MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

तुमच्या शेतात काग्रेस गवत आहे? गाजर गवतापासून बनवा सेंद्रीय खत

आपल्या शेतात गाजर गवत आहे का ? जशी बाग फुलांची बाग लावावी त्याप्रमाणे गाजर गवत आपल्या शेतात उतरत असते. अनेक शेतकऱ्यांना या गाजर गवतने नको नको करुन सोडलं आहे. गाजर गवताला काही ठिकाणी काग्रेस नावानेही ओळखले जाते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

आपल्या शेतात गाजर गवत आहे का ? जशी बाग फुलांची बाग लावावी त्याप्रमाणे गाजर गवत आपल्या शेतात उतरत असते. अनेक शेतकऱ्यांना या गाजर गवतने नको नको करुन सोडलं आहे. गाजर गवताला काही ठिकाणी काग्रेस नावानेही ओळखले जाते. गाजर गवत (पार्थेनियम हिस्टेरोफोरस) पर्यावरणासाठी वाईट मानले जाते, तर प्राण्यांनाही हे गवत खाणे आवडत नाही. या गवताच्या परागकणामुळे इसब, दमा आणि त्वचेचे आजार उद्भवू शकतात. गाजर गवत विषारी असल्याने आपण शेतातून हे गवत हाताने काढू
शकत नाही.

एका झाडामध्ये 25,000 बियाणे तयार होतात जे कृषी उत्पादनावर परिणाम करतात. योग्य कारण म्हणजे हे गवत पावसाळ्यात स्वतःच उगवते, पण त्याचा वापर न झाल्यामुळे शेतकरी तो कापून शेताबाहेर फेकतात किंवा रासायनिक पद्धतींनी नष्ट करतात.परंतु आता या गाजर गवताचा एक अनोखा वापर शास्त्रज्ञांनी शोधला आहे, जेणेकरून आता गाजर गवताचा वापर शेतीसाठी विशेष कंपोस्ट खत तयार करण्यासाठी केला जाईल.

जाणून घ्या, गाजर गवत पासून विशिष्ट कंपोस्ट खत बनवण्याचे तंत्र आणि फायदे

यामुळे एका बाजूला गाजर गवताचा वापर होईल आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि स्वस्त खते उपलब्ध होतील. अलीकडेच जिल्हा पर्यावरण समिती उदयपूर आणि फॉस्टर इंडियन एनवायरनमेंट सोसायटी इंटली यांच्या संयुक्त तत्वाखाली गाजर गवतपासून विशिष्ट कंपोस्ट खत उत्पादन तंत्रज्ञानाचा शोध लागला आहे.

हेही वाचा : न हात लावता नाहीशे होणार गाजर गवत; मॅक्सिकन बीटल कीटक ठरणार कर्दनकाळ

दोन वर्षांच्या अथक संशोधनानंतर गाजर गवताचे समाधान सापडले

नॅशनल इनोव्हेशन डिस्कव्हरी प्रोग्राम अंतर्गत, उदयपूर जिल्ह्यातील कुराबाद गावचे रहिवासी असिस्टंट प्रोफेसर डॉ.सतीश कुमार अमेता यांनी त्यांच्या शोधनिबंधात गाजर गवत सोडवून एक विशेष कंपोस्ट खत बनवले. यासाठी त्यांना दोन वर्षाचा कालावधी लागला. या तंत्राने बनवलेल्या खतामध्ये नायट्रोजन, स्फुरद, पोटॅशियमचे प्रमाण सामान्य हिरव्या खतापेक्षा तीनपट अधिक मोजले गेले, जे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. सध्या मेवाड विद्यापीठ, गंगारार चित्तौड़गढ येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत डॉ.अमेता यांच्या या संशोधनामुळे गाजर गवत निर्मूलनाच्या स्वरूपात दोघांनाही फायदा होईल आणि शेतकऱ्यांना त्यातून सेंद्रिय खत मिळेल. डॉ सतीश अमेता यांचे हे संशोधन इराणच्या एका प्रतिष्ठित संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. यातून मिळालेल्या माहितीमुळे, शेतकरी गाजर गवत (पार्थेनियम) पिकासाठी खत म्हणून वापरू शकतात, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल.

 

अशा प्रकारे गाजर गवतपासून खत तयार केले जाते

या तंत्रात शेण, कोरडे पाने, पिकाचे अवशेष, राख, लाकूड भूसा इत्यादी कचरा सेंद्रिय पदार्थाचा एक भाग आणि गाजर गवतचे चार भाग या प्रमाणात बनवलेल्या एका लाकडी खोक्यामध्ये मिसळले जातात. या बॉक्सच्या भोवती छिद्र बनवले जातात, जेणेकरून हवेचा प्रवाह योग्य राहील आणि गाजर गवत लवकर खतामध्ये विघटित होऊ शकेल. यामध्ये रॉक फॉस्फेट आणि ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर करून कंपोस्टमधील पोषक घटकांचे प्रमाण वाढवता येते. अशाप्रकारे, गाजर गवतपासून केवळ 2 महिन्यांत सतत पाणी शिंपडून आणि ठराविक अंतराने हे मिश्रण उलथून हवा प्रदान करून सेंद्रिय खत तयार केले जाऊ शकते.

गाजर गवतापासून बनवलेल्या खतामध्ये पोषक घटकांचे प्रमाण जास्त 

संशोधनानुसार गाजर गवतपासून बनवलेल्या कंपोस्टमध्ये मुख्य पोषकद्रव्ये शेण आणि गांडुळाच्या खतापेक्षा दुप्पट असतात. अशा परिस्थितीत गाजर गवत खत एक चांगला पर्याय बनू शकतो. नायट्रोजन 1.05, फॉस्फरस 10.84, पोटॅशियम 1.11, कॅल्शियम 0.90 आणि मॅग्नेशियम 0.55 टक्के गाजर गवत आढळतात.
गांडुळ खतात नायट्रोजन 1.05, फॉस्फोरस 10.84, पोटेशियम 1.11, कॅल्शियम 0.90 तसेच मॅग्नेशियम 0.55 टक्के आढळते. अशाप्रकारे, गाजर गवतमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त आहे.

 

गाजर गवत कंपोस्ट वापरण्याचे फायदे / गाजर गवतचे फायदे

गाजर गवताचे कंपोस्ट हे एक सेंद्रिय खत आहे, ज्याचा वापर पिके, मानव आणि प्राण्यांवर कोणताही परिणाम करत नाही.
गाजर कंपोस्ट एक संतुलित कंपोस्ट आहे ज्यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश घटकांचे प्रमाण शेणखतपेक्षा जास्त असते.
कंपोस्ट बनवताना, गाजरच्या जिवंत अवस्थेत आढळणारे विषारी रासायनिक पार्थेनिन पूर्णपणे विघटित होते. त्यामुळे ते पिकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
या मुख्य पोषक व्यतिरिक्त गाजर कंपोस्टमध्ये सूक्ष्म पोषक घटक देखील असतात जे पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी उपयुक्त असतात.

English Summary: Make organic manure from carrot grass Published on: 30 July 2021, 12:40 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters