आल्याची लागवड प्रामुख्याने उष्ण व दमट हवामान तसेच ओलिताची सोय असलेल्या ठिकाणीआणि कोरड्या हवामानात आहे करता येते. साधारण सहा एप्रिल ते मे या कालावधीत 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात फुटवे फुटून उगवण चांगली होते. आले पिकाच्या वाढीसाठी सरासरी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.या लेखात आपण आल्या वरील प्रमुख किड व त्यांचे नियंत्रण याबद्दल माहिती घेणार आहोत.
आले पिकावरील प्रमुख किडी व नियंत्रण
- कंदमाशी- ही माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाचे असते.अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात.
नियंत्रण
- क्विनॉलफॉस( 25% प्रवाही) 20 मिली किंवा डायमिथोएट 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्टदरम्यान आलटून पालटून 15 दिवसांच्या अंतराने फवारावे.
- फोरेट( दहा टक्के दाणेदार) प्रति हेक्टरी 25 किलो या प्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरावे. पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे.
- याच कीटकनाशकाचे पुढील दोन हप्ते एक महिन्याच्या अंतराने ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये द्यावे.
- अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये.
- जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत.
पाने गुंडाळणारी अळी
- ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किडींचा प्रादुर्भाव दिसतो. किडींची आळी हिरवट रंगाच्या असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या शरीराभोवती पाणी गुंडाळून घेतेव आत राहून पानेखाते.
नियंत्रण
1-गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत.डायक्लोरव्होस 10 मिली किंवा कार्बारील 40 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खोड पोखरणारी आळी
1-जुलै ते ऑक्टोबर मध्ये आढळते. अळी छोट्या खोडाला छिद्र करून उपजीविका करते. त्यामुळे खोड पिवळे पडून वाळण्यास सुरुवात होते.अळीने पडलेल्या छिद्रावर जाळीदार भाग दिसतो.
नियंत्रण
- एक महिन्याच्या अंतराने 10 मिली मॅलेथिऑन प्रति लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.
सूत्रकृमी
1-मुळातील रस शोषण करतात.त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि पाने पिवळी पडतात. यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुज कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज प्रादुर्भाव होतो.
नियंत्रण
1-लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी पाच किलो ट्रायकोडर्मा प्लस शेणखत मिसळून द्यावे.
2- प्रति हेक्टरी फोरेट ( 10 जी ) 25 किलो या प्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे किंवा 18 ते 20 क्विंटल निंबोळी पेंड जमिनीत मिसळून द्यावे.
Share your comments