आले पिकाचा विचार केला तर हे पीक मराठवाडा पासून तर खानदेश पर्यंत बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे आल्या मधील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवनातील मसाल्यात आल्याचे महत्त्वाचे स्थान आहे.
ओलिताची सोय असल्यास एप्रिल आणि मे महिन्यामध्ये याची लागवड करता येते.या लेखात आपण आले पिकावर येणाऱ्या महत्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण याबद्दल माहिती घेणार आहोत.
आले पिकावरील रोग व त्यांचे नियंत्रण
- कंदकूज-
- हा रोग प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अधिक प्रमाणात दिसतो.
- यामध्ये प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात.
- खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाहीवरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो.
- हा रोग प्रामुख्याने सूत्रकृमी किंवा खुरपणी, आंतर मशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पीथीएम,फुजेरीयमयासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये प्रादुर्भाव होऊन कंद कुजण्यास सुरुवात होते.
या रोगाचे नियंत्रण
- लागवडकरतना निरोगी बियाण्याचा वापर करावा.
- हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.
- पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करावा.
- मेट्यालेक्सिल(8टक्के)+ मॅन्कोझेब (64 टक्के ) हे संयुक्त बुरशीनाशक अडीच ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेन्डाझिम(50 डब्ल्यू पी ) एक ग्रॅम किंवा मॅन्कोझेब अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बीजप्रक्रिया करावी.
- शेती मध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशकाची आलटून-पालटून फवारणी करावी.
- नरमकूज-
1-जमिनीत पाण्याचा निचरा बरोबर न झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
2-
शेंड्याकडून झाड वाळत जाते.
3- बुंध्याचा भाग सडल्यामुळे सहज उपटला जातो.
4- त्यानंतर जमिनीतील गड्डे सडण्यास सुरुवात होते.
या रोगाचे नियंत्रण
- रोगट झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
- लागवडीपूर्वी व नंतर दर महिन्याला पिकावर बोर्डो मिश्रण फवारावे.
- प्रत्येक वर्षी एकाच जमिनीत आले पिकाची लागवड न करता पिकाची फेरपालट करावी.
- पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत आले पिकाची लागवड करावी.
Share your comments