मक्यामध्ये स्टार्च, प्रथिने आणि खाण्यायोग्य तेल असते.कारखानदारीमध्ये प्रामुख्याने मका ही स्टार्च, ग्लुकोज,पशुखाद्य, कोंबडीखाद्य तयार करण्यासाठी वापरतात.जमीन व हवामानया पिकासाठी मध्यम ते भारी, रेतयुक्त, खोल, उत्तम निचल्याची जमीन आवश्यक असते. जमिनीचा सामु ६.५ ते ७ इतका असावा. या पिकासाठी बियाण्यांच्या उगवणीसाठी साधारणत: २१० सें.ग्रे. व पिकाच्या वाढीसाठी ३२० सें.ग्रे. तापमान उत्तम असते.लागवडीचा हंगामसाधारणतः मक्याची लागवड हि जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करावी.मका पिकाचे वाण अ) संकरित वाण :महिको 3845S, 3838
हेक्टरी बियाणे मक्यासाठी १५ ते २o किलो बियाणे प्रतिष्हेक्टर आवश्यकता असते. कमी आणि मध्यम कालावधीच्या वाणांनुसार लागवडीचे अंतर ठरविले जाते. जर कमी कालावधीचे वाण असल्यास लागवडीचे अंतर ६o × २o सें.मी. असते आणि मध्यम कालावधीच्या वाणांतील अंतर ७५ × २0/२५ से.मी. असते.पूर्वमशागत लागवडीपूर्वी शेतात असलेला काडीकचरा, धसकटे वेचून नष्ट करावीत. खोलवर नांगरट करुन दोन ते तीन कुळवाच्या या पाळ्या द्याव्यात. जमिनीमध्ये हेक्टरी १०-१२ टन “ शेणखत मिसळावे.बीजप्रक्रिया लागवडीपूर्वी प्रति एक किलो बियाण्यास २ ते २.५ १५ ते २0 ग्रॅम प्रतिकिलो प्रमाणे बियाण्यास प्रक्रिया करावी. त्यामुळे उत्पादनामध्ये ५ ते १० टक्के वाढ होते.
आंतरपिके मका पिकामध्ये खरीप हंगामात काही अांतरपिके घेता येतात. त्यात उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तूर यांचा समावेश होतो.त व्यवस्थापन लागवडीच्या वेळी प्रतिहेक्टरी ४० किलो नत्र,६० किलो स्फुरद व ४o केिली पालाश द्यावे. लागवडीनंतर ३o दिवसांनी ४o किलो नत्र तर लागवडीनंतर ४o ते ४५ दिवसांनी ४o किलो नत्र द्यावे.आंतरमशागत मक्यामधील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी अॅट्राझीन २.५ किलो ५oo लिटर पाण्यातून प्रतिहेक्टरी तण उगवणीपूर्वी जमिनीत ओलसरपणा असताना फवारावे. सरीवर टोकन केलेली असल्यास १o दिवसांनी नांग्या भरुन प्रति हेक्टरी झाडांची संख्या योग्य ठेवल्यास अपेक्षित उत्पादन मिळते.पाणी व्यवस्थापन मका लागवडीनंतर खरीप हंगामात साधारणत: १५ ते २o दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी.
Share your comments