सातारा जिल्ह्यातील सुनील मिळशेटे यांची आदर्श नियोजनातील शेती सातारा जिल्ह्यातील काही भाग डोंगरी आहे. या भागात पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. विहीर असूनही पाण्याअभावी हंगामी शेती करावी लागते. त्यामुळे अनेकजण उदरनिर्वाहासाठी मुंबईचा रस्ता धरतात. मात्र, मरळी येथील सुनील शंकर मिळशेटे यांनी पॉलिमल्चिंग व ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून यंदाच्या दुष्काळात आपल्या शेतीत सकारात्मक चित्र निर्माण केले आहे. पाल खंडोबापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर
बाराशे लोकसंख्या असलेले पाटण तालुक्यातील (जि. सातारा) मरळी हे गाव.Marli is a village in Patan taluk (District Satara) with a population of twelve hundred. गावचा भोवताल डोंगराळ असून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे,
भारतात 5G इंटरनेट सेवा सुरु, शेतकऱ्यांचा होणार हे मोठे फायदे
यामुळे अनेक शेतकरी हंगामी शेती करतात; मात्र पाण्याचे योग्य व्यवस्थापन तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करत गावातील सुनील मिळशेटे यांनी शेतीतील आपला पाया घट्ट केला आहे. त्यांना एकूण सहा एकर जमीन आहे. त्यातील चार एकर जमीन पाण्याअभावी हंगामी व अवघी दोन एकर कशीबशी बागायत केली जाते. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून त्यांनी वांगी, सोयाबीन, शाळू व
भात पिकवला आहे. विहीर असूनही पाणी नसल्यामुळे 2011 मध्ये त्यांनी बोअरवेल घेतले, त्याला दीड इंच पाणी लागले; मात्र ते एकसारखे येत नसल्यामुळे पाण्याची शेततळ्यात साठवणूक करून ते ठिबकद्वारे व सायफनद्वारे शेताला दिले. खरिपात सोयाबीनचे बीजोत्पादन त्यांनी घेतले आहे. चार गुंठ्यांत बेडवर घेतलेल्या कांद्याचे एक टनापर्यंतचे उत्पादन मिळाले होते, त्याची हातविक्री केली. रब्बी हंगामात एक एकरात शाळू घेतला. यात 13 क्विंटल उत्पादन मिळाले. शाळूची व्यापाऱ्यांना विक्री न करता ती थेट ग्राहकांना विकली, त्याला प्रति क्विंटल
दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत दर मिळाला. केळीची फेब्रुवारीत 2012 मध्ये लागवड केली आहे. यंदा वादळामुळे नुकसान झाले असले तरी आतापर्यंत काही उत्पन्न हाती आले आहे. केळीस सायफन पद्धतीने पाणी दिले जाते. पूरक भाजीपाला म्हणून अळू असून त्याची आठवड्याला विक्री केली जाते. मल्चिंगवर व ठिबकवर वांग्याची लागवड मिळशेटे यांच्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष कायम असल्याने त्यांनी पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने व चांगले उत्पादन मिळावे यासाठी पॉलिमल्चिंग पेपरचा वापर करण्याचे ठरवले, त्याला ठिबक सिंचनाची जोड
दिली. गावात पॉलिमल्चिंगचा हा पहिलाच प्रयोग होता. सुमारे 12 गुंठे क्षेत्र त्यासाठी निवडले. लागवडीचे नियोजन करताना सुरवातीला दोन ट्रेलर शेणखत वापरले. त्यानंतर रासायनिक खत, गांडूळ खत व सूक्ष्म अन्नद्रव्ये मातीत मिसळून बेड तयार केले. त्यानंतर मल्चिंग पेपरचे आच्छादन केले. त्यानंतर रोपांची लागवड केली. आवश्यकतेनुसार 19-19-19, 12-61-0, 0-52-34 व सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबक सिंचनाद्वारे दिली.पाणी व्यवस्थापन वांग्याची रोपे दोन महिन्यांची असेपर्यंत ठिबकद्वारे प्रति दिवस एक तास पाणी दिले, त्यानंतर प्रति दिवस दोन तास पाणी दिले जाते.
उन्हाची तीव्रता वाढल्यावर पंपाद्वारे पाण्याच्या फवारण्या दिल्या. बोअरवेलमधून पाणी उपसा केल्यावर एकसारखे पाणी येत नाही, त्यामुळे 20 बाय 20 बाय 10 फूट क्षेत्रफळाचे छोटे शेततळे तयार केले आहे, त्यात पाण्याची साठवणूक केली जाते. अन्य पिकांना सायफन पद्धतीने पाणी दिले जाते. पीक संरक्षण - फुलकळी सुरू झाल्यावर वांग्यावर शेंडाअळीचा प्रादुर्भाव झाला होता, त्या वेळी रासायनिक फवारणी घेऊन किडीचे नियंत्रण केले. पांढरी माशी नियंत्रणासाठीही फवारणी घेतली, सापळ्यांद्वारेही किडीचा प्रादुर्भाव रोखला.
विनोद धोंगडे मो.नं.9923132233 मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)
संपर्क - सुनील मिळशेटे - 9765790955
Share your comments