1. कृषीपीडिया

फळ वर्गीय पिकावरील फळमाशी व तिचे एकात्मिक व्यवस्थापन करूया फळमाशी ट्रॅप लावून.

नमस्कार शेतकरी बंधूंनो फळ पिकावर येणारी फळमाशी या किडीचा प्रादुर्भाव पेरू व्यतिरिक्त आंबा सिताफळ टरबूज खरबूज संत्रा डाळिंब व इतर काही वेलवर्गीय पिके भाजीपाल्यावर सुद्धा आढळून येतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
फळ वर्गीय पिकावरील फळमाशी व तिचे एकात्मिक व्यवस्थापन करूया फळमाशी ट्रॅप लावून.

फळ वर्गीय पिकावरील फळमाशी व तिचे एकात्मिक व्यवस्थापन करूया फळमाशी ट्रॅप लावून.

फळमाशी ची प्रौढावस्था घरी दिसणाऱ्या माशी सारखी दिसते व साधारण पाच ते सहा  मी. मी. लांब असते. फळ माशीचा मागील भाग टोकदार व गर्द कथ्या रंगाचा असून पंख सरळ लांब होतात. साधारणपणे फळ माशी पिवळसर सोनेरी दिसते.  फळमाशीचि मादी माशी सर्व फळाच्या पक्व फळात दोन ते तीन मी. मी. खोल फळाच्या सालीखाली   साधारणत 100 ते 150 अंडी घालते या अंड्यातून साधारणत दोन ते तीन दिवसात मळकट पांढऱ्या रंगाच्या बिन पायाच्या अळ्या बाहेर पडतात. ह्या अळ्या तोंडाच्या बाजूस निमुळत्या असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या फळातील गरावर आपली उपजीविका करतात.

परिणामी अंडी घातलेल्या ठिकाणी फळे सडायला लागतात आणि गळतात. फळातील गरावर उपजीविका करत असल्याने फळे सडून गळून पडतात काही फळे बाहेरून चांगली दिसली तरी आतून खराब व कुजलेली असतात.

या किडीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केल्याप्रमाणे रक्षक सापळ्यांचा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. विद्यापीठाने शिफारस केलेले प्रती एकर दहा ते बारा फळ माशीचे रक्षक ट्रॅप सापळे पिकाच्या उंचीच्या प्रमाणे चार ते पाच फूट अथवा झाडावर टांगून ठेवावेत.

जर तुम्ही संत्रा, मोसंबी, बोर, केळी, चिकू, आंबा, पेरू, सीताफळ, कलिंगड, खरबूज, भोपळा, कारली व काकडी हि पिके घेत असाल तर आपल्या बागेत फळमाशी चे सापळे पहिल्याच पावसानंतर लगेच वापरायलाच हवे. प्रत्येकच फळपीका मध्ये अकाली व परिपक्व अवस्थेतील फळांची मोठ्या प्रमाणातील गळ होन्या मागचे प्रमुख कारण "फळमाशी" होय. फळांच्या अपरिपक्व/कच्या अवस्थेतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्यांनी केलेला अक्षम्य निष्काळजीपणा किंवा त्या बद्दलचे अज्ञानच होय. 

"फळमाशी" चा प्रादुर्भाव फळमाशी च्या ट्रॅप (गंध सापळे) द्वारेच शक्य होतो. परंतु कोणत्याही फवारणीमुळे ते शक्यच होत नाही.

महेश जाधव 

जैविक कृषी मार्गदर्शन केंद्र,कोलवड

मानवसेवा जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड बुलढाणा

English Summary: Let's manage the fruit on the fruit crop and its integrated management by setting a trap with the fruit. Published on: 05 December 2021, 08:00 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters