1. कृषीपीडिया

रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर मूग व उडीदाची लागवड आहे फायदेशीर

KJ Maharashtra
KJ Maharashtra
उन्हाळी मूग, उडीद लागवड

उन्हाळी मूग, उडीद लागवड

रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर सिंचनाखाली उन्हाळी मूग व उडीद लागवड नक्कीच फायदेशीर ठरेल. मूग आणि उडीद ही सत्तर ते ऐंशी दिवसांमध्ये येणारी पिके असून, अल्प उपलब्ध पाण्यामध्ये या पिकांचे उत्पादन घेता येते.

रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर सिंचनाखाली उन्हाळी मूग व उडीद लागवड नक्कीच किफायतशीर ठरेल. मूग आणि उडीद ही सत्तर ते ऐंशी दिवसांमध्ये येणारी पिके असून, अल्प उपलब्ध पाण्यामध्ये या पिकांचे उत्पादन घेता येते.

जमीन

मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी असावी.

पूर्वमशागत

रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीनंतर वखराच्या साह्याने जमीन भुसभुशीत करावी. कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. हेक्टरी ५ टन गाड्या कुजलेले शेणखत टाकावे.

पेरणीची वेळ

उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारीअखेर ते मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करावी. दोन ओळींमधील अंतर ३० सेंमी व व दोन रोपांमधील अंतर दहा सेंमी असावे. पेरणी केल्यानंतर पेरणी केल्यानंतर सिंचनासाठी चार ते पाच मीटर रुंदीचे सारे ओढून घ्यावेत.

सुधारित वाण

मूग : वैभव, पी.डी.एम.-१, पुसा-९५३१ किंवा पुसा वैशाखी.

उदीद : टी-९ किंवा पी.डी.यू.-१

 

बियाणे प्रमाण

१५ ते २० किलो प्रति हेक्‍टर.

बीज प्रक्रिया

 मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा भुकटी लावावी. त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबिअम जिवाणू संवर्धक गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून बियाण्यावर लावावी. सावलीमध्ये वाळवल्यानंतर पेरणी करावी. रायझोबिअममुळे मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढून नत्राची उपलब्धता वाढते.

पेरणी

पेरणीपूर्वी पाणी देऊन रान वाफशावर आल्यानंतर पेरणी करावी.

खत माता

या पिकांना २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत मिसळून बियाण्याजवळ पेरणी केल्यास पिकाच्या वाढीस लाभ होतो.

आंतरमशागत

पिकाच्या पेरणीनंतर २० ते २५ दिवसात पहिली कोळपणी करावी. पहिल्या कोळपणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. कोळपणीनंतर खुरपणी करून रोप तण विरहित ठेवावे. पिके सुरुवातीची ४० ते ४५ दिवस तणविरहित ठेवल्यास उत्पादन वाढीस फायदा होतो.

पाणी व्यवस्थापन

पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी पहिली पाण्याची पाळी द्यावी. पिकाच्या संपूर्ण कालावधीत एकूण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात. पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा तयार होताना पाण्याचा ताण पडणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.

 

पीक संरक्षण

उन्हाळ्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो. किडींमध्ये मावा, तुडतुडे, भुंगेरे, पाने खाणारी अळी व शेंगा पोखरणारी अळी यांचा प्रादुर्भाव असतो. तसेच भुरी व पिवळा विषाणू या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो.

काढणी

मुगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यानंतर पहिली तोडणी करावी. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात.  शेंगा वाळल्यानंतर मळणी करावी.

उडदाची कापणी करून खळ्यावर आणून त्याची मळणी करावी. उडदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही.

साठवणीपूर्वी मूग उडीद धान्य चार ते पाच दिवस चांगले उन्हात वाळवून घ्यावे. ते पोत्यात किंवा कोठीत साठवताना कडुनिंबाचा पाला धान्यात मिसळावा. साठवणीतील किडीपासून बचाव होतो.

उत्पादन

मूग उडदाचे जातीपरत्वे ८ ते १० क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters