शेतीमध्ये सध्या आधुनिकीकरणाचे वारे वाहायला लागले असून मोठ्या प्रमाणात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये होत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक पिके घेणे शेतकऱ्यांना शक्य होत असून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळेल यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.
शेतीमध्ये यांत्रिकीकरण असो कि शेती करण्याच्या विविध पद्धती त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून दररोज वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत.
आता आपल्याला पॉलिहाऊस आणि ग्रींहाऊस तंत्रज्ञान माहिती आहे. या माध्यमातून अनेक प्रकारची पिके बिगर हंगामात देखील पिकवता येतात.
परंतु पॉलिहाऊस साठी लागणारा खर्च हा खूपच असतो. त्यामुळे त्या ऐवजी तंत्र तेच परंतु खर्च कमी असे तंत्रज्ञान पुढे येत आहे. नेमके हे तंत्रज्ञान काय आहे याविषयी या लेखात माहिती घेऊ.
लो टनेल फार्मिंग( प्लास्टिक बोगद्यातील शेती )
लो टनेल फार्मिंग हे पॉलिहाऊस चे एक छोटे रूप असे म्हणतात. या तंत्रज्ञानामध्ये कमी उंचीचे दोन-तीन महिन्यासाठी तात्पुरती रचना करून पिकांची विशेष करून भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. यामध्ये पॉलिहाऊस प्रमाणेच ऑफ सीजन भाजीपाला देखील घेतला जातो.
लो टनेल फार्मिंगची रचना
1- यासाठी कमी बोगदे तयार केले जातात व त्यासाठी सहा ते दहा मिमी झाड आणि दोन ते तीन मीटर लांब जीआय वायर किंवा बारचा वापर केला जाता.
नक्की वाचा:Nano Urea: अरे व्वा! युरियाच्या काही थेंबांनी दुप्पट उत्पन्न निघणार; जाणून घ्या कसे ते...
2- शेतकरी बारा ऐवजी बांबूच्या काड्या देखील यासाठी वापरू शकतात.
3- लोखंडाच्या सळ्या किंवा रॉड यांचे टोक वायरला जोडून ते मातीच्या बेडवर गाडले जातात. त्यामुळे त्यांची उंची अडीच ते तीन फूट पर्यंत होते.
4- यासाठी पट्ट्या आणि बॅटिस वरील तारांचे अंतर किमान दोन मीटर ठेवले पाहिजे.
5- हे स्ट्रक्चर उभे केल्यानंतर 25 ते 30 मायक्रॉन जाडीच्या पारदर्शक पॉलिथीनने ते झाकून ठेवावे.
6- हिवाळ्यात त्याचा वापर जास्त केला जात असला तरी उन्हाळ्यात याचा वापर केल्याने चांगले परिणाम मिळाले आहेत.
7- पॉलिहाऊस प्रमाणे कमी बोगद्यात लागवड केल्यास दोन ते तीन महिन्यांनी पीक तयार होते.
8- लो टनेल फार्मिंग पद्धतीत शेतकऱ्यांना झटपट पीक घेण्याची आणि दुप्पट पैसे कमावण्याची संधी मिळते.
9- या तंत्राचा वापर करून फळे आणि भाजीपाला जसे की कारले, टरबूज आणि खरबूज, काकडी, भोपळा इत्यादी भाजीपाल्याची लागवड करता येते.
10- यामध्ये सिंचनासाठी फक्त ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला जातो.
11- लो टनेल फार्मिंग साठी शेतकऱ्यांना संरक्षित शेती करण्यासाठी सरकार वाजवी दरात अनुदान देखील देते.
या तंत्राचे फायदे
1- जास्त हिवाळा असलेल्या भागांमध्ये हे तंत्र शेती करण्यासाठी अतिशय प्रभावी सिद्ध होत आहे.
2- कमी तापमान, दव आणि बर्फवृष्टी मध्ये याकामी बोगद्याच्या तंत्रज्ञानाने संरक्षक मशागत केल्याने नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
3- हवेतील आद्रता नियंत्रित करता येते. तसेच ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे पाण्याचे व खतांचे देखील मोठ्या प्रमाणात बचत होते.
4- लो टनेल मध्ये लागवड केलेल्या पिकाला तण, कीटक आणि रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो. त्यासोबतच मातीचे तापमान नियंत्रित केले जाऊन ओलावा राखला जातो. कमी कालावधीच्या पिकांसाठी हे तंत्रज्ञान खूप फायद्याची असून पॉलिहाऊस पेक्षा स्वस्त आहे.
Share your comments