बि गोळा( सिड बाॅल ) आता तुम्हाला वाटलं असेल हे नवीन काय सांगत आहे मिलिंद गोदे.थोडा धिर धरा व वाचा मित्रांनो हे जुनी व आदर्श पद्धती आहे.आपले वडील जेव्हा शेतात कपाशी लावत होते त्या वेळेस त्या कपाशीच्या बियाण्यास माती लावत होते हे आपण पाहिले असेल व प्रयोग ही केला असेल त्यामुळे काय होते की माती लावल्या मुळे पक्षी किंवा उंदीर घुशी ते बि खात नाही दुसरं म्हणजे बि हे सुपिक व जिवाणू रहीत असल्यामुळें बियाण्याची उगवण चांगली होते व रोप ही चांगली रहाते ही सर्व आपल्या पुर्वंजाना ज्ञात होते म्हणजे एक प्रकारे ते तज्ञ च होते.
पण कालांतराने ही पद्धत बंद झाली व आता शेतीच्या आधुनिकीकरणा मुळे त्याला वेगळं नांव दिले ते म्हणजे सिड बाॅल (माती गोळा)ते करायला वेळ व काळ हवा असतो तो म्हणजे पावसाळ्याला सुरुवात होण्याअगोदर माती मध्ये बी रुजवण्याची परंपरा आपल्याकडे अनादी काळापासून चालू आहे. पण त्यामध्ये माणसाची व शेतीपूरक अवजारांचा उपयोग मुख्यत्वे करून होत असे.पण जर निसर्गाचे संतुलन राखावयाचे असेल तर झाडांची लागवड व जोपासना करणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी उन्हाळ्यामध्ये झाडाच्या खाली बिया सापडतात त्या बिया गोळा करून त्याची साठवणूक करावी.
साठवलेल्या बीया फेकून सुद्धा नवीन रोपं तयार होतं पण,त्या बियांना मुंग्या व इतर कीटक व पक्षी यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्या बियांचे बी गोळे जर बनवले तर त्याचा उपयोग नवीन रोपं तयार होण्यास चांगल्या पद्धतीने करता येतो.बीज गोळा करण्याच्या पद्धती ह्या गोळा केलेल्या बियांपासून बी गोळ्याबनवण्याची पद्धती खालील प्रमाणे आहेत:सिड बाॅल कींवा बी गोळा तयार करणे माती (चाळून घेणे) शेण , पाणीजिवाणुसंघ( जैविक बुरशी) तयार करण्याची कृती सर्वात अगोदर गोळा केलेल्या बियांना एकत्र ठिकाणी जमा करावे.
बीज गोळा करण्याच्या पद्धती ह्या गोळा केलेल्या बियांपासून बी गोळ्याबनवण्याची पद्धती खालील प्रमाणे आहेत:सिड बाॅल कींवा बी गोळा तयार करणे माती (चाळून घेणे) शेण ,पाणीजिवाणुसंघ( जैविक बुरशी) तयार करण्याची कृती सर्वात अगोदर गोळा केलेल्या बियांना एकत्र ठिकाणी जमा करावे.जमा केलेल्या बियांना बुरशीनाशके लावून थोडा वेळ उन्हात वाळवावे.वाळलेल्या बियांना माती, गोमूत्र व शेण यांच्या मिश्रणाने तयार केलेल्या गोळ्यामध्ये भाग ठेऊन गोळा तयार करावा.तयार केलेल्या गोळ्याला साठवलेला 30 ते 35 मिनिटे वाळवावे.
मिलिंद जि गोदे. milindgode111@gmail.com
Share your comments