1. कृषीपीडिया

साप चावल्यावरचे हे रामबाण उपाय माहिती करून घ्या

तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले

तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्यादोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विष मनुष्याच्या शरिरात सोडतो.ते विष रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विष आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं. 

हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते.(परंतू) म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास तरी मरणार नाही. 

जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.त्यामुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तीन तास आहेत. या तीन तासात तुम्ही काही करू शकाल तर चांगलंच आहे.तुम्ही काय करू शकता ?  एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता.

हे मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे. त्याचं नाव आहे NAJA २०० (N A J A ) हे औषध कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हालामिळेल. 

 या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये इतकी आहे. NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक मानल्या जाणा-या सापाचं विष आहे. त्या सापाचंनाव आहे क्रॅक. या सापाचं विष सर्वात घातक मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष उतरवण्यासाठी कामात येतं. या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १० मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १० मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे. बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. 

शेतीवर काम करणा-या माणसांना, विशेषकरून पावसाळयात सर्पदंश होतात. तसेच ते बहुधा पावलावर आणि थोडया प्रमाणात हातावर, विशेषतः हाताच्या पंज्यावर होतात. यावरून काय काळजी घ्यायची ते कळते.

तरीही एकूण सर्पदंशापैकी सुमारे 80 टक्के घटना ह्या ‘बिनविषारी’ असतात आणि 20 टक्केच विषारी दंश असतात. काही लोक केवळ भीतीने दगावल्याची उदाहरणे आहेत. मात्र वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर विषारी सर्पदंश झालेल्यांपैकी 90 टक्के व्यक्ती वाचू शकतात.

English Summary: Learn about this panacea for snake bites Published on: 11 April 2022, 04:14 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters