गेल्या काही वर्षापासून हुमणीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. यावर्षी सुद्धा हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर, बुलढाणा, कोल्हापूर, धुळे, सांगली आणि इतरही जिल्ह्यात हुमणीचा प्रादुर्भाव दरवर्षी आढळून येतो. हुमणीचे सर्वाधिक नुकसान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होते. हुमणी अळी खरिपात ऊस, भुईमूग, ज्वारी तर रब्बी हंगामात हरभरा, गहू व फळझाडे तसेच भाजीपाला पिके यासारख्या पिकांवर होत असतो.
कसे ओळखाल हुमणीला
हुमणीला इंग्रजीमध्ये व्हाईट ग्रब असे नाव आहे तर शास्त्रीय नाव होलेटोट्राचिया सेरॅटा असून याचे प्रौढ भुंगेरे लाल व तपकिरी रंगाचे आढळतात. त्याची लांबी २५ ते ३० मिलिमीटर पर्यंत असते. शरीरावरील भाग मजबूत असतो आणि तो पांढरट पिवळसर रंगाचा असतो. त्यांचे डोळे लाल रंगाचे दिसून येतात. या अळीची लांबी साधारण ३० ते ३५ मी मी असतो तर या अळींचा आकार C सी या इंग्रजी अक्षराप्रमाणे आकार असतो.
जीवनक्रम
मान्सूनपूर्व पाऊस झाला की, प्रौढ भुंगेरे नर व मादी जमिनीतून बाहेर येतात. नर व मादी व रात्रीच्या वेळेस निंब, बाभूळ, बोर या झाडावर मिलन करतात. मिलन झालेली माशी चार ते पाच ठिकाणी जमिनीमध्ये आठ ते दहा सेंटिमीटर खोल जागेत आठ ते दहा अंडी एका ठिकाणी देतात. ही अंडी नऊ ते दहा दिवसात उबविण्यास सुरुवात होऊन त्यातून अळी बाहेर पडते. हुमनी अळीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोश आणि शेवटी प्रौढ या चार अवस्थांमध्ये पूर्ण होत असतो.
(A) हुमनी या किडीचा प्रादुर्भाव व नुकसान कोण कोणत्या पिकात आढळून येतो ?
हुमनी ही बहुपक्षीय कीड असून या किडीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस, हळद, सोयाबीन, भुईमूग ,ज्वारी, मका, भात, हरभरा ,गहू , मिरची या व इतर काही पिकांवर आढळून येतो. ज्या ठिकाणी वालुकामय जमिनी आहेत अशा ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव तीव्र स्वरूपात आढळून येऊ शकतो व या किडीच्या तीव्र प्रादुर्भावआत 30 टक्के पासून 80 टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते.
(B) हुमनी या किडीच्या कोणत्या महत्त्वाच्या प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात?
महाराष्ट्रात हुमनी या किडीच्या प्रामुख्याने दोन प्रजाती आढळून येतात. यापैकी होलोट्रीकिया ही हुमनी किडीची प्रजात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या नांदेड बुलढाणा अहमदनगर धुळे सांगली कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यात तर लूकोफोलीस या हुमणीच्या प्रजातीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आढळून येतो.
(C) हुमनी या किडीची इतर काही प्रचलित नावे आहेत का?
हुमणी कीड इंग्रजीत White grub या नावाने ओळखले जाते. या किडीची वेगवेगळ्या भागात खतातील अळी, उंकरी, मुळे खाणारी अळी, मे किंवा जून महिन्यातील भुंगेरे इत्यादी व इतर काही स्थानिक नावाने सुद्धा ओळख आहे.
(D) हुमनी किडीच्या जीवनचक्रात कोण कोणत्या अवस्था असतात?
हुमनी किडीच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश व प्रौढ भुंगेरे अशा चार अवस्था असतात. प्रौढ भुंगेरे पावसाळ्याच्या पहिल्या पावसापर्यंत जमिनीत सुप्तावस्थेत राहतात.
(E) हुमनी या किडीमुळे पिकात नेमके कशा प्रकारे नुकसान होते ?
हुमनी या किडीची अळी अवस्था नुकसानदायक असून अंड्यामधून निघणाऱ्या हुमनी या किडीच्या प्रथम अवस्थेतील अळ्या झाडाची तंतुमय मुळे खाण्यास सुरुवात करतात. काही कारणास्तव त्यांना तंतुमय मुळे उपलब्ध नसल्यास ह्या प्रथम अवस्थेतील अळ्या काही दिवस सेंद्रिय पदार्थ पदार्थावर जगतात व नंतर पिकाच्या मुख्य मुळावर हल्ला करून झाडाची मुळे खाण्यास सुरुवात करतात त्यामुळे झाडे सुरुवातीला पिवळी पडून नंतर पूर्णपणे वाळायला लागतात. प्रादुर्भावग्रस्त झाडे सहज उपटली जाऊ शकतात. या किडीच्या अळीने मुळे खाल्ल्यामुळे शेतातील झाडे सुकून वाळून गेल्यामुळे पिकातील झाडांच्या संख्येत लक्षणीय घट होऊन पिकाच्या उत्पादनात सुद्धा लक्षणीय घट येते. या व्यतिरिक्त या किडीचा प्रौढ भुंगा बाभूळ ,कडुनिंब बोर इत्यादी झाडांची पाने खातो.या किडीच्या अळी अवस्थेमुळे सर्वसाधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त प्रमाणात नुकसान होते.
Share your comments