मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन

Monday, 05 August 2019 07:38 AM


मराठवाडा विभागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे, त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या अनुशंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभाग तर्फे लष्करी अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.

व्यवस्थापन:

 • मका पिकाभोवती नेपियर गवताच्या 3 ते 4 ओळी लावावे. हे गवत सापळा पिक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 5% निंबोळी अर्क किंवाअझाडीरॅक्टीन 1500 पीपीएम 50 मिली/10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
 • अंडीपुंज, समुहातील लहान अळया आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून राॅकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
 • मक्यावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी 5 कामगंध सापळ्याचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरिक्षण करावे.
 • सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत. यासाठी 15 कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत तसेच प्रकाश सापळे लावावेत.
 • किडींचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इत्यादी) व परोपजीवी किटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कॅम्पोलेटीस इत्यादी) यांचे संवर्धन करावे. यासाठी आंतरपिके व शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
 • ट्रायकोग्रामा किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त 50,000 अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने 3 वेळा किंवा कामगंध सापळ्यामध्ये 3 पतंग/सापळा आढळून आल्यास शेतात सोडावे.
 • रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था या कालावधीत 5% प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी 10% प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त बुरशी व जिवाणूजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.

अ.क्र.

जैविक किटकनाशक

मात्रा/१० लि. पाणी

मेटाऱ्हायजियम एनिसोप्ली (१ x १० सीएफयु/ग्रॅम)

५० ग्रॅम

नोमुरिया रिलाई (१ x १० सीएफयु/ग्रॅम)

५० ग्रॅम

बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती

२० ग्रॅम


जैविक किटकनाशके पिक 15 ते 25 दिवसाचे झाल्यास पोंग्यामध्ये द्रावण जाईल अशाप्रकारे फवारणी करावी. त्यानंतर 10 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 फवारणी करावी. सध्याचे ढगाळ वातावरणात जैविक किटकनाशकांच्या वापरासाठी पोषक आहे.

फवारणीसाठी किटकनाशके

प्रादुर्भावाची पातळी

किटकनाशक

मात्रा/१० लि. पाणी

५% प्रादुर्भावग्रस्त झाडे

निंबोळी अर्क किंवा

५%

अझाडीरॅक्टीन १,५०० पीपीएम

५० मिली

१०-२०% प्रादुर्भावग्रस्त झाडे

स्पायनोटोरम ११. % एस सी किंवा

 मिली

थायामिथॉक्झाम १२.६ %+लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ % झेडसी किंवा

५ मिली

क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ % एससी

४ मिली


विशेष सूचना

 • रासायनिक किटकनाशकाची फवारणी चारा पिकावर करु नये.
 • एकाच रासायनिक किटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करु नये.
 • तुऱ्याची अवस्था व त्यानंतर फवारणी टाळावी.
 • फवारणी करताना मजुराने सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.
 • एकात्मिक किड व्यवस्थापन करावे.

लष्करी अळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. बस्वराज भेदे आणि डॉ. कृष्णा अंभुरे यांनी केले आहे.

कृषी किटकशास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

fall armyworm लष्करी अळी मका maize वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.