1. कृषीपीडिया

तूर पिकासाठी वेगवेगळ्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये, जाणून घ्या सविस्तर

शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण तूर पिकाचे वाण निवडतांना कोणते मुद्दे लक्षात घ्यावे ते जाणून घेऊ.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
तूर पिकासाठी वेगवेगळ्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये, जाणून घ्या सविस्तर

तूर पिकासाठी वेगवेगळ्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये, जाणून घ्या सविस्तर

तुरीचे वाण निवडताना कोणते ठळक मुद्दे लक्षात घ्यावे?(१) शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण मोठ्या प्रमाणात स्वीकारलेला आणि अलीकडील काही वर्षात वांझ रोगाला रोगाला बळी पडत चाललेला मारोती (ICP 8863 ) या तुरीच्या वाणाची पेरणी टाळा. शेतकरी बंधूंनो आपण ज्याला मर उबळणे जळणे यासारखी लक्षणे म्हणतो या जातीत वांझ रोगामुळे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे आणि त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होते म्हणजे शास्त्रीय भाषेत मारोती हा वान वांझ या रोगाला बळी पडतो म्हणून या वाणाची पेरणी टाळा.(२) शेतकरी बंधूंनो तुरीच्या वाणाची निवड करताना जमिनीच्या प्रकारानुसार करणे गरजेचे असते. कारण भारी जमिनीत अधिक उत्पादन देणारे तुरीचे वाण हे मध्यम ते हलक्या जमिनीत तसेच उत्पादन देतील असे नाही. मध्यम प्रकारच्या जमिनीकरिता कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या जाती उदाहरणार्थ एकेटी 88 11 सारख्या वाणाची आपण निवड करू शकता. 

याउलट भारी जमीन असेल तर मध्यम कालावधीत परिपक्व होणाऱ्या म्हणजे 170 ते 180 दिवसात येणाऱ्या उदाहरणार्थ पीकेव्ही तारा, बीएसएमआर 736 यासारख्या वाणाची आपण निवड करू शकता(३) शेतकरी बंधुंनो मध्यम कालावधीत येणारे पीकेव्ही तारा ,बीएसएमआर 736 किंवा बीडीएन 716 यासारखे तुरीचे वान किंवा अति अति उशिरा परिपक्व होणारे आशा (ICPL 87119) यासारखे वान मध्यम ते भारी जमिनीत संरक्षित ओलितला प्रतिसाद देणारे आहेत.वर निर्देशित मुद्द्यावरून एक सारांश लक्षात घ्या की तुरीच्या वाणाची निवड करताना आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, आपल्याला बाजारात तुरी कोणत्या कालावधीत विक्रीसाठी न्यावयाचे आहेत म्हणजेच तुरीच्या वानाचा कालावधी कोणता आहे तसेच आपल्याकडे संरक्षीत ओलीत आहे किंवा नाही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या स्थानिक जमिनीच्या प्रकाराचा व इतर बाबीचा विचार करून तुरीच्या वाणाची निवड करावी शास्त्रीय भाषेत बोलायचे झाल्यास आपल्या स्थानिक परिसंस्थेचा अभ्यास करून तुरीच्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे. 

शेतकरी बंधूंनो आता आपण काही तुरीचे अद्यावत वान व त्यांच्यामध्ये असलेली गुणवैशिष्ट या विषयी माहिती घेऊ(१) पीकेव्ही तारा : शेतकरी बंधूंनो डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 2013 साली प्रसारित केलेला हा तुरीचा वान 178 ते 180 दिवसात परिपाक होणार असून 100 दाण्याचे वजन 9.6 ग्रॅम एवढं असतं. या वाणाची हेक्टरी उत्पादकता ते 20 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी आहे. शेतकरी बंधूंनो हा तुरी चव्हाण अधिक उत्पादन देणाऱ्या मर रोगास प्रतिबंध प्रतिबंध व वांझ रोगास साधारण प्रतिकारक्षम असून फटका डाळीच प्रमाण पाच ते दहा टक्के अधिक आहे. हा वान मध्यम ते भारी जमिनीत आणि संरक्षित ओलिताखाली अधिक उत्पादन देतो.(२) बी एस एम आर 736 : शेतकरी बंधुंनो हा तुरीचा वान साधारणता 170 ते 180 दिवसात परिपक्व होणारा असून या वाणाच्या 100 दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम एवढा असून या तुरीच्या वाणाची हेक्टरी उत्पादकता 15 ते 16 क्विंटल एवढी नमूद केली आहे.शेतकरी बंधूंनो या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे तांबड्या रंगाचे असून हा वान मर तसेच वांझ रोगास प्रतिकारक व सलग तुर पेरणीस तसेच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वान आहे.

(३) बीडीएन 716 : शेतकरी बंधूंनो हा वान साधारणता 165 ते 170 दिवसात परिपक्व होतो तसेच याची हेक्टरी उत्पादकता ते 22 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे. हा वाण मर व वांझ रोग प्रतिकारक असून या वाणाची उत्तम प्रतीची डाळ तयार होते. अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पादकता देणारा हा वान मध्यम ते भारी जमिनीत व संरक्षित ओलीतला प्रतिसाद देणारा आहे.(३) विपुला : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा शिफारशीत हा वाण 150 ते 170 दिवसात परिपक्व होणार असून सलग तसेच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य आहे तसेच मर वांझ रोगास मध्यम प्रतिकारक आहे. या या वाणाची हेक्टरी उत्पादकता ते 26 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे.(४) बी एस एम आर 853 (वैशाली) : शेतकरी बंधूंनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी त्यांनी शिफारस केलेला आणि 170 ते ते 175 दिवसात परिपक्व होणारा वान असून मध्यम आकाराचे पांढरे दाणे असणारा हा वाण मर तसेच वांझ रोगास प्रतिकारक तसेच सलग तसेच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य असून याची हेक्टरी उत्पादकता ते 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे(5) AKT 8811 : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 1995 मध्ये शिफारस केलेला हा 130 ते 140 दिवसात म्हणजे कमी कालावधीत परिपक्व होणारा तसेच मध्यम हलक्या जमिनीत चांगला उत्पादन देणारा वान म्हणून ओळखला जातो.

या वानाची हेक्टरी उत्पादकता 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे.(६) बी डी एन 708 (अमोल) : हा वान मध्यम कालावधीचा असून 160 ते 170 दिवसात हा परिपक्व होतो. दाण्याचा रंग लाल असुन कोरडवाहू खाली प्रतिसाद देणारा तसेच मर रोगास प्रतिकारक असणारा वान असून त्याची हेक्टरी उत्पादकता 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे(7) फुले राजेश्वरी : हा वान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2012 यावर्षी प्रसारित केला असून हा लवकर परिपक्व होणारा म्हणजे 140 ते 150 दिवसात परिपक्व होणारा वान असून मर आणी वांझ रोगास प्रतिकारक्षम लवकर परिपक्वता तांबड्या रंगाचे टपोरे दाणे तसेच हेक्टरी 28 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादकता देण्याची क्षमता ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत.(८) बीडीएन 2013 - 41 (गोदावरी): हा तुरीचा वान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी 2020 आली महाराष्ट्र राज्यासाठी खरीप हंगामाकरिता शिफारशीत केला असून या वानाचा परिपक्वता कालावधी 160 ते 165 दिवस असून हा वाण मर व वांझ रोगास प्रतिकारक म्हणून शिफारशी करण्यात आला असून या मनात प्रथिनांचे प्रमाण अधिक असून या वाणाचे उत्पादन इतर काही वाणाच्या तुलनेत अधिक आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

( ९) आय सी पी एल 87 119 (आशा) : शेतकरी बंधूंनो 1992 ला प्रसारित झालेला हा जुना वान उशिरा परिपक्व होणारी जात म्हणून ओळखला जातो परिपक्वता कालावधी 180 ते 200 दिवस असून 100 दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम एवढी असते. हा वान मर व वांझ रोगप्रतिकारक आणि भारी जमिनीत योग्य असून अर्ध रबी तुरीच्या लागवडीसाठी सुद्धा शिफारशीत आहे. या वाणाची हेक्टरी उत्पादकता 12 ते 14 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद करण्यात आली आहे वर निर्देशित तुरीच्या वानाच्या उपलब्ध ते संदर्भात कुणाकडे विचारणा करू शकता?शेतकरी बंधूंनो वर निर्देशित तुरीच्या अद्यावत वानाच्या प्रमाणित बियाण्याच्या उपलब्धते संदर्भात विचारणा करण्यासाठी आपण संबंधित कृषी विद्यापीठ, शेतकऱ्यांच्या बीजोत्पादन कंपनी, महाबीज किंवा शासनाच्या इतर मान्यताप्राप्त कंपन्या यांच्याशी आपण त्यांची निर्देशित कालावधीत संपर्क करू शकता. अर्थात या संदर्भामध्ये अधिक माहिती संबंधितांकडून प्राप्त होऊ शकते.

 

राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड तथा कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Learn the different varieties and their characteristics for tur crop in detail Published on: 20 May 2022, 04:41 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters