बरेच शेतकरी गव्हाचे कुटार जाळुन टाकतात किवा विक्री करतात त्या पासुन ऊतम खत तयार करता येते आता बर्याच ठिकाणी गहु काढणी ला सुरुवात झाली आहे*
चला तर मग या वर्षी पासुन गव्हाच्या कुटारा पासुन खत तयार करुया.
कुटार मध्ये खालील प्रमाणे अन्न द्रव्य असतात
नत्र =0:30-0:35 %
स्पुरद =0:80-0:1 %
पालाश=0:70-01 %
हेक्टर मध्ये 7/8 टन कुटार मिळते त्या पासुन सेंद्रीय खत तयार करता येते
कुटार शेतात मध्य भागी असतें ते कोपरयावर वाहुन ढीग पसरावा , तो ओला करावा.
त्यावर 2 बॅग युरीया, 2 बॅग सुफरफासपेट, जिवाणू कल्चर वेस्ट डीकाॅमपोजर 200 ली द्रावण शिंपडावे
गव्हाचे काड सिंगल पल्टी नांगरावे एक महीन्याने रोटावहेटर ने मिक्स करावे पावसाळ्यात पहीला पाऊस पडल्यावर एकरी दोनशे लिटर वेस्टडिकंपोजर शिंपडावे
दोन महिन्यांत खत तयार होईल.
हे शक्य नसल्यास शेतातील
कुटारावर 200 ली वेस्ट डीकाॅमपोजर शिंपडावे ट्राली त भरुन शेतात पसरावे.
नागरटी करुन जमिनीत गाडावे 2/3 महीन्यात कुजुन खत तयार होईल जमिनीत सेंद्रीय कर्ब वाढतो पुढील पिकांस फायदेशीर होईल.
मित्रानो रासायनिक खतांचा बेसुमार वापर थांबवा,आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवा,त्याशिवाय तरणोपाय नाही.
जमिनिची उत्पादकता वाढवायची असेल तर सेंद्रिय कर्ब आणि जिवाणू वाढ या शिवाय आपल्या जवळ दुसरा कोणताच मार्ग नाही, त्यामुळे आपले कोणतेही पीक प्रतिकार क्षम होईल व रोग कमी पडतील.
रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळेच आजची आपली शेती आपल्याला परवडत नाही.शेती हे शास्त्र आहे, पारंपरिक पद्धतीने केली तर लावलेला खर्चही वसूल होणार नाही ,त्यासाठी सुशिक्षित,नवयुवक शेतकऱ्यांनी शास्त्र शुद्ध पद्धतीनेच शेती केली पाहिजे,
जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य गुणोत्तर ठेवले जाते. सेंद्रिय कर्बाचे मातीतील प्रमाण
साधारणपणे २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी, ४५ टक्के खनिजे आणि ५ टक्के सेंद्रिय कर्ब मातीमध्ये आढळून येते. अशी माती शेतीसाठी सर्वांत चांगली मानता येईल.
आपण शेतात चालतांना शेतजमीन इतकी भुसभुशीत झाली पाहिजे की त्या जमिनीवरून चालतांना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे.
हे केंव्हा होईल जेंव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते वापरतील तेंव्हा. याचा प्रत्येय या वेळेस आला की जिथे आम्ही बनविलेले कर्ब युक्त सेंद्रिय खत वापरलेल्या जागेत मऊ ,भुसभुशीत पणा आणि तपकिरी रंग आल्यासारखा जाणवत होता. म्हणून शेतकऱ्यांनी ज्यास्तीत ज्यास्त सेंद्रिय खते वापरणे खूप गरजेचे आहे.
कंपोस्ट हा इंग्रजी शब्द आहे, त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडतात. कंपोस्ट आणि सेंद्रीय हे वेगवेगळे खत आहेत की काय, असे त्यांना वाटते. काही लोक आजकाल सेंद्रीय खताचे महत्व पटल्यामुळे सेंद्रीय खत विकत घ्यायला लागले आहेत. पण त्याचीही गरज नाही. आपल्याच शेतातला पाला-पाचोळा, गव्हाचे काड, पाचट, तुराट्या, सूर्यङ्गुलाची ताटे, कोणतेही पीक घेतल्यानंतर मागे जे काही उरलेले असेल ते म्हणजे पाने, ङ्गांद्या, खोड, टरङ्गल, भुस्सा, गवत, कोंबडीची विष्ठा, डुकाराच्या लेंड्या यांना कुजवून जे खत तयार होते त्याला कंपोस्ट खत म्हणतात. शेतकर्यांकडे बराच सेंद्रीय कचरा असतो. परंतु त्याचा वापर सेंद्रीय खत करण्यासाठी होत नाही. हा कचरा जाळून टाकला जातो. उसाचे पाचट सुद्धा शेतकरी जाळून टाकतात. तसे ते जाळले म्हणजे खोडवा चांगला येतो, पिकातली कीड मारली जाते, खोडवा लवकर उगवून येतो असे अनेक गैरसमज असल्यामुळे शेतकर्यांचा उसाचे पाचट जाळण्याकडेच कल असतो. पण पाचटाचा सुद्धा उत्तम खत तयार होत असतो.
Share your comments