1. कृषीपीडिया

उन्हाळी चवळी लागवड जाणून घ्या

शेतकरी बंधुनो सध्या कपाशी चे शेत मोकळे झाले आहे. बर्याच शेतकरया नी रबी गहु,मका पेरला आहे आतां कमी कालावधीचे पिके घ्यावी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
उन्हाळी चवळी लागवड जाणून घ्या

उन्हाळी चवळी लागवड जाणून घ्या

शेतकरी बंधुनो सध्या कपाशी चे शेत मोकळे झाले आहे. बर्याच शेतकरया नी रबी गहु,मका पेरला आहे आतां कमी कालावधीचे पिके घ्यावी टरबूज, खरबुज घेण्यास हरकत नाही पण मार्केटिंग चा प्रश्र आहे बागवान लोक माल कमी भावात मागणी करतात मार्केट मध्ये माल गेल्यावर दलाल भाव पाडतात शेतकरया ना परवडत नाही.

    उन्हाळी चवळी शेतकरया नी कपाशी च्या ठिबक वर पेरणी करावी ठिबक नळया च्या दोन्ही बाजूला एक फुटावर दुश्या पांभरीने सरी काढुन 

ओलऊन घ्या वे व एक ते दिड फुटाचे अंतरावर चवळी चे बियाणे टोकण करावे भाजी ची मोठी चवळी कृषि केंद्रावर मिळेल.

    पेरतांना सुपर फाॅसफेट च्या दोन गोणी टाकाव्यात किंवा 

10/26/26 ,किंवा 18/18/10 ची एक गोणी खत द्या वे 

उगवण झाले वर नऊ इंचाचे पिक झाले वर शेंडे छाटणी करावी. 

एक महीन्याने युरीया एकरी एक बॅग द्यावी. उन्हाळी चवळी वर मावा,व भुरी रोग आल्यावर औषधी फवारणी करावी .

हिरव्या शेंगा भाजी साठी विक्री 

स्वतः करावी ऊनहाळयात भाजी पाला नसल्याने चांगला भाव मिळतो. चवळी पिक पंचेचाळीस दिवसात शेंगा लागुन विक्री करता येईल. हीरव्या शेंगा भाजी साठी विक्री न झाल्यास पक्व झालेवर शेंगा तोडुन चवळी दाणे काढुन उसळी साठी व्यापारी मागणी करतात त्याला खुप मागणी आहे. नसल्यास चवळी ची डाळ करुन विक्री करावी ती फायदेशीर होईल .सोबत चवळी लागवडीचे पी डी एफ माहिती साठी पाठवित आहे.

चवळीची लागवड साधारणतः उन्हाळी आणि खरीप या दोन्ही हंगामांत करतात, पण महाराष्ट्रात हिवाळ्यात कडाक्याची थंडी पडत नसल्याने चवळीचे पीक जवळजवळ वर्षभर घेता येते. उन्हाळी पिकाची लागवड फेब्रुवारी, मार्चमध्ये, तर खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात करतात. हिवाळी हंगामासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लागवड करतात.

English Summary: Learn to plant summer chavli Published on: 16 February 2022, 05:40 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters