1. कृषीपीडिया

खरीप पिकातील किड व्यवस्थापन करण्याकरिता पाच टक्के निंबोळी अर्क बनवा आणि वापर करा

शेतकरी बंधुंनो निंबोळ्या गोळा करून वाळवून सुरक्षित जागी साठवून ठेवा

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
खरीप पिकातील किड व्यवस्थापन करण्याकरिता पाच टक्के निंबोळी अर्क बनवा आणि वापर करा

खरीप पिकातील किड व्यवस्थापन करण्याकरिता पाच टक्के निंबोळी अर्क बनवा आणि वापर करा

शेतकरी बंधुंनो निंबोळ्या गोळा करून वाळवून सुरक्षित जागी साठवून ठेवा व आगामी सोयाबीन कपाशी तुर यासारख्या प्रमुख खरीप पिकात तसेच भाजीपाला व फळ पिकात कीड व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्काचा योग्य वेळी कीड व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून वापर करा(B) वाळलेल्या निंबोळ्या पासून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत : (१) शेतकरी बंधूंना दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी प्रत्येक शेतकऱ्याने सर्वसाधारण सर्व पिकाकरिता कीड

व्यवस्थापन करण्याकरता वापर करायचा आहे म्हणून किमान 50 ते 100 किलो निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात. नंतर ह्या निंबोळ्या चांगल्या वाळवून साफ करून साठवून ठेवाव्यात.(२) फवारणीच्या आदल्या दिवशी एक एकर क्षेत्र फवारणी करायची आहे असे गृहीत धरून पाच किलो वाळलेल्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्यात.(३) नंतर पाच किलो वाळलेल्या निंबोळी चा कुटून बारीक केलेला चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा. तसेच एक लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत ठेवावा.

(४) दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे फवारणीच्या दिवशी निंबोळीचा नऊ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवलेला अर्क फडक्यातून चांगला काढून घ्यावा. या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा सर्व अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे.(५) वर नमूद केल्याप्रमाणे तयार केलेला निंबोळी अर्क एक लिटर अधिक नऊ लिटर साधे पाणी या प्रमाणात मिसळून ढवळून फवारणीसाठी वापरावा. अशाप्रकारे निंबोळी अर्क फवारणी च्या दिवशीच तयार करून वापरावा.(C) पाच टक्के निंबोळी अर्क कोणत्या पिकात कोणत्या किडी करता व कोणत्या अवस्थेत वापरावा? : शेतकरी बंधुंनो पाच टक्के निंबोळी अर्क सोयाबीन वरील सर्व पतंग वर्गीय किडी, कपाशी पिकावरील रस शोषणाऱ्या किडी तसेच सर्व प्रकारच्या बोंड अळ्या, तुरीवरील व हरभऱ्यावरील घाटे अळी, जवळ जवळ सर्व भाजीपाला

भाजीपाल्यावरील किडी, मुग , उडीद भुईमूग पिकावरील पतंग वर्गीय कीडी संत्रा वर्गीय पिकातील काळी काळी माशी यासह ह् अनेक प्रकारच्या पिकावर शिफारशीप्रमाणे शिफारसीत किडींच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून प्रभावीपणे वापरता येतो सर्वसाधारणपणे मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी कपाशीवरील बोंड आळी उंट आळी तंबाखू वरील पाणी खाणारी अळी ज्वारीवरील व मक्यावरील खोडकिडा टोमॅटोवरील व इतर भाजीपाल्यावरील कीडी यांच्याकरता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून गरजेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्यवेळी पिकात पीक संरक्षणासाठी त्याचा वापर करावा.

 

राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

English Summary: Make and use five per cent neem extract for pest management in kharif crop Published on: 04 July 2022, 09:17 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters