MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

महत्वाचे!भारतातील कांदा उत्पादनाची स्थिती आणि काही प्रमुख कांदा जातींचे वैशिष्ट्ये

कांद्याची लागवड भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात देखील कांदा मोठ्या प्रमाणात लावला जातो.कांद्यालाकॅशक्रॉपअसेदेखीलम्हटलेजाते. यालेखातआपणकांद्याच्या काही जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये तसेच भारतातील कांदा उत्पादनाची स्थिती याबद्दल माहिती घेणार आहोत. भारतातील कांदा उत्पादनाची स्थिती 1-कांदा उत्पादनाच्या बाबतीत चिन चा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion india

onion india

कांद्याची लागवड भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात देखील कांदा मोठ्या प्रमाणात लावला जातो.कांद्याला कॅशक्रॉप असे देखील म्हटले जाते. यालेखात आपण कांद्याच्या काही जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये तसेच भारतातील कांदा उत्पादनाची स्थिती याबद्दल माहिती घेणार आहोत.

भारतातील कांदा उत्पादनाची स्थिती

1-कांदा उत्पादनाच्या बाबतीत चिनचा पहिला तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

2-भारताची उत्पादकता 15  ते 16 टन प्रती हेक्टर असून अमेरिकेची उत्पादकता 48 टन प्रती हेक्टरी आहे. चिनची प्रती हेक्टरी उत्पादकता21 टनआहे.

3-महाराष्ट्र, ओडिसा,कर्नाटक, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, बिहार,आंध्रप्रदेश, गुजरात, मधेप्रदेशात कांदा लागवडीचे क्षेत्र जास्त आहे.

4-महाराष्टात नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, नगर जिल्ह्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते.एकट्या नाशिक जिल्ह्यात राज्याच्या 35 ते 40टक्के तर देश्याच्या एकूण 10 टक्केउत्पादनहोते.

5-जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे. यासाठी  कांद्याची प्रतवारी महत्वाचीठ  रते.

कांद्याची महत्वच्या काही जाती आणि वैशिष्ट्य

1-भीमाकिरण:

1-कांद्याच्या काढणीनंतर फार कमीवेळात कांद्याला भूरकट लाल रंग येतो.

2-कांदे आकाराने मध्यम गोल असून, डेंगल्या चे प्रमाण फा कमी असते.

3-कांदे बारीक मानेचे, त्यातील एकूण विद्रावे घन पदार्थचे प्रमाण सरासरी12 टक्के असते.

4-कांद्याची साठवण क्षमता खूप चांगली असतं.सहा महिन्यांपर्यंतच्या कांद्याची साठवणूक करता येतो.

5- या कांद्याच्या जातीची 130 दिवसांत काढणीस होते.

6-या जातीपासून सरासरी उत्पादन 35 ते 40 टन प्रतिहेक्टर मिळते.

भीमाशक्ती

1-रांगडा, रब्बी या दोन्हीहंगामासाठी ही जातं फायदेशीर आहे.

2-काढणीनंतर आकर्षक लाल रंग येतो.

3-कांदाआकारानेगोल, डेंगळेवजोडकांड्यांचेसरासरीप्रमाणदोन्हीहंगामातफारकमीअसते.

4-एकूण विद्रावे घन पदार्थचे प्रमान सरासरी 11.8 टक्के आहे.

5-कांद्याची मान बारीक ते मध्यम जाडीची असते तसेच रब्बी हंगामात एकाच वेळेसमाना पडतात. रांगडा हंगामात  सरासरी 70 टक्केकांद्याच्यामानाएकचवेळेसपडतात.

6- लागवडीनंतर एकशे तीस दिवसात काढणे करता येते. या जातीची ही साठवणक्षमता चांगली आहे

7-फूलकिड्यानासहनशीलजातंआहे.

8-रांगडा हंगामात 40 ते 45टन प्रति हेक्टरी आणि रब्बीहंगामात 35 ते 40 टन प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते.

भीमाश्वेता

1-या जातींचे कांदे आकर्षक पांढऱ्या रंगाचे, आकाराने गोल, डेंगळे व जोडकांदयाचे  प्रमाण फार कमी असते.

2-

कांदे बारीक मानेचे, एकूण विद्रावे घनपदार्थ्यांचे प्रमान सरासरी 11.5 टक्केअसते.

3-हीजातं 120 दिवसात काढणीस येते. साठवणक्षमता मध्यम आहे.

4- रब्बी हंगामात तीन महिन्यांपर्यंत साठवण शक्य आहे.

5- फुलकिडे यांसाठी सहनशील आहेत.

6- या जातीपासून सरासरी उत्पादन 30 ते 35 टन प्रति हेक्‍टरी मिळते.

 

English Summary: main onion veriety and status of onion in india Published on: 28 September 2021, 01:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters