1. कृषीपीडिया

लिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र

विदर्भात लिंबूवर्गीय फलोत्पादनाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी 80 लक्षाहून जास्त रोपे येथील 325-350 शासकीय व खाजगी रोपवाटीकेत तयार करून विकली जातात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
लिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र

लिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र

विदर्भात लिंबूवर्गीय फलोत्पादनाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी 80 लक्षाहून जास्त रोपे येथील 325-350 शासकीय व खाजगी रोपवाटीकेत तयार करून विकली जातात. रोपवाटिकेचे चांगले व्यवस्थापन हे स्वस्थ व उत्पादनक्षम लिंबूवर्गीय फलोउद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सातत्याने उत्तम फळाचे भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाचे जेवढे महत्त्व आहे. तेवढेच मातृवृक्षाला कीड व रोगापासून सुरक्षित ठेवणेही महत्त्वाचे आहे. विषाणूग्रस्त रोगट मातृवृक्षामुळे रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होईल.

भारतामध्ये आंबा, केळीच्या नंतर लिंबुवर्गीय फळांच्या उत्पादनाचा तिसरा क्रमांक लागतो. देशातील या फळपिकांखालील क्षेत्र 0.483 मिलीयन हेक्टर असून 4.251 मिलीयन टन एवढे वार्षिक उत्पन्न आहे. लिंबूवर्गीय उत्पादनात जगात भारताचा सहावा क्रमांक लागत असून 4.8% वाटा भारताचा आहे. या फळपिकांखालील क्षेत्रात वार्षिक 9.3% या दराने वाढत असले तरी उत्पादनात मात्र त्याप्रमाणात वाढ झालेली नाही. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे लिंबूवर्गीय उत्पादन फारच कमी म्हणजे ते फक्त 8.8 टन/हे. आहे. तेच प्रगत राष्ट्रात 25 ते 30 टन/हे. आहे.

 

त्याचप्रमाणे फायटोपथोरा नामक बुरशीला सहज बळी पडणारा खुंट जर वापरला तर बुडकुज, मुळकुज, डिंक्या इत्यादी रोगांची लागण तर होईलच शिवाय झाडाची वाढ सुद्धा मंदावेल, कालांतराने ऐन उमेदीच्या काळात बागेचा ऱ्हास होईल. यामुळेच अधिकांश झाडे मरतील, पाने पोखरणारी अळी ही अत्यंत नुकसानदायक कीड असून लहान रोपट्यांवर या किडीचा प्रदुर्भाव अधिक गंभीर होतो. झाडाची वाढ एकदम खुंटते. त्यासाठी या किडीवर लक्ष ठेवून वेळच्यावेळी योग्य किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करून किडीस आटोक्यात ठेवले पाहिजे. 

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळसंशोधन केंद्र, नागपूर येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रोपवाटिका व्यवस्थापनेसाठी करून लिंबाची रोगविरहित रोपे तयार करण्याचे लक्ष्य निर्दीष्ठीत असा हा एकमेव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अल्प उत्पादनात, बागाच्या उत्पादनक्षम आयुर्मयादित लक्षणीय घट व शेवटी बागांच्या ऱ्हास होणे इत्यादीस एकमेव कारण म्हणजे रोगविरहीत सुदृढ रोपे उपलब्ध न होणे हे होय. या प्रकल्पाअंतर्गत बुरशी व विषाणुयुक्त रोगांपासून मुक्त अशी तयार केलेली ही रोपटी शासकीय व खाजगी पन्हेरीत मातृवृक्ष म्हणून वापरली जावीत हा हेतू आहे. यामुळे बागेच्या होणाऱ्या ऱ्हासावर मात केली जावू शकेल.

 

रोगमुक्त रोपे तयार करण्यासाठी वापरात आणलेल्या तंत्राची माहिती पुढीलप्रमाणे:

कंटेनराईन्ड (बंदीस्त) रोपवाटिका पद्धती: 

पारंपारिक पन्हेरीत एकदा का फायटोफ्थोरासारख्या मातीजन्य बुरशीचा शिरकावा झाला की तीचा नायनाट करणे अशक्यप्राय होते. हे टाळण्यासाठी बंदीस्त रोपवाटिका पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. अशा पन्हेरीसाठी शेड नेट हाऊस (50% सावली), निर्जंतुक केलेले प्लॅस्टिक ट्रे, युव्ही स्टॅबीलाईज्ड काळ्या पॉलिथीन पिशव्या (100 मायक्रॉन), सौर उर्जेद्वारे पॉटींग मिक्चरचे (मातीचे आदी) निर्जंतुकीकरणासाठी युव्ही स्टॅबीलाईज्ड पारदर्शक पॉलिथीन, पॉटींग मिक्चरचे धुरळीकरण व रोपवाटीकेसाठी लागणारी वेगळी अवजारे इत्यादींची आवश्यकता असते. 

पॉटींग मिक्सर: एक भाग सुपीक माती, 2 भाग निर्जंतुक केलेली वाळू यांचे मिश्रण प्राथमिक रोपवाटिकेत प्लॅस्टिक ट्रेमध्ये बीजारोपण करण्यासाठी टाकतात, असेच निर्जंतुक केलेले वाळू-मातीचे मिश्रण द्वितीय रोपवाटिकेत प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरण्यासाठी वापरावे लागते.

सौर निर्जंतुकीकरण: उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात जेव्हा 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाते तेव्हा विशेषरित्या तयार केलेल्या सिमेंटच्या ओट्यावर वाळू-मातीच्या पॉटींग मिक्चरचा दीड फुट जाडीचा थर करून पसरावे. या पॉटींग मिक्चरवर पाणी शिंपडून त्यास चांगले ओले करावे. त्यानंतर त्यास 100 मायक्रॉन जाडीच्या पारदर्शक अल्ट्राव्हायोलेट लाईट द्वारा उपचारीत पॉलीथीनच्या चादरीने झाकून घ्यावे. पॉलीथीनच्या सर्व कडा ओल्या मातीने बंद कराव्यात. जेणेकरून बाष्पीभवनाद्वारे होणारी वाफ बाहेर निसटणार नाही. त्यामुळे आतील तापमान 54 डी.से. पर्यंत वाढते. परिणामत: 4 ते 6 आठवड्यापर्यंतचालणाऱ्या या क्रियेस सौर उर्जेद्वारे पॉटींग मिक्चरने निर्जंतुकीकरण केले जाते.

विषारी धुरळणी: सौर उर्जेद्वारे निर्जंतुक केलेल्या पॉटींग मिक्चरचे पुन्हा बासामिड (डॅझोमेंट) नामक रोगनाशकाचे दाणे मिसळून त्यास निर्जंतुक केले जाते. या दाण्यांतून मिथाइल आयसोसायनाईड हा विषारी वायू निघतो. त्याद्वारे फायटोफ्थोरा, पिथीयम, रायझोक्टोनिया आणि फुझॅरीयमसारख्या मातीजन्य बुरशी रोगांचा नायनाट होतो. अशाप्रकारे सौर ऊर्जा व बासामिडचा वापर करून निर्जंतुक केलेले पॉटींग मिक्चर प्लॅस्टिक ट्रे व पॉलिथीन पिशव्यात भरण्यात येते. प्राथमिक रोपवाटीकेत खुंटाचे रोपटे तयार करण्यासाठी 60x40x12 सें.मी. आकाराचे निर्जंतुक केलेले प्लॅस्टिक ट्रे वापरण्यात येतात. हे ट्रे जमिनीमधून कुठल्याही मातीजन्य रोगांची लागण होवू नये हा यामागील हेतू रोपवाटिकेत जमिनीवर दगडी पावडरबारीक बाजरीचा 2 ते 4 इंच जाडीचा थर टाकवा. त्यामुळे जमिनीवर पाणी पडले तरी वर उडणार नाही व त्याद्वारे कुठलेही मातीजन्य रोगाणू पसरू शकणार नाहीत. याशिवाय चुना व मोरचूद मिश्रणही नियमितपणे फवारावे. 

 

द्वितीय रोपवाटिका: 

उत्कृष्ट वाढीची व योग्य उंचीची खुंटाची प्राथमिक रोपवाटीकेतील न्युसेलर रोपटी (प्रत्यक्ष पाहणीच्या आधारावर) निवडावी. पॉलीबॅगमध्ये रोपण करण्यासाठी अशी रोपटी उपटतांना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. खूप उंच किंवा खूप ठेंगणी रोपे तसेच वाकलेली, मुरडलेली, हुकसदृश्यमुळे असलेली रोपे प्राथमिक रोपवाटीका स्तरावरच निरस्त करावीत. फायटोफथोरा व अन्य मातीजन्य रोगाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोपवाटीकेचे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक असते. 

अशी निवडक सुदृढ, रोगविरहीत रोपांची पावसाळ्यांची सुरुवात झाल्यावर जुलै-ऑगस्ट महिन्यात शक्यतोवर सायंकाळी किंवा रिमझीम पाऊस असताना लागवड करावी. 

व्हायरस (विषाणू) व वायरस सदृश्य रोगांचे निदान: 

लिंबूवर्गीय फळझाडांवर 15 हून अधिक व्हायरस (विषाणू) व व्हायरससदृश्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. ही संभावना टाळण्यासाठी निवड केलेल्या उत्कृष्ट मातृवृक्षाचे नमुने गोळा करून सिट्रस ट्रिस्टेजा वायरस, सिट्रीस एक्झोकॉरटीस, व्हायराईड, ग्रिनीन बॅक्टेरीयम इ. रोगाणूविषयक जैविक/सेरॉलॉजीकल तपासणीद्वारे निवडलेले मातृवृक्ष वरील रोगाणूपासून मुक्त असल्याची पक्की खात्री केली जाते.

सेरॉलॉजीकल तपासणी: मोनोक्लोनल (सीटीव्ही) आणि पॉलीक्लोनल (सीटीव्ही, रिंगस्पॉट, मोझॅक) अॅन्टीबॉडीजचा वापर करून डीएएस-इलिसामध्ये सेरॉलॉजीकल इन्डेक्सींग केली गेली. 

जैविक तपासणी (बायो-डायग्रोसीस): इंडीकेटर झाडांचा (लिंबू ट्रिस्टेजासाठी, स्वीट ऑरिंज ग्रिनींग आणि मोझॅक व्हायरस (विषाणू) साठी, इट्रांगड सिट्रान एक्सोकॉरटीसाठी आणि स्वीट ऑरेंज चिनोपोडीयमक्विनोआई (रिंगस्पॉटसाठी) उपयोग करून किड अवरोधक आवरणाखाली जैविक इंडेक्सींग सुद्धा करण्यात येते. अशाप्रकारे निवडलेल्या उत्कृष्ट मातृवृक्षातील व्हायरसहीत झाडेच पुढील प्रजोत्पादनासाठी वापरण्यात येतात. 

रोप संरक्षण उपाययोजना:

फायटोकथोरा रोगासाठी पाहणी: लिंबूवर्गीय रोपवाटीकेत फायटोफथोरामुळे होणाऱ्या रोगांचा गंभीर उपद्रव होतो व रोपवाटीच्या कुठल्याही अवस्थेत संक्रमित माती, पाणी तसेच रोपवाटीकेतील औजाराद्वारे सुद्धा या रोगाणूंचा प्रादुर्भाव व प्रसार होवू शकतो. म्हणून फायटोफथोरा व अन्य रोगांच्या संसर्गासंबंधी नियमित पाहणी करावीत. संसर्ग झाला आहे असे आढळून येताच संसर्गीय रोपटी समूळ उपटून नष्ट करावीत. हेतू हाच की, फायटोफथोरा व तत्सम रोगापासून रोपवाटीका पूर्णत: मुक्त राहील. खबरदारीचा उपाय म्हणून रिडोमिल एमझेड 72 किंवा हार्मोनी या सेंद्रिय बुरशीनाशकाची फवारणी एका महिन्याचेअंतराने फायटोफथोराचा संसर्ग टाळण्यासाठी करावी. नर्सरीतील औजारे सोडियम हायपोक्लोराईट द्रावणात प्रत्येकवेळी बुडवून नियमितपणे निर्जंतुक करावीत, तसेच रोपवाटीकेच्या प्रवेशद्वारता कामगारांचे व आगंतुकांची पादत्राणे निर्जंतुक करण्यासाठी व त्याद्वारे होणाऱ्या संभाव्य रोग संसर्गापासून बचावासाठी चुना व मोरचूदाने मिश्रण पसरवून ठेवावे. 

किडी: द्वितीय नर्सरीत कांडीचे व्यवस्थापन आवश्यक असते. त्यासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची नियमितपणे फवारणी करावी. केलेल्या कीटकनाशकांची नियमितपणे फवारणी करावी. पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 1.25 मिली फेनवलरेट 1 मि.ली. (45 दिवसातून एका) आणि इमिडॅक्लोप्रिड 0.5 मिली/लि. पाणी याप्रमाणे आलटून पालटून तर एफीड आणि पाने खाणाऱ्या अळीसाठी क्लिनॉलफॉस 1 मिली/लि. पाणी या दराने फवारणी करावी. वरील किटकनाशकाच्या फवारणी चक्रात कडू नीम ऑईल (1%) व स्प्लेंडर सेंद्रिय किटकनाशकाचा समावेश (फवारणी) केल्यास किडींचे प्रभावकारी नियंत्रण होते. 

English Summary: Lime crop healthy and disease resistant nursery Published on: 08 February 2022, 05:06 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters