1. कृषीपीडिया

कांद्याची मान उतरू द्या! फवारणीने ती जिरवू नका.'

लागवड कांदा पीक साधारण ८० दिवसाचे तर पेर कांदा पीक साधारण १०५ दिवसाचे झाल्या नंतर नैसर्गिक प्रक्रियेनुसार हळूहळू मान व पातीतून उलट

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कांद्याची मान उतरू द्या! फवारणीने ती जिरवू नका.'

कांद्याची मान उतरू द्या! फवारणीने ती जिरवू नका.'

लागवड कांदा पीक साधारण ८० दिवसाचे तर पेर कांदा पीक साधारण १०५ दिवसाचे झाल्या नंतर नैसर्गिक प्रक्रियेनुसार हळूहळू मान व पातीतून उलट दिशेने मुळाकडे साठवलेला अन्नरस कांदागोळा साईझ होणेसाठी परंतु लागतो. 

 कांदा नैसर्गिकरित्या जेंव्हा काढणीस येतो. तेंव्हा कांदापातीतील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होतो. कांदा आवरण पत्तीही मजबूत होते. पात पिवळसर होवून कांद्याची मानही मऊ होते. पात मानेजवळ वाकून जमिनीवर पडते. थोडक्यात पिकाची मान अन्नरस फळगोळ्यात जिरूनच कोसळू लागते. आणि तेंव्हाच कांदा काढणीस आला असे समजावे. त्यावेळेस मात्र कांदागोळा साईझकडे बघून काही उपयोग नसतो. कारण त्याची तयारी अगोदरपासूनच असावी लागते. शेवटला त्यासाठी करण्याचे उपाय संपलेले असतात.

 खरं तर (i) ' कांद्याची जात ' (ii) ' जमिनीचा पोत ' व सदर वर्षातील मिळालेले व काढणीवेळेस असलेले (iii) ' हवामान ' ह्या तीन गोष्टी खरं तर त्या शेतातल्या कांद्याचा साधारण एकूण पीक कालावधी तसेच काढणीसाठीची तारीख इ. ठरवत असतात. ह्यात बदल करण्याचा आपला उपदव्याप हा निरर्थक असतो. 

अर्थात लाल कांद्याचा गोळा हा कमी तास दिवस लांबी सूर्यप्रकाश उष्णतेवरही (१२ तास किंवा कमी) बांधला जाऊ शकतो मात्र उन्हाळकांदा हा १४ तासाच्या आसपास सूर्यप्रकाश असलेल्या दिवस लांबीच्या उष्णतेवरच चांगला बांधला जातो. हे असले तरी विसंगत वातावरणात थंडी जर अधिक पडली तर गोळा बांधण्यास अधिक उशीर होतो.

मात्र, काही शेतकरी पात तर हिरवी आहे अन कांदा तर लवकर बाहेर काढावायचाच आहे. मग अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळाच दिसावा तसं शेतकऱ्यांना फक्त पिकाची मान व हिरवी पात दिसते. आता तुम्ही म्हणाल मग त्यानं काय करायला हवं? 

 बघा, ज्या पिकाची मान पोषणासाठी व पात हिरवी होण्यासाठी ३-३ महिने जीवाचं रान आपण करतोय अन नेमके त्या वेळी आपण हा सर्व अन्नरस कांदागोळ्यात उतरतेवेळी फवारणी करून किंवा टिपडं फिरवून सुकवायचा प्रयत्न करतो. म्हणजे अन्न खाऊन पचनावस्थेतच असतांना बाहेर काढण्यासारखेच प्रयत्न आपण करतो असे नाही काय? 

खरं तर आपले कष्ट पाहून परमेश्वरालाआपल्या प्रमाणे पिकालाही न्याय द्यावायचा असतो. म्हणून तर पुर्ण वेळ झाल्यावरच पीक मोबदला आपल्याला देण्याची परिस्थिती तो घडवून आणत असतो. 

 पण मग आपण त्याच्या कार्यक्रमात बाधा आणतो. म्हणजे शिजेपर्यंत दम असतो आपल्याला पण नीवेपर्यंत नाही. असे असेल तर मग पीक हातात घेण्यासाठी काही तरी आपण चुकतोयं,असे नाही काय? 

अन्नरस जिरणे व मान पडणे हे केवळ त्यावेळच्या अस्तित्वात असलेल्या वातावरणीय अवस्था म्हणजे (i)एकदम शांत वारा (ii)अति उष्णता (iii) निरभ्र आकाश, व (iv) ३०-३५% च्या आसपास असलेली सकाळची आर्द्रता तसेच

(v) जास्त सूर्यप्रकाश मिळणाऱ्या दिवसाची लांबी अश्या अनुकूल हवामानावरच ह्या गोष्टी अवलंबून असतात. हे हवामान घटकच अनुकूल असले तर कांदा काढणीस उपयोगी पडतात. तुमची रासायनिक फवारणी विशेष उपयोगी पडत नाही. म्हणून तर ह्या घटना साधवण्यासाठी वेळेत लागवड अन पेर करावी लागते. 

आपणास वाटते, पण माझ्या मते रासायनिक फवारण्या उपयोगी न पडता आपल्या अज्ञानापोटी अजुन अधिक आदब वाढवण्याचे आपण काम करतो. ह्याला तर मी द्रविडी प्राणायामच समजेन. फक्त एकरी कांदा उत्पादन खर्चाचा आकडा फुगवाण्यास मात्र नक्कीच आपण मदत करतो. 

बरं, मग, कांदापात व मान किती पडली असतांना कांदा काढावा? येथेही गैरसमजच आहे. फक्त ४०% मान-पात पडली व ६०% मान-पात हिरवी असतांनाच खरं तर कांदा काढावयास हवा. तेंव्हाच कांदागोळा घट्ट होवून कांदा आवरण पत्ती घट्ट होते. मग अधिक सुकवण्याचा अट्टाहास कश्यासाठी? 

 साधारणपणे ४० टक्के कांदा पीक सुकल्यानंतर काढतांना विशेषकरून एक खबरदारी मात्र जरूर घ्यावी, ती म्हणजे कांदा ढीग न करता पहिला कांदा दुस-या ओळीच्या कांद्याच्या पातीने झाकून जाईल, अशा पद्धतीने जमिनीवर एकसारखा पसरवून पाच दिवस वाळवावा. म्हणजे ह्या पाच दिवसातही मानेत राहिलेला अन्नरसही कांद्यात पूर्णपणे उतरतो ही सुद्धा महत्वाची नोंद मनी असावी. फार झालं तर उपासल्यानंतर ५ च्या ऐवजी ७ दिवसांनी ४ इंचावर कांदा नाळ कापावा. 

म्हणजे अन्नरस उतरण्यासाठी तो कांदा शेतात १५ दिवस उभा असल्यासारखाच फायदा होतो. शिवाय कांदागोळ्याला कलरही येतो. पुन्हा वेगळी पोळ करून पातीखाली झाकण्याची अन उचलटाक करायची गरज नाही. डायरेक्ट लालकांदा ट्रॉली लोड करून मार्केटिंग करू शकता किंवा उन्हाळ कांदा असेल तर चाळ साठवणीसाठीही तुम्ही आणू शकतात. तो निर्णय आपला असेल पण आदाब कमी व काढणी अधिक सुलभ नक्कीच होईल. 

पण आपण वर (१३) मध्ये सांगितल्याप्रमाणे करतच नाही. मजूरही ह्या करणीला सहमत होत नाही. त्यामुळे करणही शक्य होत नाही. उन्हाळ कांदा काढतांना अवकाळी पावसाची भितीही असते. आपल्यालाही काढणीचा उरक हवा असतो. पण तरीही शक्य असेल तर योग्य नियोजनातून व मजूर चर्चेतून हे आपण साध्य करू शकतो. तसेच करण्याचा माझा आग्रहच राहील. 

 तेंव्हा, कोणतीही काढणीसाठी रासायनिक फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीनेच सुकवून कांदा काळ्या आईच्या उदरातून ती देईल तेंव्हाच शेवटी आपल्या पदरात घ्यावा. असेच मला म्हणायचे आहे. 

अर्थात वरील हे सर्व माझे वैयक्तिक मते असुन कधी काय करायचे शेवटी तो आपला स्वतःचा निर्णय असावा. परंतु वरील लेखात ह्या संबंधी काही विसंगती असल्यास मला चर्चा करायला मात्र नक्कीच आवडेल. 

 

माणिकराव खुळे - Manikrao Khule

Meteorologist (Retd.), IMD Pune.

ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक

English Summary: Let the onion neck down! Don't spray it. ' Published on: 31 March 2022, 12:22 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters