
चला जाणून घेऊ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील फळबाग लागवडी विषयी
आज आपण या लेखा मधून जाणून घेणार आहोत एका शासकीय योजनेबद्दल ती योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून मोठा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.लाभार्थी पात्रता- शेतकरी यांचे स्वत:चे नावे 7/12 असणे आवश्यक. जर 7/12 उतारावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमती पत्र आवश्यक. 7/12 उतारा वर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक. ज्या शेतकरी यांच्या कुटुंबाची उपजीविका
केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य व त्यानंतर अन्य शेतकरी यांचा विचार करण्यात येइल (कुटुंबाची व्याख्या- पती पत्नी व अज्ञान मुले). लाभार्थी यांच्या मालकीची किमान 0.20 हे जमीन असणे बंधनकारक आहे. )
चला जाणून घेऊ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील फळबाग लागवडी विषयी
ब.लागवडीसाठी पात्र फळपिके (कलमे) - आंबा, डाळिंब,पेरू,सीताफळ,आवळा,कागदी लिंबू,संत्रा व मोसंबी. इच्छुक शेतकऱ्यांना लिंबू आणि सीताफळ कलमे उपलब्ध होत नसल्यास रोपांची लागवड करता येईल. क) . अनुदान मर्यादा - 100 टक्के. अनुदान हे 3 वर्षाच्या कालावधीत मिळनार.Grant limit - 100 percent. The grant will be available for a period of 3 years.
प्रथम वर्षी 50 टक्के, दुसरे वर्षी- 30 टक्के, व तीसरे वर्षी- 20 टक्के. ड.अर्ज कुठे करावा - इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. पूर्व संमती प्राप्त झाल्येनंतर उपविभागीय कृषि अधिकारी यांनी तांत्रिक मान्यता दिल्यावर शासकीय / नोंदणी कृत खाजगी रोपवाटिका यामधून कलमे/रोपे खरेदी
करून लागवड करावी. इ ) आवश्यक कागदपत्रे - 7/12 व 8 अ ) ई) लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रती हेक्टर - 1. आंबा कलमे(5x5 मी) - 102530 रु. 2. पेरु कलमे (3x2 मी) - 202090 रु. 3. पेरु कलमे (6x6 मी) - 62472 रु 4. सन्त्रा (6x 3 मी) - 99716 रु. 5. सन्त्रा मोसंबी कागदी लिंबू कलमे (6x 6मी) - 62578 रु. 6. सिताफळ कलमे(5x 5 मी) -72798 रु. 7. डाळिंब कलमे(4.5x3 मी)- 109487 रु. 8. आवळा कलमे(7x7 मी) - 49735 रु.
Share your comments