recorded.आर्थिक नुकसान पातळी (सलग तीन रात्री ८ पतंग/सापळा/रात्र) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात. १०% डोमकळ्या ही आर्थिक नुकसान पातळी समजून फवारणीचे उपाय करावेत.
हिरवी बोंडे लागल्यानंतर अनिश्चित स्वरूपात एकरी २० बोंडांचे (१ बोंड/झाड) निरीक्षण करावे. आर्थिक नुकसान पातळी (१०% प्रादुर्भावग्रस्त बोंडे) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी. उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी मित्रकीटकाचे ६०,००० प्रतिएकर प्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासून पंधरा
दिवसांच्या अंतराने तीनदा प्रसारण करावे. जैविक घटकांचा कीड नियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.कपाशीच्या वाढीनुसार गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली कीटकनाशके (फवारणी प्रतिलिटर पाणी) पेरणीनंतर ६०-९०
दिवस: क्विनॉलफॉस (२५ एएफ) २ मि.लि. किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम पेरणीनंतर ९०-१२० दिवस: क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २.५ मि.लि. किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम >पेरणीनंतर १२० दिवस: फेनव्हलरेट (२० ईसी) १ मि.लि. किंवा सायपरमेथ्रिन (१० ईसी) १ मि.लि.
Share your comments