1. कृषीपीडिया

कडुनिंबापासून बनवा कीटकनाशक आणि वाचवा हजारो रुपये

या घरगुती कीटकनाशकाच्या वापराने शेती रासायनिक कीटकनाशकांच्या गंभीर परिणामापासून मुक्त होईल.कडुनिंब एक अप्रतिम झाड आहे ज्याला डॉक्टराची उपमा दिली जाते. औषधी गुणधर्म त्याच्या पानांपासून ते वाळलेल्या सालापर्यंत लपलेले असतात. निंबोळी आणि अगदी पानाचा देखील औषधी वापर करता येतो. कडुनिंबापासून शेतकरी बांधव अगदी कमी किंमतीत सहज कडुलिंबाची कीटकनाशक बनवु शकतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
कडुनिंबापासून बनवा कीटकनाशक

कडुनिंबापासून बनवा कीटकनाशक

या घरगुती कीटकनाशकाच्या वापराने शेती रासायनिक कीटकनाशकांच्या गंभीर परिणामापासून मुक्त होईल.कडुनिंब एक अप्रतिम झाड आहे ज्याला डॉक्टराची उपमा दिली जाते. औषधी गुणधर्म त्याच्या पानांपासून ते वाळलेल्या सालापर्यंत लपलेले असतात. निंबोळी आणि अगदी पानाचा देखील औषधी वापर करता येतो. कडुनिंबापासून शेतकरी बांधव अगदी कमी किंमतीत सहज कडुलिंबाची कीटकनाशक बनवु शकतात.

कडुलिंबापासून घरातील कीटकनाशक कसे बनवायचे बरं?

कडुलिंबापासून घरगुती कीटकनाशके (सेंद्रिय कीटकनाशक) कसे बनवायचे ते आज आपणास सांगत आहोत. प्रथम 10 लिटर पाणी घ्या. यामध्ये कडुलिंबाच्या पाच किलो हिरवे किंवा कोरडे पाने आणि वाटून बारीक केलेली निंबोली, दहा किलो ताक आणि दोन किलो गोमूत्र, एक किलो वाटलेले लसूण मिसळा. त्यांना काठीने चांगले ढवळा. यानंतर ते एका मोठ्या भांड्यात पाच दिवस ठेवा. हे देखील लक्षात ठेवा की पाच दिवस दररोज दिवसातून दोन ते तीन वेळा लाकडाने हे द्रावण चांगले मिसळत रहा. जेव्हा त्याचा रंग दुधासारखा होतो, तेव्हा या सोल्युशनमध्ये 200 मिलीग्राम साबण आणि 80 मिलीग्राम टीपोल घाला. आपल नैसर्गिक कीटकनाशक तयार आहे. इतर कीटकनाशकांप्रमाणे पिकांवर फवारणी करा. मग ते कसे आश्चर्यकारक परिणाम दाखवते ते पहा. पिकांवरील कीटक नष्ट होतील.

कडुनिंब कीटकनाशक: राजस्थानच्या तिलोकराम यांनी शोध लावला

राजस्थानातील शेतकरी किती जागरूक आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.राजस्थान येथील नागौर जिल्ह्यातील रहिवासी, शेतकरी तिलोकराम यांनी कडुलिंबाची पाने व निबोलीपासून घरगुती कीटकनाशक बनवले. त्याने आपली पद्धत सोशल मीडियावरही शेअर केली. तिलोकराम यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या 1 बीघा मूग पिकामध्ये शेंगावर बोर किडीचा प्रादुर्भाव झाला. हे घरगुती कडुनिंबाचे कीटकनाशक वापरल्यानंतर सात दिवसानंतर ही बोर कीड नष्ट झाली. कडुलिंबाची पाने आणि निंबोलीपासून बनवलेल्या कीटकनाशकाचा हा चकमत्कारच आहे.

 

रासायनिक कीटकनाशक का वापरू नये?

शेतकरी अधिक उत्पन्न काढण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांची संकरित बियाणी, रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, तणनाशके अधिक प्रमाणात वापरू लागला आहे. त्यामुळे उत्पादन तर पराकोटीचा वाढला , परंतु त्याचे भयानक दुष्परिणामही टप्प्याटप्प्याने जाणवू लागले आहेत .विशेषतः मानवी आरोग्यावर  वाईट परिणाम होऊ  लागले आहे. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता जाऊन जमिनीतील मित्र किडींचा नाश होऊन शत्रू किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे.आज जमीन रबर होऊ लागली आहे. ज्यात पाणी संतुलित पद्धतीने राखून ठेवण्याची क्षमताही कमी झाली आहे. केवळ नवीन साधने वापरल्याने अन्नधान्यांचे उत्पादन वाढलेले आहे, असे  नाही. अन्नधान्य पिकविणाऱ्याचे क्षेत्रफळही वाढले आहे.

रासायनिक कीटकनाशकाच्या वापरामुळे जमीन नापिक/निर्जीव होते. एवढेच नाही तर रासायनिक कीटकनाशक किंवा खत/खाद्य याच्या वापरामुळे त्याचे विषारी गुणधर्म हे पिकात देखील उतरतात व परिणामी ते माणसाच्या आहारात येतात. आणि यामुळे गंभीर आजारही उद्भवतात त्याला पर्याय म्हणुन सेंद्रिय शेतीकडे वळण्याची काळाची गरज आहे.

English Summary: Make pesticides from neem and save thousands of rupees Published on: 29 July 2021, 12:27 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters